scorecardresearch

महाराष्ट्र दिन २०२४ News

१ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १ मे १९६० रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. भाषावर प्रांत रचना कायदा लागू केल्यानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीमुळे मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. राज्यनिर्मितीच्या या लढ्यामध्ये अनेक नागरिकांनी योगदान दिले. चळवळीदरम्यान १०६ हुतात्मांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. महाराष्ट्राची निर्मिती व्हावी या उद्देशाने योगदान दिलेल्या हजारोंच्या बलिदानाचे स्मरण व्हावे यासाठीही महाराष्ट्र दिन साजरा केला जातो.
<br /> ब्रिटीशांचे भारतावर वर्चस्व असताना त्यांनी बंगाल प्रेसिडन्सी, मद्रास प्रेसिडन्सी आणि बॉम्बे प्रेसिडन्सी या तीन भागांमध्ये देशाचे विभाजन केले होते. यातील बॉम्बे प्रेसिडन्सीमध्ये आत्ताच्या गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ या राज्यांमधील बराचसा भाग येत होता. पुढे १९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाले. पुढे १९५६ मध्ये भाषावार राज्य पुनर्रचना कायद्यानुसार अनेक राज्यांची निर्मिती व्हायला सुरुवात झाली. पारतंत्र्यामध्ये असताना कॉंग्रेसद्वारे भाषावार प्रांत रचना हा मुद्दा मांडण्यात आला होता. या कायद्याला धरुन महाराष्ट्र एकीकरण आणि राज्यनिर्मितीचा प्रस्ताव मांडण्यात आला.

तेव्हा बॉम्बे प्रेसिडन्सीचे प्रमुख केंद्र मुंबई शहर होते. मुंबईमध्ये मराठी, कोंकणी, गुजराती (कच्छी) लोक मोठ्या प्रमाणात राहत होते. गुजराती लोकांनी स्वतंत्र राज्यांची मागणी केल्यानंतर महाराष्ट्रासाठीही जोरदार प्रयत्न होऊ लागले. पुढे याला आंदोलनाचे स्वरुप आले. महाराष्ट्र राज्य स्वतंत्र व्हावे आणि मुंबई राज्याची राजधानी बनावी असे प्रस्ताव मांडले गेले. मुंबईत मराठी लोकांप्रमाणे गुजराती लोकसंख्या जास्त असल्याने मुंबई गुजरात राज्यामध्ये जावी किंवा ती स्वतंत्र राहावी असे गुजराती समूहाचे मत होते. या प्रकरणावरुन मुंबईसह महाराष्ट्रभर आंदोलन होऊ लागले.

पुढे २१ नोव्हेंबर १९५६ फ्लोरा फाउंटनच्या परिसरात मोठा जनसमूदाय महाराष्ट्र राज्याची निर्मिती व्हावी यासाठी एकत्र आला होता. तेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी तेव्हाचे मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी पोलिसांना आंदोलनकर्त्यांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले. यामध्ये १०६ हुतात्म्यांचा जीव गेला. यावरुन प्रकरण अधिकच तापले. सरकारविरोधात कारवायांचे प्रमाण वाढत गेले. काही महिन्यांनी सरकारने नमतं घेत भूमिका बदलली. गोळीबाराच्या प्रकरणानंतर चार वर्षांनी १ मे, इ.स. १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली.
Read More
Marathwada Corruption in irrigation sector in Maharashtra Water shortage Maharashtra Day 2024
मराठवाडा: होय, आम्ही पैसे पाण्यात घालतो!

भर दुपारी एका बैलगाडीत महाराष्ट्रातील सिंचन क्षेत्रातील भ्रष्टाचाराचे पुरावे घेऊन भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे सिंचन आयोगाच्या कार्यालयाकडे…

North Maharashtra Tribal farmers questions Maharashtra Day 2024
उत्तर महाराष्ट्र: शेती आहे, उद्योग आहेत, पण..

काही वर्षांपूर्वी कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठातील काही अर्थतज्ज्ञ महाराष्ट्रातील  ग्रामीण अर्थकारणाचा अभ्यास करण्यासाठी आले होते.

Mumbai Maharashtra Day 2024 Mumbai wants more autonomy
मुंबई: मुंबईला हवी अधिक स्वायत्तता !

या आठवडय़ात येऊ घातलेला महाराष्ट्रदिन (१ मे) हा महाराष्ट्रासारख्या प्रगतिशील, पुरोगामी राज्यासाठी महत्त्वाचा दिवस. तो दरवर्षी मोठय़ा धूमधडय़ाक्याने साजरा होतो.

balasaheb thackeray aapla dawakhana
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कौल आळी, घणसोली येथे ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ कार्यान्वित

आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या शुभ हस्ते घणसोली येथील ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’चे उद्घाटन अनौपचारिकरीत्या फीत कापून करण्यात आले.

sudhir mungantiwar attend flag hoisting ceremony on occasion of 63rd maharashtra day at police headquarters
“महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी वाघासारखा पराक्रम करावा लागेल”, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन; म्हणाले…

चंद्रपूर:जगातील १९३ देशांपैकी १४ देशांमध्ये वाघ आहेत. त्यातील ६५ टक्के वाघ भारतात आहेत. पण संपूर्ण जगात सर्वाधिक वाघ असलेला चंद्रपूर…

ajit pawar
अजित पवारांनी ‘महाराष्ट्र दिनी’ सीमाभागाबाबत केला ‘हा’ निर्धार; ‘कामगार दिना’च्या शुभेच्छा देत म्हणाले…

“महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, पक्षभेद विसरुन विकासाच्या मुद्यावर एकत्र येऊया,” असं आवाहन अजित पवारांनी केलं आहे.

mns chief raj thackeray special post on social media on the occasion of maharashtra din sgk 96
Video : “जे मी जगात पाहिलंय…”, महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “अख्ख्या जगाला…”

या व्हिडीओमध्ये राज ठाकरेंचा आवाज ऐकू येत असून “आपणा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा” असा संदेशही या व्हिडीओच्या माध्यमातून देण्यात…