scorecardresearch

शिवसेना

शिवसेना (Shivsena) हा महाराष्ट्रातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. शिवसेनेची स्थापना बाळ ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी १९ जून १९६६ रोजी केली. मुंबईमध्ये (Mumbai) मराठी माणसांवर होणारा अन्याय अत्याचाराच्या विरोधात शिवसेनेची स्थापना झाली.


शिवसेनेने १९८९ साली बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षाबरोबर युती केली व १९९५ साली महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीचे सरकार अस्तित्वात आले व शिवसेनेचे मनोहर जोशी हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. तसेच केंद्रात १९९९ साली अस्तित्वात आलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये सेनेचे मनोहर जोशी हे नंतर लोकसभा अध्यक्ष झाले होते. २०१४ साली शिवसेना व भाजप यांची युती तुटली दोन्ही पक्ष वेगळे लढले व पुन्हा एकदा एकत्र येत सरकार स्थापन केले.


२०१९ साली शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले, विधानसभा निवडणूक दोन्ही पक्षांनी एकत्र लढवली पण मुख्यमंत्री पदावरून दोघांमध्ये वाद झाला व युती तुटली. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्याबरोबर महाविकास आघाडी स्थापन केली व उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे १९ वे मुख्यमंत्री झाले. मात्र २०२२ मध्ये शिवसेनेमध्ये फुट पडली. शिवसनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत आपला वेगळा गट स्थापन केला. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पडले. पक्षातील बहुसंख्य आमदारांसह एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत राज्यात सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली.

बंडानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर दावा केला होता. निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नाव बदलले आणि पक्षाचे चिन्हदेखील बदलले. पक्षाला मशाल हे चिन्ह मिळाले.

असली नकली शिवसेनेवरून दोन्ही गटांमध्ये जोरदार खटके उडाले. निवडणुकीत बघून घेण्याची भाषा झाली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही गटांची ताकद स्पष्ट झाली. महाविकास आघाडीने ४८ पैकी ३० जागा मिळवत राज्यात दणदणीत विजय मिळवला. महायुतीला १७ जागांवरच विजय मिळवता आला. या निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाला महायुतीत १५ जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी त्यांना ७ जागा जिंकण्यात यश आले. तर, उद्धव ठाकरे गटाला मिळालेल्या २१ जागांपैकी ९ जागांवर विजय मिळाला. निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचा स्ट्राईक रेट हा ठाकरे गटापेक्षा अधिक होता. मात्र निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला मिळालेली एकूण मते ही शिंदे गटापेक्षा अधिक आहेत. मुंबईत उद्धव ठाकरे गटाने गड राखला तर शिंदे गटाने ठाणे, कल्यणामध्ये आपले वर्चस्व असल्याचे दाखवून दिले.


मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, कांदा प्रश्न, पिकांना हमीभाव यासह विविध कारणांमुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकारला लोकसभेच्या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नसल्याचे बोलले जाते.


Read More
vasai auto river beaten by shiv sena Thackeray faction for refusing to speak marathi
विरार मध्ये मराठीचा द्वेष करणाऱ्या मुजोर रिक्षाचालकाला शिवसैनिकांकडून चोप

रिक्षाचालकाने भावेशला, “मला मराठी समजत नाही, तुला हिंदीतच बोलावे लागेल. मी हिंदी आणि भोजपुरीमध्येच बोलणार,” असा आग्रह धरत दमदाटी केली…

makai sugar factory workers protest for  unpaid salaries in Solapur sugar industry news
‘मकाई’ च्या कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतन प्रश्नावर शिवसेना शिंदे गटातच संघर्ष

करमाळा तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या सात वर्षांपासून थकीत आहे. ‘एनसीटीसी’मार्फत १४० कोटी रुपयांचे कर्ज देऊन सुद्धा…

Sanjay Shirsat
Sanjay Shirsat: “उत्साहाच्या भरात…”, कथित पैशाच्या बॅगेच्या व्हायरल व्हिडिओवर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया फ्रीमियम स्टोरी

Sanjay Shirsat: संजय शिरसाट म्हणाले की, “आम्हाला शिवसेना प्रमुखांनी शिकवले आहे की, तुम्ही कार्यकर्ता म्हणून राहा, नेता व्हायचा प्रयत्न करू…

शिवसेना शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे (छायाचित्र पीटीआय)
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी नेमकी कशासाठी? काय आहेत त्यामागची कारणं?

Eknath Shinde Meets Amit Shah : एकसंध शिवसेनेत फूट पडल्यानंतर भाजपाबरोबर हातमिळवणी करणारे एकनाथ शिंदे गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला बुधवारी नवी दिल्लीत…

Sanjay Raut On Eknath Shinde Delhi Visit
Sanjay Raut : “एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदासाठी पक्ष भाजपात विलीन करायला तयार”, ‘या’ खासदारांचा मोठा दावा; चर्चांना उधाण फ्रीमियम स्टोरी

Eknath Shinde Delhi Visit : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याची सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी चर्चा सुरु आहे.

Shiv sena leader deputy chief minister eknath shinde politics
एकनाथ शिंदे यांची चोहोबाजूने कोंडी प्रीमियम स्टोरी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मुक्तवाव मिळत नसल्याने होणारी घुसमट, स्वपक्षीय मंत्री व आमदारांचे प्रताप यातून उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेता…

politics started with issue of hindi compulsion come to personal level shiv sena women leaders clash
मी अमराठी आहे… गद्दार नाही…प्रियांका चतुर्वेदी आणि शीतल म्हात्रे यांच्यात समाज माध्यमावर शाब्दिक युद्ध

‘मी अमराठी आहे…गद्दार नाही’, असा टोला प्रियंका चतुर्वेदी यांनी शीतल म्हात्रे यांना टोला लगावला आहे. तर म्हात्रे यांनीही चतुर्वेदी दुसऱ्या…

Shankaracharya Avimukteshwaranand On Thackeray Brothers
Thackeray Brothers : “राज आणि उद्धव ठाकरेंची युती…”; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींचं भाकीत काय? फ्रीमियम स्टोरी

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विचारधारा वेगळ्या झाल्या आहेत, काळानुरुप झालेला हा बदल आहे यात चुकीचं काही असंही शंकराचार्यांनी…

anjali damania on shivsena mla sanjay shirsat claim money bag video marathi news
Sanjay Shirsat Video : “संजय शिरसाटांची कमाल वाटते, चक्क पैसे…”, बॅगेचा फोटो शेअर करत अंजली दमानिया म्हणाल्या, “हिंमत असेल तर…”

Sanjay Shirsat Viral Video : संजय शिरसाट यांनी पैशांनी भरलेल्या बॅगबद्दल स्पष्टीकरण दिल्यानंतर अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Eknath Shinde s Shiv Sena frequently trouble
विश्लेषण: कधी संजय गायकवाड, कधी आणखी कोणी… स्वपक्षियांकडून एकनाथ शिंदेंची शिवसेना वारंवार अडचणीत का येते? प्रीमियम स्टोरी

विधानसभेला केवळ ८४१ मतांनी संजय गायकवाड विजयी झाले. या निसटत्या विजयानंतर त्यांची नाराजी व्यक्त करणारी चित्रफीत गाजली होती. एकूणच वाद…

Sanjay Shirsat video with Notes Money
“पैशांनी भरलेली बॅग, हातात सिगारेट”, राऊतांकडून शिरसाटांचा VIDEO शेअर; म्हणाले, “IT च्या नोटिशीनंतर…”

Sanjay Shirsat vs Sanjay Raut : संजय शिरसाट म्हणाले, “तो व्हिडिओ माझ्या बेडरूममधीलच आहे. मी प्रवास करून आल्यानंतर बेडवर बसल्याचं…

Sanjay Shirsat Video
Sanjay Shirsat: संजय शिरसाट यांच्या घरातील कथित पैशाच्या बॅगेचा व्हिडिओ कोणी व्हायरल केला? शिरसाट म्हणाले, ‘आमच्याकडे…’

Sanjay Shirsat Video: कथित पैशाच्या बॅगेप्रकरणी आता मंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्टीकरण दिले असून, त्यांच्या घरातील हा व्हिडिओ कोणी व्हायरल…

संबंधित बातम्या