scorecardresearch

परभणी

परभणी (Parbhani) हे मराठवाड्यातील एक जिल्हा असून त्याचे पूर्वीचे नाव प्रभावतीनगर होते. परभणी हे पूर्वी निजामी राजवटीचा भाग होते. परभणीचे क्षेत्रफळ ६ हजार २५० चौरस किमी आहे. परभणी जिल्ह्यात नऊ तालुके असून एकूण ८४८ गावं आहेत. धार्मिकदृष्ट्यादेखील परभणी अतिशय महत्त्वाचा जिल्हा आहे. शिर्डीच्या साईबाबांच्या जन्मस्थळावरून वाद असला तरी त्यांचा जन्म येथील पाथरी गावात झाल्याची मान्यता आहे. तसेच राष्ट्रसंत संचारेश्वर महाराज यांचा जन्मही परभणीतील जिंतूर तालुक्यात झाला. याचबरोबर मुस्लीम धर्मियांसाठी महत्त्वाचा मानला जाणारा हजरत शाह तुराबुल हक यांचा दर्गाही परभणी येथे आहे. जैन धर्मियांसाठीही हा जिल्हा महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. जैन धर्मियांसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या निमगिरी गुफा परभणी जिल्ह्यात आहेत. Read More
Proposal for 'Kasturba Gandhi Vidyalaya' for the daughters of sugarcane workers
ऊसतोड कामगारांच्या मुलींसाठीच्या ‘कस्तुरबा गांधी विद्यालया’चा प्रस्ताव बासनात; दोन वर्षांपूर्वीच्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

बीड व परभणीमधील ऊसतोड कामगारांच्या मुलींसाठी ‘कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय’ योजनेच्या धर्तीवरही एक योजना सुरू करण्याचा निर्णय १६ सप्टेंबर २०२३…

Rs 128 crore fund approved for farmers affected by heavy rains
अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना १२८ कोटी रुपयांचा निधी मंजूर; शासन निर्णयात सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीचा उल्लेख नाही

खरीप हंगामात जिल्ह्यात जून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत प्रत्येकच महिन्यात अतिवृष्टी झाली असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. विशेषतः…

Meghna Sakore Bordikar
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना तातडीने मदत केली जाईल – पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री श्रीमती मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते झाले.

pathri saibaba birthplace project halted due to credit war
राजकीय मतभेद, श्रेयवादाच्या लढाईत पाथरीचा साईबाबा तीर्थक्षेत्र आराखडा कागदावरच; ५२ कोटी रुपयांचा निधी तसाच पडून…

५२ कोटी रुपये शासनाकडून मंजूर झालेले असूनही पाथरीत एकही विकासकाम सुरू झालेले नाही, प्रशासन आणि राजकारण यांच्यात योजना अडकली.

Three killed after bullock cart iron rods touch power line Parbhani Palam Electrocution tragedy
परभणी : विजेचा धक्का लागून पालम येथे तिघांचा मृत्यू

एका जागेवरून पानटपरी हलवून बैलगाडीमध्ये दुसऱ्या जागी नेल्यानंतर ती बैलगाडीतून उतरवत असताना गाडीच्या लोखंडी दांड्या विजेच्या तारेला लागल्याने तब्बल तीन…

in parbhani Four workers rescued safely from floodwaters in Purna river due to heavy rain.
परभणी जिल्ह्यातल्या काही मंडळांमध्ये अतिवृष्टी, चौघांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढले

पूर्णा तालुक्यातील कौडगाव शिवारात थूना नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात चार जण अडकले होते मात्र पूर्णा व परभणी रेस्क्यू टीमने त्यांना…

Parbhani Hingoli Rainfall news
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पुन्हा पावसाला सुरुवात

सध्या सोयाबीन, कापूस या दोन्ही पिकांची स्थिती चांगली असली, तरी सखल भागात, तसेच नदी व ओढ्याकाठच्या शेतात अजूनही पाणी साचलेले…

IMD Issues Heavy Rain Warning maharashtra mumbai
Heavy Rain Alert : राज्यात शनिवारपासून मुसळधार; कमी दाब क्षेत्राची निर्मिती… फ्रीमियम स्टोरी

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात शनिवारपासून मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

parbhani Zilla Parishad news in marathi
परभणी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी राखीव; स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पट मांडणीला सुरुवात

जिल्हा परिषद गठीत झाल्यानंतरच्या दिवसापासून सुरु होणार्‍या अडीच वर्षाच्या कालावधीसाठी हे आरक्षण निश्‍चित करण्यात आले आहे.

Somnath Suryavanshi Mother Speech in pune
Somnath Suryavanshi: “आम्ही रडत परभणीत गेलो…”; सोमनाथ सूर्यवंशीच्या आईनं सांगितला घटनाक्रम

Somnath Suryavanshi Mother Speech: परभणी येथे न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीच्या आईने काल (२५ ऑगस्ट) पुण्यात पार पडलेल्या…

संबंधित बातम्या