Neelam Gorhe on Uddhav Thackeray: “उद्धव ठाकरे आजारी पडले अन्…”; नीलम गोऱ्हेंनी सगळंच सांगितलं
“पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजारी पडल्यानंतर पक्षात काय सुरू आहे, हे कळत नव्हतं. आमदारांना निधीही दिला जात नव्हता. पक्षश्रेष्ठींना जे हवे होते ते संजय राऊत यांच्याकडून बोलून घेत होते. राऊत टोकाची भूमिका घेतात त्यावर मी आक्षेपही नोंदविला होता. आक्रमक बोलण्यापेक्षा वैचारिक मतभेद वेगळ्या पद्धतीनेही मांडता येतात. मात्र या प्रकरणात त्यांना बळीचा बकरा बनविल्याचे लक्षात आले”, असं वक्तव्य शिवसेनेच्या नेत्या (शिंदे गट) नीलम गोऱ्हे यांनी केले.