scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

अजित पवार

 


अजित पवार हे महाराष्ट्र राज्यातील राजकारणी आहेत. त्यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी महाराष्ट्रातील बारामती येथे झाला. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी आतापर्यंत तीन वेळा महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. ते जुलै २०२३ पासून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी यापूर्वी २०१० ते २०१४ आणि २०१९ ते २०२१ असे दोन वेळा महाराष्ट्र राज्याचं उपमुख्यमंत्रिपद सांभाळलं आहे. अजित पवार हे एका राजकीय कुटुंबाचे सदस्य आहेत. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून ते आले आहेत. त्यांचे काका शरद पवार हे देशाच्या राजकारणातील प्रमुख व्यक्ती आहेत. अजित पवार यांनी बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयातून बॅचलर ऑफ कॉमर्स या पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठातून व्यवसाय प्रशासन (Business Administration) या विषयातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. १९९० मध्ये अजित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली. पुढे १९९१ मध्ये ते पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर विधानसभेच्या निवडणूकांमध्ये ते अनेकदा निवडून आले. त्यांनी राज्य सरकारमधील अनेक विभागांमध्ये विविध पदांवर काम केले आहे. जलसंपदा मंत्री आणि ऊर्जा मंत्री म्हणून काम करण्याचा त्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे.पवार त्यांच्याकडे असलेल्या प्रशासकीय कौशल्यासाठी प्रसिद्ध आहेत. राज्यामधील वेगवेगळे सिंचन प्रकल्प यशस्वीपणे राबविण्याचे श्रेय त्यांना जाते. पण जलसंपदा मंत्री असताना सिंचन प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचार केल्याचे आरोप करण्यात आले होते. कामामध्ये अनियमिततेच्या आरोपांसह अन्य वादांमध्येही ते अडकले होते. २०१९ मध्ये अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाशी युती करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या या निर्णयाने सर्वजण आश्चर्यचकित झाले होते. पुढे काही दिवसांनी त्यांनी वैयक्तिक कारण देत या पदाचा राजीनामा दिला. महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केल्यानंतर त्यांनी ते दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून महाराष्ट्रातील प्रमुख राजकिय व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत. कार्यक्षम प्रशासक म्हणून त्यांचा लौकिक असला, तरीही कामाप्रमाणे त्यांची राजकीय कारकीर्द ही वाद, भष्ट्राचाराच्या आरोपांसाठी प्रसिद्ध आहे. अजित पवार हे महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख भारतीय राजकारणी आहेत.


Read More
चांदणी चौक ते जांभूळवाडी रस्त्याचा ‘डीपीआर’ तयार करा- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आदेश

वाढत्या नागरीकरणामुळे शहरातील वाहतुकीवर मोठा ताण येत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्याने सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे,…

Ashtavinayak temple development plan news
अष्टविनायक मंदिर विकास आराखड्याला गती; वारसा अबाधित ठेवून कामे

अष्टविनायक मंदिरांच्या कामांना गती देण्यासंदर्भात मंदिर परिसर विकास आराखड्याची आढावा बैठक उपमुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी मंत्रालयात घेतली.

ncp ajit Pawar group workers interfering in Sarpanch Santosh Deshmukh murder case
santosh deshmukh murder case : संतोष देशमुख हत्या प्रकरणात अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांकडून हस्तक्षेप; भाऊ धनंजय देशमुख यांचा आरोप

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात थेट अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून हस्तक्षेप होत असल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे.

Aditi Tatkare On Ladki Bahin Yojana August Month Installment
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार? आदिती तटकरेंनी सांगितली तारीख

लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थी महिलांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी आजपासून (११ सप्टेंबर) वितरित करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आल्याची…

PMRDA Encroachment drive Chakan traffic congestion Pune nashik highway after Ajit Pawar inspection
अजित पवारांच्या पहाटेच्या दौऱ्यानंतर चाकणमधील अतिक्रमणे जमीनदोस्त! शासकीय यंत्रणांकडून थेट कारवाई सुरु…

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) पोलीस बंदोबस्तात या भागातील ४० अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली असून यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचे यावेळी…

Ajit Pawar
“महाराष्ट्रातील १०० पर्यटक नेपाळमध्ये अडकले”, अजित पवारांची माहिती; म्हणाले, “त्यांना परत आणण्यासाठी…”

Ajit Pawar on Nepal : अजित पवार म्हणाले, “नेपाळमधील राजकीय अस्थिरता आणि त्यामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तिथं अडकलेल्या महाराष्ट्रातील…

Maharashtra News Live updates
Maharashtra Breaking News Update: बंगळुरूत शिवाजी महाराजांचं नाव बदलून स्टेशनला ‘सेंट मेरी’ नाव; फडणवीस म्हणतात, “काँग्रेसची ही परंपरा नेहरूंपासूनची”

Mumbai Breaking News Updates: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

महिला अधिकाऱ्यांना धमकावत राजकीय हस्तक्षेप होणे चुकीचे – आमदार रोहित पाटील

कारवाई होत असताना राजकीय हस्तक्षेप होणे चुकीचे आहे असे आमदार रोहित पाटील येथे बोलताना म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री छगन भुजबळ (छायाचित्र पीटीआय)
अजित पवारांवर कुरघोडीचा प्रयत्न? आरक्षणावरून ओबीसी नेत्यांमध्येच जुंपली; दिवसभरात काय घडलं?

Todays Top Political News : आज दिवसभरातील पाच महत्वाच्या राजकीय घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

Ajit Pawar reaction on DSP Anjali Krishna controversy
IPS Anjana Krishna: अजित पवारांना भिडणाऱ्या IPS अंजना कृष्णा यांना तीन वेळा UPSC मध्ये आले होते अपयश? वडिलांनी सांगितली मुलीची यशोगाथा

IPS Officer Anjana Krishna: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एका फोन कॉलमुळे चर्चेत आलेल्या पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा यांचा आयपीएस अधिकारी…

Supriya Sule
IPS अंजना कृष्णा प्रकरणावरून सुप्रिया सुळे आक्रमक; अजित पवार यांना खडेबोल, गावगुंडांवर कारवाईची मागणी

सोलापूर जिल्ह्यातील कुर्डू गावात तलाठी, तहसीलदार यांना गावगुंडानी केलेल्या मारहाणीचा प्रकार राज्यासाठी अत्यंत निंदणीय असून महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही खपवून घेतली…

Rohit Pawar and Yugendra Pawar on IPS Anjana Krishna and Ajit pawar
9 Photos
IPS अंजना कृष्णा प्रकरणात पवार कुटुंबात दोन गट; एका पुतण्यानं केली पाठराखण, तर दुसऱ्यानं केली टीका

IPS Anjana Krishna Phone Call: IPS अंजना कृष्णा यांच्यावरून अजित पवारांवर टीका होत असताना त्यांच्या दोन पुतण्यांमध्ये मतमतांतरे असल्याचे समोर…

संबंधित बातम्या