महाराष्ट्र दिन २०२५

१ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १ मे १९६० रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. भाषावर प्रांत रचना कायदा लागू केल्यानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीमुळे मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. राज्यनिर्मितीच्या या लढ्यामध्ये अनेक नागरिकांनी योगदान दिले. चळवळीदरम्यान १०६ हुतात्मांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. महाराष्ट्राची निर्मिती व्हावी या उद्देशाने योगदान दिलेल्या हजारोंच्या बलिदानाचे स्मरण व्हावे यासाठीही महाराष्ट्र दिन साजरा केला जातो.
<br /> ब्रिटीशांचे भारतावर वर्चस्व असताना त्यांनी बंगाल प्रेसिडन्सी, मद्रास प्रेसिडन्सी आणि बॉम्बे प्रेसिडन्सी या तीन भागांमध्ये देशाचे विभाजन केले होते. यातील बॉम्बे प्रेसिडन्सीमध्ये आत्ताच्या गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ या राज्यांमधील बराचसा भाग येत होता. पुढे १९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाले. पुढे १९५६ मध्ये भाषावार राज्य पुनर्रचना कायद्यानुसार अनेक राज्यांची निर्मिती व्हायला सुरुवात झाली. पारतंत्र्यामध्ये असताना कॉंग्रेसद्वारे भाषावार प्रांत रचना हा मुद्दा मांडण्यात आला होता. या कायद्याला धरुन महाराष्ट्र एकीकरण आणि राज्यनिर्मितीचा प्रस्ताव मांडण्यात आला.

तेव्हा बॉम्बे प्रेसिडन्सीचे प्रमुख केंद्र मुंबई शहर होते. मुंबईमध्ये मराठी, कोंकणी, गुजराती (कच्छी) लोक मोठ्या प्रमाणात राहत होते. गुजराती लोकांनी स्वतंत्र राज्यांची मागणी केल्यानंतर महाराष्ट्रासाठीही जोरदार प्रयत्न होऊ लागले. पुढे याला आंदोलनाचे स्वरुप आले. महाराष्ट्र राज्य स्वतंत्र व्हावे आणि मुंबई राज्याची राजधानी बनावी असे प्रस्ताव मांडले गेले. मुंबईत मराठी लोकांप्रमाणे गुजराती लोकसंख्या जास्त असल्याने मुंबई गुजरात राज्यामध्ये जावी किंवा ती स्वतंत्र राहावी असे गुजराती समूहाचे मत होते. या प्रकरणावरुन मुंबईसह महाराष्ट्रभर आंदोलन होऊ लागले.

पुढे २१ नोव्हेंबर १९५६ फ्लोरा फाउंटनच्या परिसरात मोठा जनसमूदाय महाराष्ट्र राज्याची निर्मिती व्हावी यासाठी एकत्र आला होता. तेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी तेव्हाचे मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी पोलिसांना आंदोलनकर्त्यांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले. यामध्ये १०६ हुतात्म्यांचा जीव गेला. यावरुन प्रकरण अधिकच तापले. सरकारविरोधात कारवायांचे प्रमाण वाढत गेले. काही महिन्यांनी सरकारने नमतं घेत भूमिका बदलली. गोळीबाराच्या प्रकरणानंतर चार वर्षांनी १ मे, इ.स. १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली.
Read More
Two new Marathi films were announced on May 1st marking Maharashtra Day
महाराष्ट्रदिनी दोन नवीन मराठी चित्रपटांची घोषणा, वाचा नेमक्या कोणत्या चित्रपटांची घोषणा?

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ आणि ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चित्रपटांची घोषणा

Governor C P Radhakrishnan appealed to all of us to work towards making Maharashtra a modern strong and advanced state
विकसित भारतासाठी प्रगत महाराष्ट्र घडवू; राज्यपाल राधाकृष्णन यांचे आवाहन, राज्याचा ६६ वा स्थापना दिन साजरा

अमृत काळामध्ये भारताला ‘विकसित राष्ट्र’ बनविण्याचे ध्येय साध्य करताना महाराष्ट्राचे योगदान महत्त्वाचे असेल.

alia bhatt marathi look
9 Photos
स्लिव्हलेस ब्लाऊज, हातात गजरा अन्…; आलिया भट्टने नेसली नऊवारी साडी, कारण आहे खूपच खास…

Alia Bhatt Marathi Look Photos: आलिया भट्टने महाराष्ट्र दिनानिमित्त केला खास मराठी लूक, फोटो पाहिलेत का?

buldhana gram panchayat employees strike
कामगार दिनी ६० हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन, बेमुदत आंदोलनाचा इशारा…

राज्यातील लाखो कामगार व कर्मचाऱ्यांनी आज १ मे, कामगार तथा महाराष्ट्र दिन विविध कार्यक्रमांनी साजरा केला.

Maharashtra day oppose Nagpur
उपराजधानीत महाराष्ट्र दिनाचा निषेध, काळा दिवस पाळत विदर्भाचा झेंडा…

कार्यकर्त्यांनी काळे कपडे, डोक्याला व बाजूला काळी पट्टी बांधून निषेध नोंदविण्यात आला व नारे निर्देशन करण्यात आले.

Narendra Modi On Maharashtra Day 2025
Narendra Modi : “राज्य प्रगतीचा एक मजबूत आधारस्तंभ”, पंतप्रधान मोदींनी मराठीत दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट शेअर करत महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत.

1st may maharashtra day
गर्जायला हवा, पण अलीकडे गर्जतच नाही महाराष्ट्र माझा… प्रीमियम स्टोरी

फक्त ‘जय महाराष्ट्र’ म्हणून बदल होणार नाही तर कोणत्या गोष्टी महाराष्ट्राच्या विकासाच्या आड येतात त्या गोष्टीचा विचार करायला हवा.

On 1st may Maharashtra Day composed the melody of our state anthem
‘या’ गीताच्या संगीतकार लता मंगेशकर नाहीत? प्रीमियम स्टोरी

आज महाराष्ट्र दिनी (१ मे) ‘प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा’ हे महाराष्ट्र गौरवगीत ठिकठिकाणी हमखास कानी पडेल. पण आपण…

insurance coverage for workers in Maharashtra | Maharashtra insurance policy for employees
योजना कर्मचाऱ्यांसाठी, नियंत्रण सरकारचे!

मगारांच्या प्रश्नांचे स्वरूप गेल्या दोन-तीन दशकांत अधिक व्यामिश्र झाले आहे. अशा परिस्थितीत कामगार कायदे व संबंधित योजना टिकवून ठेवणे आव्हानात्मक…

Why Maharashtra Day
“जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा!”, १ मे रोजी का साजरा केला जातो महाराष्ट्र दिन? जाणून घ्या इतिहास अन् महत्त्व प्रीमियम स्टोरी

महाराष्ट्र राज्याची निर्मिती कशी झाली तुम्हाला माहिती आहे का?

Happy Maharashtra Day 2025 Wishes in Marathi
Maharashtra Day Wishes: महाराष्ट्र दिनाच्या द्या मराळमोळ्या शुभेच्छा! प्रियजनांना WhatsApp Status, Facebook Messagesवर पाठवा खास शुभेच्छा संदेश

Happy Maharashtra Day 2025 Wishes : दरवर्षी १ मे रोजी महाराष्ट्र दिन जल्लोषात साजरा केला जातो कारण याच दिवशी आपल्या…

A special cleanliness drive will be implemented in Palghar district on Maharashtra Day by the Guardian Minister said Sanitation Minister Gulabrao Patil
महाराष्ट्र दिनी स्वच्छता अभियानाचा शुभारंभ ;ग्रामस्थांनी सहभागी होण्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

या अभियानात मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

संबंधित बातम्या