scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

काँग्रेस

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना (INC) २८ डिसेंबर १८८५ मध्ये ब्रिटिश राज्याच्या काळात झाली होती. एलेन ऑक्टेवियन ह्यूम, दादाभाई नौरोजी आणि दिनशा वाचा यांनी या पक्षाची स्थापना केली होती. काँग्रेसचा अर्थ संघटना असा होतो. सुरुवातीच्या काळात या पक्षाचे नेतृत्व मवाळ गटाकडे होते. पुढे १९०६ ते १९१९ पर्यंत तिचे नेतृत्व जहाल गटाकडे होते. त्यानंतर १९२० ते १९४७ या काळामध्ये संपूर्ण काँग्रेसचे (Congress) नेतृत्व महात्मा गांधी यांनी केले.


भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे (INC) स्वातंत्र्य लढ्यात खूप मोठे योगदान आहे. या पक्षाने स्वातंत्र्य लढ्यात आणि त्यानंतर देशाच्या राजकारणातही मोठी भूमिका बजावली आहे. काँग्रेसला मानणारा मोठा जनसमूह या देशात आहे. जवाहरलाल नेहरू. इंदिरा गांधी. राजीव गांधी, लाल बहादूर शास्त्री, मनमोहन सिंह या काँग्रेस नेत्यांनी भारताचे पंतप्रधानपद भूषवले आहे. तर डॉ. राजेंद्र प्रसाद, फारुखउद्दीन अहमद, रामास्वामी वेंकटरमण, शंकर दयाल शर्मा, प्रतिभा पाटील, प्रणव मुखर्जी या काँग्रेस नेत्यांनी भारताचे राष्ट्रपतीपद भूषवले आहे.

सध्या मल्लिकार्जुन खरगे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पक्षाध्यक्ष आहे. २०२२ पासून ते काँग्रेस पक्षाध्यक्षपदाची धुरा वाहत आहेत. त्यांच्या अगोदर सोनिया गांधी या पक्षाध्यक्ष म्हणून पक्षाची सूत्रे हाताळत होत्या.


२०१४ मध्ये काँग्रेसला मोठा फटका बसला. भाजपा प्रणित लोकशाही आघाडीने २०१४ साली लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा जोरदार पराभव केला. काँग्रेस प्रणित सयुक्त पुरोगामी आघाडीचे केवळ ५९ सदस्य निवडून आले होते. यात एकट्या काँग्रेस पक्षाला केवळ ४४ जागांवर विजय मिळाला. तर, भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ३३६ जागा जिंकत सत्ता स्थापन केली होती. २०१९ मध्येही काँग्रेसला शंभरचा आकडा गाठता आलेला नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस प्रणित आघाडीला केवळ ९१ जागांवरच विजय मिळवता आला. यात काँग्रेसचा वाटा ५२ इतका होता. पक्षात प्रभावी नेतृत्वाचा अभाव, अकार्यक्षमता आणि नेत्यांची गळती ही कारणे पराभवाला कारणीभूत असल्याचे मानले जाते. मात्र २०२४ मध्ये काँग्रेसने इंडिया आघाडीच्या नेतृत्वात लोकसभा निवडणूक लढवली. यात २०१९ आणि २०१४ मध्ये मिळालेल्या जागांपेक्षा अधिक जागा जिंकण्यात तिला यश आले.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीने २३४ जागा जिंकल्या. यात काँग्रेसचा वाटा ९९ इतका आहे. इंडिया आघाडीला बहुमताचा २७२ चा आकडा गाठता आला नाही. भाजपाला तिसऱ्यांदा सत्ता स्थापनेची संधी मिळाली. परंतु, काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीच्या माध्यमातून संसदेत विरोधी बाकांवरील सदस्यांची संख्या वाढली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसची भारत जोडो यात्रा, न्याय यात्रा आणि भाजपविरोधातील पक्षांची मोट बांधण्यात काँग्रेसला आलेले यश हे सर्व या विजयाचे परिपाक असल्याचे मानले जाते.


 


Read More
Opposition sharply criticizes Ajit Pawar's 'that' case.
“सत्ताधारी पक्षातील सर्वांनाच सत्तेचा माज,” अजित पवारांच्या ‘त्या’ प्रकरणावर विरोधकांची सडकून टीका…

कुर्डू गावात बेकायदा मुरुम उपशावरील कारवाई थांबविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा यांना दूरध्वनी करून आदेश दिल्याची…

Congress Leader Manish Tewari Slams Donald Trump
“भारत एक भाकरी कमी खाईल पण…”; दबाव टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या ट्रम्पना काँग्रेस नेत्याने सुनावले

Manish Tewari Slams Donald Trump: भारताने ब्रिटिशांना दिलेल्या लढ्याची सध्याच्या परिस्थितीशी तुलना करत काँग्रेस नेते मनीष तिवारी म्हणाले की, भारत…

Former Mayor Anil Dhanorkar joined BJP.
खासदार धानोरकरांच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसला भगदाड! माजी नगरसेवक व बाजार समिती संचालक भाजपमध्ये…

काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांचा बालेकिल्ला असलेल्या भद्रावती-वरोरा विधानसभा मतदारसंघात आता काँग्रेस पक्षाची स्थिती खिळखिळी झाली आहे.

The accusation of vote rigging is on the Congress itself; Bawankule's question
मतचोरीचा आरोप उलटा काँग्रेसवरच; बावनकुळेंचा सवाल, जिथे पदयात्रा तिथेच मताधिक्य?

काँग्रेसने कामठी येथे ‘वोट चोर गद्दी छोड’ राज्यस्तरीय निधेष मेळावा बुधवारी आयोजित केला होता. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते…

The National OBC Federation has started a chain hunger strike at Samvidhan Chowk in Nagpur
Breaking :राष्ट्रीय ओबीसी महासंघात फूट, काँग्रेस नेत्यांची वेगळी चूल

राष्ट्रीय ओबीसी महासंघ विधानसभा निवडणुकीपासून भाजपच्या जवळ गेल्याची भावना समाजात आहे. त्यामुळे या महासंघातील अनेक पदाधिकाऱ्यांनी साखळी उपोषणापासून फारकत घेतली…

Congress leader Umang Singhar comment on hindu tribal
“आम्ही हिंदू नाही, तर…”, काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यानं मध्य प्रदेशात नवा वाद

Congress leader Umang Singhar: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आदिवासींना हिंदू धर्मात ओढू पाहत आहे, असे विरोधी पक्षनेते उमंग सिंघार म्हणाले.

बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी (छायाचित्र सोशल मीडिया)
केरळ काँग्रेसच्या ‘बिडी…’ पोस्टवरून बिहारमध्ये रणकंदन; भाजपाने काय आरोप केले?

Bihar Political Controversy 2025 : केरळमधील काँग्रेसच्या पोस्टमुळे बिहारमध्ये वाद का निर्माण झाला? त्याबाबत जाणून घेऊ…

MLA Thackeray, Vanjari welcome the celebration of Eid Miladunnabi
आमदार ठाकरे, वंजारी यांच्याकडून जश्ने ईद मिलादुन्नबी मिवरणुकीचे स्वागत

मिरवणुकीची सुरुवात ‘परचम कुशाई’ या पारंपरिक विधीने झाली. नागपूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व आमदार विकास ठाकरे, आमदार ॲड. अभिजीत…

new GST rate structure politics loksatta news
जीएसटी दररचनेवरून दावे-प्रतिदावे, राज्यांना आणखी ५ वर्षे भरपाई देण्याची काँग्रेसची मागणी

‘जीएसटी’ परिषदेने वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) दररचनेत पूर्ण फेरबदल करण्यास मान्यता दिल्यानंतर केंद्रातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून आरोप प्रत्यारोप…

संबंधित बातम्या