२० नोव्हेंबर २०२० रोजी बिहारमध्ये सोळाव्या विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण झाला. सतराव्या बिहार विधानसभेसाठी सदस्य (Bihar Election) निवडण्यासाठी २०२० मध्ये निवडणुकांचे आयोजन करण्यात आले. ही प्रक्रिया ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान तीन टप्प्यांत घेण्यात आली. पहिल्या ७१ जागांसाठी २८ ऑक्टोबर २०२० रोजी, पुढील ९४ जागांसाठी ३ नोव्हेंबर २०२० रोजी आणि उर्वरित ७८ जागांसाठी ७ नोव्हेंबर २०२० रोजी मतदान पार पडले.
१० नोव्हेंबर २०२० रोजी मतमोजणीला सुरुवात झाली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे १२४ उमेदवार निवडून आले. तर महागठबंधनच्या विरोधी आघाडीने ११० जागा जिंकल्या. ७ जागा अन्य स्थानिक पक्षांनी जिंकल्या, तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला. बिहारमधील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नेते म्हणून नितीश कुमार यांची निवड करण्यात आली आणि ते सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले.Read More
Bihar Assembly Elections 2025 : विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाच्या वाटाघाटी सुरू होण्यापूर्वी रामविलास पासवान यांनी राज्याच्या राजकारणात रुची दाखवल्याने भाजपाप्रणीत राष्ट्रीय…
भाजपला आतापर्यंत बिहारमध्ये मुख्यमंत्री करता आला नाही. बहुसंख्य हिंदी भाषिक राज्यांमध्ये या पक्षाची सत्ता आहे. मात्र बिहारमध्ये राज्यव्यापी जनाधार असलेला…