scorecardresearch

अजित पवार

अजित पवार हे महाराष्ट्र राज्यातील राजकारणी आहेत. त्यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी महाराष्ट्रातील बारामती येथे झाला. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी २०१० ते २०१४ आणि २०१९ ते २०२१ असे दोन वेळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम केले आहे.


अजित पवार हे एका राजकीय कुटुंबाचे सदस्य आहेत. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून ते आले आहेत. त्यांचे काका शरद पवार हे देशाच्या राजकारणातील प्रमुख व्यक्ती आहेत. अजित पवार यांनी बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयातून बॅचलर ऑफ कॉमर्स या पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठातून व्यवसाय प्रशासन (Business Administration) या विषयातून पदव्युत्तर शिक्षण घेतले.


१९९० मध्ये अजित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली. पुढे १९९१ मध्ये ते पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर विधानसभेच्या निवडणूकांमध्ये ते अनेकदा निवडून आले. त्यांनी राज्य सरकारमधील अनेक विभागांमध्ये विविध पदांवर काम केले आहे. जलसंपदा मंत्री आणि ऊर्जा मंत्री म्हणून काम करण्याचा त्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे.


पवार त्यांच्याकडे असलेल्या प्रशासकीय कौशल्यासाठी प्रसिद्ध आहेत. राज्यामधील वेगवेगळे सिंचन प्रकल्प यशस्वीपणे राबविण्याचे श्रेय त्यांना जाते. पण जलसंपदा मंत्री असताना सिंचन प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचार केल्याचे आरोप करण्यात आले होते. कामामध्ये अनियमिततेच्या आरोपांसह अन्य वादांमध्येही ते अडकले होते.


२०१९ मध्ये अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाशी युती करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या या निर्णयाने सर्वजण आश्चर्यचकित झाले होते. पुढे काही दिवसांनी त्यांनी वैयक्तिक कारण देत या पदाचा राजीनामा दिला. महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केल्यानंतर त्यांनी ते दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले.


अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून महाराष्ट्रातील प्रमुख राजकिय व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत. कार्यक्षम प्रशासक म्हणून त्यांचा लौकिक असला, तरीही कामाप्रमाणे त्यांची राजकीय कारकीर्द ही वाद, भष्ट्राचाराच्या आरोपांसाठी प्रसिद्ध आहे. अजित पवार हे महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख भारतीय राजकारणी आहेत.


 


Read More
ajit pawar, supriya sule, ajit pawar criticises supriya sule, supriya sule's bhor velhe midc promise, Baramati lok sabha seat, lok sabha 2024, sunetra pawar, marathi news, sharad pawar, election campaign, pune news, Baramati news,
..तर मला मत मागताना शरम वाटली असती, अजित पवार असे का म्हणाले?

माझ्यासारख्याला शरम वाटली असती मते मागताना, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांची नक्कल करत त्यांच्यावर टीका केली.

Jayant Patil On Ajit Pawar
“पोरं शाळा सोडून गेली तरी शाळा बंद पडत नाही, हेडमास्तर पुन्हा…”; जयंत पाटील यांचा अजित पवारांना टोला

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे.

ajit pawar, supriya sule, ajit pawar criticise supriya sule, khadakwasla, public meeting, baramati lok sabha seat, election campaign, lok sabha 2024, sunetra pawar, sharad pawar, marathi news,
नुसती भाषण करून यांची पोट भरणार आहेत का? उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सुप्रिया सुळे यांना टोला

तुम्ही लोकांनी त्यांना १५ वर्ष (सुप्रिया सुळे) निवडून दिले.पण तुम्हाला काहीच मिळाले नाही.पण आज मी तुम्हाला म्हणतो की,यांना (सुनेत्रा पवार)…

shivsena mp sanjay raut slams cm ekanath shinde and dcm ajit pawar
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर राऊतांचा हल्लाबोल! | Sanjay Rauts

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर राऊतांचा हल्लाबोल! | Sanjay Raut

MP Sanjay Raut criticizes to Shinde group
संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, “शिंदे गट आणि अजित पवार गटाचा एकही खासदार…”

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका केली. ‘शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा एकही खासदार…

pimpri chinchwad marathi news, sanjog waghere marathi news
महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरेंनी घेतले अजित पवारांचे आशीर्वाद! मावळ लोकसभेत रंगली वेगळीच चर्चा

बैठकीत बारणेंनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचा उल्लेख करत अप्रत्यक्षरीत्या पार्थ पवारांच्या पराभवाचा उल्लेख केला होता.

What Abu Azmi Said?
अबू आझमींचं पक्ष सोडण्याच्या चर्चांवर उत्तर, म्हणाले; “होय मी नाराज आहे”

अबू आझमी अजित पवारांच्या नेतृत्वातल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या, त्यावर त्यांनी मौन सोडलं आहे.

Clean cheat, Ajit Pawar, code of conduct,
अजित पवारांना ‘क्लिन चीट’, ‘कचाकचा बटन दाबा’ वक्तव्य; आचारसंहिता भंगची तक्रार फेटाळली

‘विकास निधी हवा असेल तर मतदान यंत्रावरील बटण कचाकचा दाबा, नाहीतर निधी देताना आपला हात आखडता येईल’ असे वक्तव्य उपमुख्यमंत्री…

jayant patil, ajit pawar, jayant patil crticises ajit pawar, shivaji adhalrao patil, amol kolhe, shirur lok sabha seat, election campaign, public meet, lok sabha 2024, election 2024, marathi news, ncp sharad pawar,
पिंपरी : ज्यांना पाडले, त्यांचाच प्रचार; एवढी वाईट वेळ कोणावर येऊ नये… जयंत पाटील यांचा अजित पवारांना टोला

शिरूर लोकसभा मतदारसंघात ज्यांना पाडण्यासाठी सतत प्रयत्न केले, मागीलवेळी पाडले, त्यांनाच उमेदवारी देऊन त्यांच्याच प्रचार करण्याची वेळ उपमुख्यमंत्री अजित पवार…

Ajit pawar
निवडणूक आयोगाकडून अजित पवारांना दिलासा, आचारसंहितेचा भंग प्रकरणी क्लीन चिट

उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या बारामती लोकसभा मतदारसंघातील त्यांच्या पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा प्रचार करण्यात व्यस्त आहेत.

संबंधित बातम्या