गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठी भाषेचा मुद्दा चर्चेत आहे. केंद्र सरकारच्या नवीन शालेय शिक्षण धोरणामुळे हिंदी भाषा सक्तीची चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी या निर्णयावर विरोध दर्शवला आहे. अभिनेत्री प्राची शाह यांनीही मराठी भाषेच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मराठी भाषेची महत्त्वता आणि तिची ओळख जपण्याची गरज व्यक्त केली. प्राची शाह यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.