scorecardresearch

पाऊस

‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये तुम्हाला पावसासंबंधित सर्व माहिती मिळेल. पाऊस (Rain)ही हवामानाशी संबंधित घटना आहे. वातावरणात असलेल्या ढगांमधील वाफेचे जेव्हा द्रवरूपात रूपांतर होते तेव्हा पृथ्वीवर पाण्याचे थेंब पडू लागलाल. हवा थंड झाल्याने किंवा आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने पाऊस पडतो. सोप्या भाषेत सांगायचे, तर जेव्हा ढगांमधून पाण्याचे थेंब कोसळतात त्याला पाऊस म्हणतात. पाऊस ही मानवी जीवनासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. कारण- जेव्हा पाऊस पडतो तेव्हा जलप्राप्ती होते.


पावसाच्या पाण्यामुळे नदी, नाले आणि ओढे ओसंडून वाहू लागतात. सर्व पृथ्वी हिरवीगार होते. भारत हा प्रामुख्याने कृषिप्रधान देश आहे. भारतीय अर्थव्यवस्था शेतीशी संबंधित असल्याने पिकांच्या उत्पादनासाठी भारतात पावसाचे विशेष महत्त्व आहे. देशात काही ठिकाणी एकदाच पावसाळा असतो; तर काही ठिकाणी वर्षातून दोनदा पाऊस पडतो. दक्षिणेतील समुद्रात तयार होणाऱ्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे भारतात नैर्ऋत्य मोसमी वारे वाहू लागतात. दक्षिणेकडून हे वारे हळूहळू संपूर्ण भारतात पसरतात. परिणामस्वरूप भारतात पाऊस पडतो; ज्याला मान्सून, असे म्हटले जाते. त्यामुळे भारताचा विचार करता, अन्य राज्यांच्या तुलनेत दक्षिण भारतात अधिक पाऊस पडतो. पावसासंबंधीचा अंदाज हवामान खाते वर्तवीत असते.


पाऊस कधी येऊ शकतो, किती प्रमाणात पाऊस होईल यासंबंधीची सर्व माहिती हवामान खाते वेळोवेळी सांगत असते. या माहितीवर आधारित सविस्तर बातम्या तुम्ही येथे वाचू शकता. तसेच पावसाळ्यात देशभरातील विविध राज्यांची आणि शहरांमध्ये काय स्थिती आहे हेदेखील तुम्ही येथे जाणून घेऊ शकता. पावसाळा आला की, आरोग्यासंबंधीची काय काळजी घ्यावी, घराबाहेर पडताना काय काळजी घ्यावी, वाहनांची काळजी कशी घ्यावी अशी अनेक विषयांवरील माहिती तुम्ही येथे जाणून घेऊ शकता. तसेच पावसाळ्यात भेट देण्यासारखी स्थळे कोणती आतहे, पावसाळ्यात पर्यटन करताना काय काळजी घ्यावी अशी माहितीदेखील तुम्ही येथे जाणून घेऊ शकता.


Read More
As the Pravara River starts flowing the people of Sangamner are worshipping the river
दुथडी वाहणाऱ्या प्रवरेचे संगमनेरकरांकडून पूजन

प्रवरेतून आलेल्या पहिल्या पाण्याचे संगमनेर शहरवासीयांनी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे व डॉ. जयश्री थोरात यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या आनंदाने व…

The Koyna Dam reached a peak of more than two thirds filling in the first session of the monsoon
कोयनेचा जलसाठा ७०.५१ टीएमसीवर

यंदाचा चांगला पाऊस लक्षात घेता हा जलसाठा ७२ टीएमसीवर पोहोचताच धरणातून विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याचे कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी…

Raghuveer Ghat
रघुवीर घाटात सतत दरडी कोसळू लागल्याने महामार्ग बनला धोकादायक, रत्नागिरी व सातारा जिल्ह्यांचा संपर्क तुटण्याची भीती

पावसाळ्यात सतत दरडी कोसळत असल्याने रत्नागिरी सातारा मार्गावरील दरडीचा घाट म्हणून गेल्या काही वर्षांत या घाटाने आपली ओळख निर्माण केली…

bhandara school students holiday
भंडारा: अतिवृष्टीसदृश पाऊस, तरीही शाळांना सुट्टी नाहीच; विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास

दोन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र पाऊस कोसळत आहे. कालपासून तर पावसाने जोर धरला असून मुसळधार सुरू आहे.

potholes on the bridge over the Wainganga river and the drainage channels are blocked At Bhandara
भंडारा येथे वैनगंगा नदीवर पुलावर खड्डे पडले असून पाण्याचा विसर्ग होण्याचे मार्ग बंद

भंडारा आज कारधा यांना जोडण्यासाठी आणि वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी २५ वर्षांपूर्वी कारधा येथे वैनगंगा नदीवर मोठ्या पुलाची निर्मिती करण्यात…

Two killed in flood in Ghatanji taluka
यवतमाळ जिल्ह्यात पावसाची संततधार….घाटंजी तालुक्यात दोघांचा पूरबळी

जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून पावसाची संततधार सुरू आहे. शनिवारपासून पावसाने जोर पकडला असून, अनेक ठिकाणी पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे.

The current increase in flower prices due to continuous rains has affected demand.
संततधारेमुळे फुलांच्या दरात वाढ; आवकवर परिणाम

चातुर्मासात व्रत, वैकल्य, सण अधिक असतात. कोणत्याही पूजेसाठी झेंडु, गुलाब, मोगरा, जास्वंद, निशीगंध या फुलांना विशेष मागणी असते.

Waterfall women fell
धबधब्याजवळ फोटो काढण्यासाठी खडकांवरून धावत होती महिला, पाय घसरला अन् थेट…; काळजाचा ठोका चुकवणारा Video Viral

व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला धबधब्याजवळ फोटो काढण्यासाठी जाताना दिसत आहे पण तेवढ्यात तिचा पाय घसरतो. पुढे काय घडलं जाणून घ्या..

Maharashtra rain latest marathi news
Maharashtra Rain Alert : कोकणासह राज्यातील ‘या’ भागात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा

कोकणसाह, घाट परिसर आणि पूर्व विदर्भात सोमवारी अतिमुसळधार पावसाचा (ऑरेंज अलर्ट) इशारा देण्यात आला आहे.

Vidarbha rain news
Vidarbha Rain Updates : विदर्भात अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट

हवामान खात्याच्या अंदाजानुसार कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या