लाल किल्ला मागणाऱ्या कथित मुघल वंशजांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
मुघल सम्राट बहादूर शाह जफर (द्वितीय) यांच्या पणतूची विधवा सुल्ताना बेगम यांनी लाल किल्ल्यावर दावा सांगत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांनी लाल किल्ला त्यांच्या कुटुंबाची मालमत्ता असल्याचा दावा केला होता. दिल्ली उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली होती. सर्वोच्च न्यायालयानेही ही याचिका फेटाळली आणि सरन्यायाधीशांनी ती गैरसमजुतीमधून करण्यात आल्याचे सांगितले.