८० प्रवाशांना घेऊन जाणारं विमान जमिनीवर उलटलं, अपघातस्थळावरचा VIDEO व्हायरल
सोमवारी टोरंटो विमानतळावर डेल्टा एअर लाईन्सचे विमान अपघातग्रस्त झाले. ८० प्रवाशांपैकी १७ जण जखमी झाले, परंतु कोणतीही जीवितहानी झाली नाही. विमान मिनियापोलिसहून आले होते. अपघातानंतर प्रवासी उलटलेल्या विमानातून बाहेर पडले. विमानात आग लागल्याने पाण्याचा फवारा मारण्यात आला. विमानतळाने सर्व उड्डाणे स्थगित केली होती, परंतु दोन तासांनी सेवा सुरळीत झाली.