भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना सुरू झाला आहे. या सामन्यात यजमान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण यादरम्यान टीम इंडियाचा कर्णधार केएल राहुलचा एक आश्चर्यकारक निर्णय समोर आला आहे. गेल्या सामन्यातील ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरलेला फिरकी मास्टर कुलदीप यादवला त्याने प्लेइंग इलेव्हनमधून वगळले आहे. ज्यावर अनेक लोक संतापले. त्यापैकी एक नाव आहे भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांचे!

गेल्या सामन्यात फिरकी गोलंदाजांना मदत मिळत नाही अशा खेळपट्टीवर कुलदीप यादवने अप्रतिम गोलंदाजी केली. पहिल्या डावात त्याने यजमान संघाच्या ५ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता, तर दुसऱ्या डावातही त्याने तीन बळी घेतले होते. या कामगिरीनंतरही त्याला दुसऱ्या सामन्यात वगळण्यात आले. तर मीरपूरची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी उपयुक्त आहे. चायनामन गोलंदाजाच्या जागी जयदेव उनाडकटचा संघात समावेश करण्यात आला आहे. सुनील गावसकर यांनी या निर्णयावर अतिशय प्रामाणिक प्रतिक्रिया दिली आहे.

Michael Vaughan Claims Rohit Sharma to join CSK next year
IPL 2024 : ‘पुढच्या वर्षी रोहित चेन्नईकडून खेळताना दिसणार…’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा मोठा दावा
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
Mumbai Indians Vs Delhi Capitals Delhi Capitals Match Updates in Marathi
MI vs DC : रोहित शर्माने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध रचला इतिहास, ‘हा’ विक्रम करणारा विराट कोहलीनंतर ठरला दुसराच खेळाडू
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक

हेही वाचा:   Flashback 2022: फेडररच्या फेअरवेल सामना ते नीरज चोप्रा आणि मेस्सीचे सोनेरी यश, अशी ठरली यावर्षीच्या क्रीडा जगताची सफर

बळीचा बकरा कुलदीप यादव

राहुलच्या निर्णयाबाबत गावसकर म्हणाले, “मॅन ऑफ द मॅचला वगळणे अविश्वसनीय आहे. हा एकमेव शब्द आहे जो मी वापरू शकतो आणि तो सौम्य शब्द आहे. मला खूप कठोर शब्द वापरायचे आहेत, परंतु आपण सामनावीर सोडला आहे हे अविश्वसनीय आहे. ज्याने २० पैकी आठ बळी घेतले. ते पुढे बोलताना म्हणाले की, “तुमच्याकडे आणखी दोन फिरकीपटू संघात होते. त्यापैकी एकाला नक्कीच बाहेर करता आले असते. पण आज ज्या पद्धतीने खेळपट्टी दिसत आहे, त्यावरून आठ गडी बाद करणारा गोलंदाज खेळायला हवा होता, असे माझे मत आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाने यावर आणखी प्रकाश टाकावा.”

जयदेव उनाडकटची धमाकेदार सुरूवात

दोन्ही संघांमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात असून भारताने पहिला सामना १८८ धावांनी जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. यातील दुसऱ्या सामन्याला गुरूवारी (२२ डिसेंबर) सुरूवात झाली. ज्यामध्ये भारताच्या कसोटी संघात १२ वर्षानंतर परतणाऱ्या जयदेव उनाडकटने पहिली विकेट घेतली. मध्यमगती वेगवान गोलंदाज असलेला जयदेव उनाडकट याच्या या विकेटचे कौतुक म्हणजे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ही पहिलीच विकेट ठरली आहे. त्याने बांगलादेशच्या झाकिर हसन याला कर्णधार केएल राहुल याच्याकरवी झेलबाद केले. उपहारानंतर सध्या बांगलादेशची धावसंख्या ९३/३ अशी झाली आहे. नजमुल हुसेन शांतो २३ (५०), झाकीर हसन १५ (३४) आणि कर्णधार शाकीब हसन १६ (३९) हे तीनही फलंदाज माघारी परतले आहेत. अश्विन, उनाडकट आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.