scorecardresearch

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) स्थापना ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी १९९९ मध्ये केली होती. या पक्षाचा प्रभाव महाराष्ट्रात अधिक आहे. मात्र २०२३ मध्ये हा पक्ष फुटला. जुलै २०२३ मध्ये शरद पवार यांचे पुतणे अजित पवार ( Ajit Pawar)यांनी बंडखोरी करत मूळ राष्ट्रवादी पक्ष सोडून आपला एक वेगळा गट तयार केला. महाराष्ट्रात शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीचेही दोन गट झाले. हे दोन्ही गट शरद पवार गट आणि अजित पवार गट या नावाने ओळखले जातात.


शिवसेनेतून फुटल्यानंतर एकनाथ शिंदे गटाने जशी भाजपाची साथ स्वीकारली त्याच मार्गावर अजित पवार आपल्या समर्थकांसह गेले. अजित पवार भाजपा प्रणित महायुतीतील सरकारमध्ये सहभागी झाले. फेब्रुवारी २०२४ मध्ये निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला मूळ राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह बहाल केले. अजित पवार गटात प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, अमोल मिटकरी, सुनील तटकरे या नेत्यांचा समावेश आहे.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीत अजित पवार यांना महाराष्ट्रात केवळ चारच जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी केवळ एकाच जागेवर अजित पवार गटाला विजय मिळाला. या उलट शरद पवार गटाला महाविकास आघाडीत १० जागा मिळाल्या होत्या. त्यांना ९ जागा जिंकण्यात यश आले. राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर शरद पवार गट कमजोर झाल्याचे समजले जात होते. मात्र निवडणुकीत विजयश्री खेचत शरद पवार यांनी पक्षाला पुन्हा उभारी मिळून दिली.


पक्षाची स्थापना ( Formation of NCP)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (Nationalist Congress Party) मुख्यत्वे महाराष्ट्रात प्रभावशाली आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी इ.स. १९९९ मध्ये या पक्षाची स्थापना केली, त्यानंतर हा पक्ष भारतीय काँग्रेस पक्षाच्या साथीने इ.स. १९९९ ते २०१४ या कालावधीत महाराष्ट्र राज्यात सत्तेवर राहिला. हा पक्ष २००४ ते २०१४ च्या दरम्यान काँग्रेस प्रणीत संपुआमध्ये राहून केंद्रीय सरकारमध्येही सहभागी झाला होता.

इटलीत जन्मलेल्या सोनिया गांधींना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेतृत्व करण्याचा हक्क आहे काय? असा प्रश्न उपस्थित केल्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून निष्कासित केलेल्या शरद पवार, पी.ए. संगमा व तारिक अन्वर यांनी २५ मे १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. स्थापनेच्या वेळीच पक्षाने समाजवादी भारतीय काँग्रेस पक्षाला आपल्यात सामावून घेतले. १० वाजून १० मिनिटे ही वेळ दाखविणारे, दोन पाय व गजराची कळ असलेले सदृश (अ‍ॅनालॉग) घड्याळ हे या पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह आहे. २०२३ मध्ये राष्ट्रवादी हा पक्ष फुटून त्याचे दोन गट झाले. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी हे पक्ष नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांना बहाल केले असून आता अजित पवार हे पक्षाचे अध्यक्ष आहेत.


Read More
Chhagan Bhujbal made a disclosure on the eve of the Nagpur Chintan Shibir
शरद पवारांवरील टिकेनंतर दुसऱ्याच दिवशी भुजबळांचे ‘यू टर्न’, म्हणाले ….

अंतरवाली सराटीतील पोलिसांवरील हल्ल्यामागे शरद पवार असल्याचा आरोप भुजबळ यांनी केला होता हे येथे उल्लेखनीय.

Chhagan Bhujbals statement at the inauguration of the National Thinking Camp in Nagpur
भुजबळ म्हणतात फडणवीस ‘आशेचा किरण’, अजितदादा म्हणतात, ” सर्व समाज माझा “

राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ओबीसी मेळाव्यात देवेंद्र फडणवीस हे ओबीसींसाठी मंत्रिमंडळातील एकमेव आशेचे किरण आहेत, असे वक्तव्य…

Ajit Pawar NCP Stance On Mumbai Municipal Corporation Elections
मुंबई वगळता अजित पवार गटाची राज्यभरात वेगळी भूमिका; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत ‘हे’ असेल धोरण!

NCP Ajit Pawar: गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या निवडणुका लवकरात लवकर घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

Ajit Pawar gave clarification at Chintan Shibir Nagpur
कुटुंबात फुट पाडून वेगळा का झालो?, अजित पवारांनी दिले स्पष्टीकरण

शिबिराच्या उदघाटन समारंभाप्रसंगी बोलताना अजित पवार यांनी भाजपसोबत सरकारमध्ये जाण्याचा निर्णय का घेतला यावर पुन्हा स्पष्टीकरण दिले.

Supriya Sule On Chhagan Bhujbal
Supriya Sule : ‘अंतरवाली सराटीतील दगडफेकीमागे पवारांच्या आमदाराचा हात’, भुजबळांच्या आरोपांना सुळेंचं प्रत्युत्तर; “ती बैठक कुठे झाली? किती…”

‘अंतरवली सराटीत वर्षभरापूर्वी पोलिसांवर करण्यात आलेल्या दगडफेकीत शरद पवार यांच्या पक्षातील एका आमदाराचा हात होता’, असा गंभीर आरोप छगन भुजबळ…

Deputy Chief Minister Ajit Pawars warning to party ministers
पालकमंत्री म्हणून काम करायचे नसेल तर मंत्रिपद सोडा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पक्षातील मंत्र्यांना इशारा

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय चिंतन शिबिर आज नागपुरात सुरू आहे. शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी…

Pimpri Chinchwad municipal election 2025 strategy BJP ajit pawar NCP political battle
पिंपरी-चिंचवड : २०१७ मधील पराभवाचा वचपा राष्ट्रवादी काढणार? भाजपचा शतप्रतिशतचा नारा; अजित पवारांकडुन जनसंवाद

उद्या (शनिवारी) अजित पवारांचा पिंपरी-चिंचवड शहरात जनसंवाद असणार आहे. यानिमित्ताने शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघणार असून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळेल…

NCP Ajit Pawar warning to ministers
“… नाहीतर खुर्ची सोडावी लागेल”, अजित पवारांचा मंत्र्यांना स्पष्ट इशारा; नेमकं काय झालं?

Ajit Pawar Warning to Ministers: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या चिंतन शिबिरात मंत्र्यांना उद्देशून स्पष्ट इशारा दिला.

MP sumitra Pawar lessons election strategy to party
राष्ट्रवादीला सुनेत्रा पवार देणार निवडणूक रणनीतीचे धडे; थोड्याच वेळात चिंतन शिबिरास सुरुवात होणार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) यांच्या राष्ट्रीय चिंतन शिबिराला आज थोड्याच वेळात सुरुवात होत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री खासदार आणि…

ajit pawar gopichand padalkar
Gopichand Padalkar Statement: जयंत पाटलांच्या वडिलांचं नाव घेत पडळकरांनी केला अपमान; अजित पवारांच्या भाजपाला कानपिचक्या!

Ajit Pawar in Gopichand Padalkar Statement: गोपीचंद पडळकरांनी राजकीय संस्कृतीची जाण ठेवावी, अशा प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसकडून व्यक्त होत आहेत.

Bhujbal's allegations against Sharad Pawar, Ajit Pawar avoided speaking
भुजबळांचे शरद पवारांवर आरोप, अजित पवारांनी बोलणे टाळले

दोन वर्षापूर्वी मराठा आरक्षणाच्या संदर्भात मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे आंदोलन केले होते. तेथे पोलिसांनी लाठीहल्ला केला होता. त्यावेळी…

Pawar's MLA is behind the attack in Antarwali Sarati, Bhujbal makes serious allegations
अंतरवाली सराटीतील हल्ल्यामागे पवारांच्या आमदाराचा हात, भुजबळांचा गंभीर आरोप

शुक्रवारी नागपुरात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कांग्रेसचे चिंतन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. त्याच्या पूर्वसंध्येला येथे समता परिषदेचा मेळावा आयोजित…

संबंधित बातम्या