scorecardresearch

करिअर

‘लोकसत्ता डॉट कॉम’च्या या सदरामध्ये करिअरसंबंधित माहिती देण्यात येईल. करिअर (Career) म्हणजे एखाद्याचा नोकरी-व्यवसायासंबंधीचा प्रवास. एखाद्याने विशिष्ट विषयाचे शिक्षण घेतल्यास त्याच क्षेत्रात तो कशी प्रगती करतो हा प्रवास म्हणजे एखाद्याचे करिअर किंवा एखाद्याने विशिष्ट क्षेत्रात व्यवसाय सुरू केल्यास त्याला मिळणारे यश म्हणजे त्याचे करिअर, असे मानतो. आजकालच्या तरुण पिढीला त्यांच्या भविष्यात चांगले करिअर घडवण्यासाठी मार्गदर्शन करणे अत्यंत आवश्यक आहे.


अनेकांचे शालेय जीवनात ध्येय ठरलेले असते; पण त्यांना पुढे जाऊन नेमके काय व्हायचे आहे आणि ठरवलेले ध्येय कसे पूर्ण करावे हे माहीत नसते. अनेकांना भविष्यात काय करायचे हे माहीत नसते किंवा ते कसे पूर्ण करायचे हे माहीत नसते. अशा वेळी या विद्यार्थ्यांना स्वत:ची आवड लक्षात घेऊन, करिअर म्हणून एका क्षेत्राची निवड करण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते.


हे मार्गदर्शन या सदरामधून केले जाते. दहावीनंतर नोकरी आणि करिअरचे कोणते पर्याय आहेत?, बारावीनंतर नोकरी आणि करिअरचे कोणते पर्याय आहेत? पदवी किंवा पदव्युत्तर शाखेतील विद्यार्थ्यांसाठी नोकरी किंवा करिअरचे कोणते पर्याय आहेत यांची माहिती तुम्हाला येथे मिळेल. कला, वाणिज्य, विज्ञान या शाखांतून शिक्षण घेतल्यास कोणकोणत्या नोकरीच्या संधी आहेत हे तुम्हाला येथे जाणून घेता येईल. डॉक्टर, इंजिनीयर, शिक्षक यांसह इतर विविध क्षेत्रांतील करिअर करण्याचे पर्याय कोणते हे जाणून घेता येईल. सरकारी नोकरीबाबत येथे नवनवीन माहिती तुम्हाला मिळू शकते. तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्रातील सरकारी नोकरी शोधत असाल, तर त्याची माहितीदेखील येथे मिळू शकते. नोकरी आणि करिअरसंबंधित सविस्तर मार्गदर्शन आणि ताज्या घडमोडींसाठी करिअर सदराला नक्की भेट द्या.


Read More
job shadowing in Organizations
पहिले पाऊल : ‘जॉब शॅडोइंग’

‘जॉब शॅडोइंग’ म्हणजे आपल्या कंपनीतील इतर विभागातील किंवा पदावरील एखाद्या सहकाऱ्याच्या मागे ‘छायेसारखे’ राहून त्याचे काम, दैनंदिन जबाबदाऱ्या आणि आवश्यक…

कृत्रिमप्रज्ञेच्या प्रांगणात : ‘हगिंग फेस’ संकेतस्थळाचे महत्त्व

एआयच्या क्षेत्रात शिरू पाहत असलेल्यांनी एआयसंबंधीच्या प्राथमिक विषयांची ओळख करून घेतल्यानंतर ‘हगिंग फेस‘ या इंटरनेटवरच्या अत्यंत महत्त्वाच्या संकेतस्थळाला भेट दिलीच पाहिजे.

TriNANO Technologies
नवउद्यमींची नवलाई : सौर ऊर्जेला तंत्रज्ञानाचे ‘कोटिंग’

या कोटिंगमुळे सौर पॅनेलचे आयुष्य तर वाढतेच शिवाय कार्यक्षमतेतही वाढ होते. सेठी यांच्या या प्रवासाबद्दल जाणून घेऊ त्यांच्याच शब्दांत…

lic aao notification 2025 | LIC AAO & AE Recruitment 2025 Details
LIC Recruitment 2025 : एलआयसीमध्ये ८१४ पदांची मेगाभरती! पगार एक लाखापेक्षा अधिक; जाणून घ्या ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

LIC AAO Notification 2025 : अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरतीसंदर्भात सविस्तर माहिती घ्यावी.

मातीतलं करिअर: दुग्ध व्यवसायातील संधी

शेती क्षेत्रात दिवसेंदिवस आमूलाग्र बदल होऊ लागले आहेत. त्यामुळे भविष्याच्या दृष्टीने शाश्वत पर्याय म्हणून शेती क्षेत्राकडे विद्यार्थी आशेने पाहू लागले…

Interview Competition Exam Personality Confidence
मुलाखतीच्या मुलखात: तुम्हीच तुमच्या यशाचे शिल्पकार

वाचक मित्रहो, या लेखमालेत आपण आता पर्यंत व्यक्तिमत्त्व चाचणीच्या तयारीचे अनेक पैलू बघितले. वेगवेगळ्या विषयांवर काय आणि कशा प्रकारचे प्रश्न येऊ…

Job Opportunity Deputy General Manager Positions
नोकरीची संधी: उपमहाव्यवस्थापक पदे

भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड ( BRBNMPL) बंगळुरू (रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पूर्ण मालकीची एक उपकंपनी) येथे डेप्युटी मॅनेजर आणि…

loksatta career UPSC Preparation Mains Exam Ethics
यूपीएससीची तयारी: मुख्य परीक्षा; नीतिशास्त्र-भाग २

नमस्कार विद्यार्थीमित्रांनो, या लेखात आपण यूपीएससी मुख्यपरीक्षेतील ‘जीएस ४’ म्हणजेच नीतिशास्त्र या पेपरमध्ये सुभाषितांवर आधारित तीन प्रश्न नियमितपणे विचारले जातात…

संबंधित बातम्या