हार्दिक पटेल हे गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते आहेत. २० जुलै १९९३ रोजी त्यांचा जन्म गुजराती पाटीदार कुटुंबामध्ये झाला. त्यांच्या घरची स्थिती फारशी चांगली नव्हती. कमी वयामध्ये ते वडिलांच्या व्यवसायामध्ये हातभार लावायला मदत करु लागले होते. याच काळात त्यांनी बीकॉम केले. २०१२ मध्ये त्यांनी सरदार पटेल या पाटीदार युवक विंगमध्ये सहभाग घेतला आणि अवध्या महिन्याभरामध्ये ते प्रभागाचे प्रमुख बनले. लालजी पटेल यांच्याशी झालेल्या वादामुळे त्यांना पदावरुन काढण्यात आले. २०१५ मध्ये त्यांनी पाटीदार समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन केले. या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला. तेव्हापासून गुजरातमध्ये हार्दिक पटेल या नावाची चर्चा होऊ लागली. २०२० मध्ये त्यांनी कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतला. त्यांनी गुजरात प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपद देखील भूषवले. पुढे २०२२ मध्ये काही कारणांमुळे ते हा पक्ष सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी झाले. Read More
शक्तिसिंह गोहिल यांनी गुजरात प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत पोट निवडणुकीतील पक्षाच्या पराभवाची नैतिक जबाबदारी घेतली. त्यानंतर पक्षाच्या अनेक…
गुजरातमधील पाटीदार आरक्षण आंदोलनाचा चेहरा असलेल्या हार्दिक पटेल यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपाच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली होती. डिसेंबर २०२२…