Virat Kohli creates unique record in RCB 250th match : हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबादचे संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात आरसीबी संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने विराट कोहली आणि रजत पाटीदारच्या अर्धशतकाच्या जोरावर ६ गडी गमावून २०६ धावांचा डोंगर उभारला. दरम्यान या सामन्यात विराट कोहलीने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने असा विक्रम केला आहे, जो आयपीएलच्या इतिहासात याआधी कोणत्याही खेळाडूला करता आला नाही.

विराटच्या नावावर खास विक्रमाची झाली नोंद –

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध खेळला जाणारा सामना हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या आयपीएल इतिहासातील २५० वा सामना आहे. तर विराट कोहली आरसीबीच्या पहिल्या सत्रापासून संघासोबत आहे. आयपीएलच्या इतिहासातील तो पहिला खेळाडू ठरला आहे, जो संघाच्या पहिल्या आणि २५० व्या अशा दोन्ही सामन्यांच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग आहे. याआधी केवळ मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये २५० किंवा त्याहून अधिक सामने खेळले आहेत. पण मुंबईच्या २५० व्या सामन्यात संघाच्या पहिल्या सामन्यात खेळलेला एकही खेळाडू नव्हता. या सामन्यात विराट कोहलीने ४३ चेंडूचा सामना करताना ४ चौकार आणि १ षटकार मारत ५१ धावांची खेळी साकारली.

England scored more than 400 runs in both innings
ENG vs WI 2nd Test : इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुद्ध रचला इतिहास, कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच केला ‘हा’ मोठा पराक्रम
Sanju Samson 110m Six Video viral
Sanju Samson : सॅमसनने ११० मीटरचा षटकार ठोकत केला मोठा पराक्रम, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला सातवा भारतीय
Abhishek Sharma Unique Record
IND vs ZIM: अभिषेक शर्माचा पदार्पणाच्या मालिकेत अनोखा विक्रम, टी-२० मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा भारताचा पहिला खेळाडू
Yashasvi Jaiswal 13 run on 1st legal delivery in T20I
IND vs ZIM: एका चेंडूत १३ धावा! यशस्वी जैस्वालचा दुर्मिळ विक्रम, T20I च्या इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा पहिला फलंदाज
Sikandar Raza completes 2000 runs in t20 cricket
IND vs ZIM 4th T20I : सिकंदर रझाने रचला इतिहास, झिम्बाब्वेसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू
Virat Kohli Only Player to Win 4 ICC Trophies
Virat Kohli: किंग कोहली! जागतिक क्रिकेटच्या इतिहासात ४ आयसीसी ट्रॉफी पटकावणारा एकमेव खेळाडू
Rishabh Pant scripts history, becomes first Indian to get out on duck in T20 World Cup final
IND vs SA Final : ऋषभ पंतने टी-२० विश्वचषकात केला विक्रम, फायनलमध्ये अशा प्रकारे आऊट होणारा ठरला पहिलाच भारतीय
India Women Cricket Team Scored Highest Ever Team Total In Womens Test
INDW vs SAW: भारताच्या लेकींचा विश्वविक्रम, ९० वर्षांच्या महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ही कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ

जयदेव उनाडकटसाठीही ठरला खास सामना –

जयदेव उनाडकटसाठीही हा सामना खूप खास आहे. जयदेव उनाडकटच्या आयपीएल कारकिर्दीतील हा १०० वा सामना आहे. १०० किंवा त्याहून अधिक सामने खेळणारा जयदेव उनाडकट आयपीएलमधील ६६ वा खेळाडू ठरला आहे. जयदेव उनाडकट २०१० पासून आयपीएलमध्ये खेळत आहे. त्याचबरोबर या मोसमातील त्याचा हा सहावा सामना आहे. या खास सामन्यात अविस्मरणीय कामगिरी केली आहे. त्याने या सामन्यात ३० धावा देत ३ विकेट्स आपल्या नावावर केल्या.

हेही वाचा – Guy Whittall : धक्कादायक! माजी क्रिकेटरवर बिबट्याचा जीवघेणा हल्ला, कुत्र्याने वाचवला जीव, रक्ताने माखलेला फोटो व्हायरल

आरसीबीला शानदार सुरुवात करुन देताना विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस यांनी चौथे षटक संपण्यापूर्वीच ४८ धावांवर पोहोचवले होते. डु प्लेसिस ४८ धावांवर बाद झाला, त्याने १२ चेंडूत २५ धावा केल्या. यानंतर विल जॅक केवळ ६ धावा करून बाद झाला. दरम्यान, विराट कोहली आणि रजत पाटीदार यांच्यातील ६५ धावांच्या भागीदारीने आरसीबीचा डाव सावरला आहे. १५ षटकांनंतर आरसीबीची धावसंख्या ४ गड्यांच्या मोबदल्यात १४२ धावा होती, पण येथून कॅमेरून ग्रीनचे वादळ आले. पुढच्या ३ षटकांत सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांनी ३७ धावा दिल्या.

हेही वाचा – IPL 2024 : अक्षर पटेलने ‘इम्पॅक्ट प्लेयर’च्या नियमावर उपस्थित केला प्रश्न, सांगितले ‘या’ खेळाडूंसाठी का आहे धोकायदायक?

सनरायझर्स हैदराबादसमोर २०७ धावांचे लक्ष्य –

त्यामुळे आरसीबी संघाने १८ षटकांत १७९ धावा केल्या होत्या. शेवटच्या २ षटकांमध्येही आरसीबीचे फलंदाज आक्रमकपणे बॅट फलंदाजी करताना दिसले. एसआरएच कर्णधार पॅट कमिन्सने पहिल्यादा १९व्या षटकात १५ धावा दिल्या, तर टी नटराजननेही शेवटच्या षटकात १२ धावा दिल्या. यासह २०० धावांचा टप्पा पार करण्यात आरसीबी संघाला यश आले. आरसीबीकडून रजत पाटीदारने अवघ्या २० चेंडूत ५० धावा केल्या. शेवटी कॅमेरून ग्रीन २० चेंडूत ३७ धावा करून नाबाद परतला. त्यामुळे आरसीबीने एसआरएचसमोर २०७ धावांचे लक्ष्य ठेवले. हैदराबादकडून जयदेव उनाडकटने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.