भारताला ७.५१६.६ किमीचा समुद्रकिनारा लाभला आहे. भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र, पूर्वेला बंगालचा उपसागर आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे. त्यामुळे समुद्रमार्गे आपल्या देशावर हल्ला होऊ शकतो. हे हल्ले रोखण्याचे काम भारतीय नौदल करते. भारतीय नौदलाला (Indian Navy) मोठा इतिहास आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांना भारतीय नौदलाचे जनक असे म्हटले जाते. त्यांनी समुद्री आरमार दल स्थापन केले होते. पुढे इ.स. १९३४ मध्ये ब्रिटीशांनी ‘रॉयल इंडियन नेव्ही’ची (आरआयएन) स्थापना केली.स्वातंत्र्यप्राप्तीमध्ये भारतीय नौदलातील सैनिकांनी मोठी कामगिरी बजावली होती. १९७१ मध्ये झालेल्या युद्धामध्ये नौदलाने प्रमुख भूमिका बजावली होती. ४ डिसेंबर रोजी त्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले होते. हा दिवस दरवर्षी नौदल दिवस म्हणून साजरा केला जातो. सध्या अॅडमिरल आर. हरी कुमार हे नौदलाचे प्रमुख आहेत. भारतीय समुद्री सीमांचे रक्षण करणे हे या दलाचे प्रमुख ध्येय आहे.
भारतीय नौदल (Indian Navy) हे जगातील पाचव्या क्रमांकाचे नौदल आहे. नौदलाकडे १५५ युद्धनौका आणि काही पाणबुड्या आहे. तसेच नौदलाच्या हवाई शाखेत शस्त्रसज्ज हेलिकॉप्टर्स व लढाऊ विमानांच्या तुकड्या आहेत.Read More
Operation Sindoor Updates: पाकिस्तानी ड्रोन आणि क्षेपणास्त्र विमानांनी जम्मू काश्मीरपासून पंजाब, राजस्थान आणि गुजरातपर्यंतच्या शहरांमधील भारतीय लष्करी तळांना लक्ष्य करण्याचे…
Operation Sindoor Updates: कर्नल सोफिया कुरेशी यांची लष्करी पार्श्वभूमी उत्कृष्ट आहे. त्यांचे आजोबाही भारतीय सैन्यात होते. त्यांचे लग्न सैन्यातीलच एका…
Rafale Marine fighter aircraft in india नौदलाची ताकद वाढविण्यासाठी म्हणून भारत सरकारने बुधवारी फ्रान्सबरोबर महत्त्वपूर्ण करार केला आहे. या करारांतर्गत…
पुण्यात मुख्यालय असलेल्या किर्लोस्कर ऑइल इंजिन्स कंपनीकडून या प्रकल्पांतर्गत विकसित होणाऱ्या प्रारूप डिझेल इंजिनमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त स्थानिक घटकांचा वापर…