scorecardresearch

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) स्थापना ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी १९९९ मध्ये केली होती. या पक्षाचा प्रभाव महाराष्ट्रात अधिक आहे. मात्र २०२३ मध्ये हा पक्ष फुटला. जुलै २०२३ मध्ये शरद पवार यांचे पुतणे अजित पवार ( Ajit Pawar)यांनी बंडखोरी करत मूळ राष्ट्रवादी पक्ष सोडून आपला एक वेगळा गट तयार केला. महाराष्ट्रात शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीचेही दोन गट झाले. हे दोन्ही गट शरद पवार गट आणि अजित पवार गट या नावाने ओळखले जातात.


शिवसेनेतून फुटल्यानंतर एकनाथ शिंदे गटाने जशी भाजपाची साथ स्वीकारली त्याच मार्गावर अजित पवार आपल्या समर्थकांसह गेले. अजित पवार भाजपा प्रणित महायुतीतील सरकारमध्ये सहभागी झाले. फेब्रुवारी २०२४ मध्ये निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला मूळ राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह बहाल केले. अजित पवार गटात प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, अमोल मिटकरी, सुनील तटकरे या नेत्यांचा समावेश आहे.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीत अजित पवार यांना महाराष्ट्रात केवळ चारच जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी केवळ एकाच जागेवर अजित पवार गटाला विजय मिळाला. या उलट शरद पवार गटाला महाविकास आघाडीत १० जागा मिळाल्या होत्या. त्यांना ९ जागा जिंकण्यात यश आले. राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर शरद पवार गट कमजोर झाल्याचे समजले जात होते. मात्र निवडणुकीत विजयश्री खेचत शरद पवार यांनी पक्षाला पुन्हा उभारी मिळून दिली.


पक्षाची स्थापना ( Formation of NCP)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (Nationalist Congress Party) मुख्यत्वे महाराष्ट्रात प्रभावशाली आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी इ.स. १९९९ मध्ये या पक्षाची स्थापना केली, त्यानंतर हा पक्ष भारतीय काँग्रेस पक्षाच्या साथीने इ.स. १९९९ ते २०१४ या कालावधीत महाराष्ट्र राज्यात सत्तेवर राहिला. हा पक्ष २००४ ते २०१४ च्या दरम्यान काँग्रेस प्रणीत संपुआमध्ये राहून केंद्रीय सरकारमध्येही सहभागी झाला होता.

इटलीत जन्मलेल्या सोनिया गांधींना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेतृत्व करण्याचा हक्क आहे काय? असा प्रश्न उपस्थित केल्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून निष्कासित केलेल्या शरद पवार, पी.ए. संगमा व तारिक अन्वर यांनी २५ मे १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. स्थापनेच्या वेळीच पक्षाने समाजवादी भारतीय काँग्रेस पक्षाला आपल्यात सामावून घेतले. १० वाजून १० मिनिटे ही वेळ दाखविणारे, दोन पाय व गजराची कळ असलेले सदृश (अ‍ॅनालॉग) घड्याळ हे या पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह आहे. २०२३ मध्ये राष्ट्रवादी हा पक्ष फुटून त्याचे दोन गट झाले. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी हे पक्ष नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांना बहाल केले असून आता अजित पवार हे पक्षाचे अध्यक्ष आहेत.


Read More
dadasaheb Phalke film city to come up at igatpuri near nashik cultural development
मुंढेगाव चित्रनगरीविषयी अधिवेशनानंतर बैठक; आशिष शेलार यांचे अजित पवार गटाला आश्वासन

अजित पवार गटाच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आदित्य संजयराव यांनी मंत्री शेलार यांची भेट घेतली. यावेळी राज्यातील सांस्कृतिक क्षेत्राशी…

Both the key posts of Kolhapur Agricultural Produce Market Committee have been handed over to Ajit Pawars NCP
कोल्हापूर बाजार समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा; सभापतीपदी सूर्यकांत पाटील, राजाराम चव्हाण उपसभापती

सोमवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत समितीच्या सभापतीपदी सूर्यकांत रघुनाथ पाटील (बाचणी) यांची तर उपसभापतीपदी राजाराम तुकाराम चव्हाण (येळवण जुगाई) यांची…

jitendra awhad supports thackeray brothers unity supportive statement on vijayi rally Maharashtra politics
या लढ्यात आपण सगळे मराठी लेकरं म्हणून रिंगणात उतरु, जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया

त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतानाचा एक व्हिडीओ एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट करत या लढ्यात आपण सगळे मराठी लेकरं म्हणून…

eknath shinde jai gujarat slogan sunil tatkare reaction
गुजरातविषयक एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य माहीत नाही…राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया

पुण्यातील एका कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात अशी घोषणा…

mumbai ncp youth congress demands action against illegal coaching classes mumbai
खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये अनधिकृत इंटिग्रेटेड अभ्यासक्रम; संबंधितांवर कारवाई करण्याची राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी

मुंबईतील अनेक खाजगी कोचिंग क्लासेस अनधिकृत इंटिग्रेटेड अभ्यासक्रम चालवत असल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केला आहे.

sunil tatkare hindi language political statement on thackeray brothers in Nandurbar
हिंदी भाषेसंदर्भातील निर्णयाचा ठाकरे बंधूंना लाभ अशक्य – राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांचा दावा

या मेळाव्याच्या माध्यमातून त्यांना वर्षभरात विजय साजरा करण्याची संधी मिळाली असली तरी याचा राजकीय फायदा त्यांना होणार नसल्याचे तटकरे म्हणाले

MP Sunil Tatkare spills beans on multiple NCP BJP talks before alliance
भाजपशी युती करण्याआधी राष्ट्रवादीत चार ते पाचवेळा चर्चा – खासदार सुनील तटकरे यांचा गौप्यस्फोट

मेळाव्यासाठी आलेले प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Ashok Chavan and Ravindra Chavan met Khatgaonkar in a separate room next to their room in the hospital
बँक उपाध्यक्षांची निवड नांदेडला; पण घडामोडी मुंबईमध्ये

बँकेचे अध्यक्ष भास्करराव खतगावकर हे मागील तीन आठवड्यांपासून मुंबईतील रुग्णालयात उपचार आणि विश्रांती घेत असून, यादरम्यान बँकेतील दोन्ही रिक्त पदांच्या…

baramaati pravin mane joins bjp strategic move in indapur to counter ajit pawar and ncp
इंदापूरमध्ये भाजपचा अजित पवार व हर्षवर्धन पाटलांना शह? प्रीमियम स्टोरी

प्रवीण माने यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील या दोघांनाही शह देण्याची राजकीय खेळी खेळल्याचे स्पष्ट झाले…

Vijay Bhamble joins Ajit Pawar
भांबळे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर आता मित्रपक्षात सत्ता संघर्ष

माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून भांबळे यांच्या राजकारणाची सुरुवात झालेली आहे. तब्बल दोन दशकांपासून दोघांमध्ये राजकीय…

संबंधित बातम्या