किनारपट्टीच्या भागासह पुणे जिल्ह्यालाही निसर्ग चक्रीवादळाचा काही प्रमाणात फटका बसला आहे. जिल्ह्यातील मावळ भागात या चक्रीवादळामुळं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे. अनेकांच्या घरांची पडझड झाली त्याचबरोबर इथं मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या फुलांच्या शेतीसाठी उभारण्यात आलेल्या अनेक पॉलिहाऊसचेही मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाचा दौरा उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केला. यावेळी पवार यांनी संबंधीत यंत्रणांना पंचनामे आणि सुविधा उभारण्याचे आदेश दिले.