Chhaava: ब्लॉकबस्टर ‘छावा’ OTT वर कधी रिलीज होणार? जाणून घ्या
'छावा' हा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपट २०२५ मध्ये सर्वाधिक कमाई करणारा ठरला आहे. विकी कौशलने मुख्य भूमिका साकारली आहे. १४ फेब्रुवारीला प्रदर्शित झालेला हा चित्रपट अजूनही थिएटरमध्ये चालू आहे. 'छावा' ११ एप्रिल २०२५ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल. चित्रपटाने ३५ दिवसांत ५७२.९५ कोटी रुपये कमावले असून, पायरसीचा बळी ठरला आहे.