माधुरी दीक्षितने सांगितलं त्वचेचं रहस्य! ‘या’ रेसिपीने चेहरा दिसेल चमकदार
बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या DIY हॅक्स आणि रेसिपी फॉलो करणे सोपे आहे. चमकदार त्वचेसाठी अभिनेत्रीने नुकतीच एक खास रेसिपी सांगितली आहे. “जर तुम्ही संध्याकाळी बाहेर जाण्याचा विचार करीत असाल आणि तुमची त्वचा कोरडी वाटत असेल, तर तुम्हाला फक्त काकडीचे काही तुकडे आणि कच्चं दूध हवं आहे,” असं अभिनेत्रीनं आपल्या यूट्यूब चॅनेलवर सांगितलं.