नवी मुंबईतील एका शाळेत शिकणाऱ्या ४ वर्षाच्या मुलावर बस चालकाकडून लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना काही दिवसांपूर्वी घडली. या घटनेनंतर त्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अशातच आता विद्यार्थ्यांच्या पालकांनी तसंच मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शाळेबाहेर आंदोलन केलं. यावेळी पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांवरही कारवाईची मागणी केली आहे.