scorecardresearch

नवरात्री २०२५

नवरात्र, नवरात्री किंवा नवरात्रोत्सव हा (Navratri 2025) भारतासह जगभरामध्ये साजरा केला जातो. हिंदू शास्त्राप्रमाणे दर वर्षी ‘शारदीय नवरात्री’, ‘चैत्र नवरात्री’, ‘माघ गुप्त नवरात्री’ आणि ‘आषाढ गुप्त नवरात्री’ असे चार उत्सव पाहायला मिळतात. असे असले तरी बऱ्याच ठिकाणी प्रामुख्याने शारदीय नवरात्रोत्सव आणि चैत्र नवरात्रोत्सव साजरा होत असल्याचे पाहायला मिळते. शारदीय नवरात्रोत्सव हा शरद ऋतूमधील आश्विन या महिन्यामध्ये (सप्टेंबर-ऑक्टोबर) असतो. शरद ऋतूमुळे याला “शारदीय नवरात्रोत्सव” (Shardiya Navratri )असे म्हटले जाते. तर चैत्र या हिंदू कॅलेंडरमधील पहिल्या महिन्यामध्ये जो नवरात्रोत्सव असतो त्याला “चैत्र नवरात्रोत्सव” असे म्हणण्याची आपल्याकडे पद्धत आहे. हा उत्सव मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये असतो.


नवरात्रोत्सव (Navratriutsav) या शब्दाची फोड केल्यास त्याचा अर्थ ‘नऊ रात्रींचा उत्सव’ असा होतो. पौराणिक कथांनुसार, महिषासुर नावाचा एक राक्षस मानवांसह देवांनाही त्रास देत होता. त्याने ब्रह्मदेवाची साधना करुन एक वरदान प्राप्त केले होते. या वरदानाच्या बळावर महिषासुरने सर्वत्र हाहाकार माजवला होता. तेव्हा महिषासुरला रोखण्यासाठी देवांनी एकत्र येत आदिशक्तीचे आवाहन केले. आदिशक्तीने दुर्गा हे रुप घेतले. पुढे दुर्गादेवीने महिषासुरच्या विरोधात युद्ध पुकारले. नवरात्रोत्सवच्या नऊ दिवसांमध्ये हे युद्ध सुरु होते असे म्हटले जाते. युद्धाच्या दहाव्या दिवशी म्हणजेच दसऱ्याला दुर्गा देवीने महिषासुरचा वध केला. अंधकारावरचा हा तेजस्वी विजय साजरा करण्यासाठी आपल्याकडे दसरा साजरा केला जातो. या सणाद्वारे विश्वातील स्त्री तत्वाचे महत्त्वदेखील अधोरेखित केले जाते.


नवरात्रोत्सव हा भारतात प्रांतवार पद्धतीने बदलत जातो. महाराष्ट्र, गुजरात व अन्य काही भागांमध्ये नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे आश्विन प्रतिपदेच्या दिवशी घट बसवले जातात. यामुळेच या दिवसाला घटस्थापना असे नाव पडले. पश्चिम बंगाल तसेच त्याच्या आसपासच्या प्रदेशामध्ये दुर्गा देवीच्या मोठमोठ्या मूर्ती पाहायला मिळतात. प्रत्येक प्रदेशामध्ये आपापल्या पद्धतीने हा सण मोठ्या जल्लोषात साजरा होत असतो. गुजरात आणि पश्चिम बंगाल या ठिकाणी नवरात्रोत्सवाची मोठी धुम असते. मुंबई-महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सव असतो, अगदी त्याच प्रमाणात प.बंगाल त्यातही कोलकातामध्ये नवरात्रीचा जल्लोष असतो. तसेच नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये गुजरातमध्ये दांडिया-गरबा (Garba- Dandiya) खेळत आनंद लुटत असतात.


Read More
Crowds of chicken, mutton and fish eaters throng the market as the festival ends
अबब! सणवार संपताच चिकन, मटण, मासे खाणाऱ्यांची बाजारात गर्दी; सध्याचे वाढलेले दर माहिती आहे का?

गेल्या काही आठवड्यांपासून उत्सवांमुळे अनेकांनी मांसाहाराकडे पाठ फिरवली होती. मात्र, सण उत्सव संपताच मांसाहारींनी पुन्हा बाजाराकडे धाव घेतली आहे.

Nitesh Rane
नवरात्रीतलं अंडीफेक प्रकरण पेटलं, नितेश राणे म्हणाले.. आम्ही तुमच्या घराबाहेर….

मिरा रोड येथे नवरात्रीच्या काळात अंडे फेकल्याच्या प्रकारानंतर हे प्रकरण चांगलेच पेटून उठले आहे. या इमारतीला नुकतीच मंत्री नितेश राणे…

Durga Mata Sahasrachandi Yaga begins in Satara
साताऱ्यात दुर्गामाता सहस्त्रचंडी यागाला प्रारंभ

खासदार उदयनराजे भोसले व त्यांच्या पत्नी दमयंतीराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत वेदमूर्ती ओंकार शास्त्री बोडस यांच्या मार्गदर्शनाखाली प्रधान संकल्प सोडून…

Nita Ambani performs special Dandiya dance
मी बालपणी नवरात्राच्या नऊ रात्री नाचत असे’, नीता अंबानींनी फाल्गुनी पाठकबरोबर केले खास दांडिया नृत्य; Video Viral

फाल्गुनी पाठक यांच्या गाण्यांवर दांडिया खेळल्याशिवाय नवरात्रोत्सव पूर्ण होऊ शकत नाही. सोशल मीडियावर त्यांच्या गाण्यावर थिरकणाऱ्यांचे व्हिडिओ रोज व्हायरल होत…

Tractor purchases increase by 35 percent in heavy rain hit Marathwada
अतिवृष्टीग्रस्त मराठवाड्यात ट्रॅक्टरच्या खरेदीत ३५ टक्क्यांनी वाढ; नवरात्रोत्सव काळातील चित्र; ५ ते ७ हजार ट्रॅक्टरची विक्री

यंदाच्या नवरात्रोत्सव काळात मराठवाड्यात तब्बल ५ ते ७ हजार ट्रॅक्टरची विक्री झाली आहे. मोटारींच्या तुलनेमध्ये ट्रॅक्टरची खरेदी अधिक नोंदली गेली…

navratri utsav
ठाण्यात नवरात्रोत्सवातही कृत्रिम तलाव संकल्पनेस ठाणेकरांचा प्रतिसाद; ठाण्यात १,६९१ देवी मूर्तीचे तर, १०,५६२ घटाचे विसर्जन

गणेशोत्सवापाठोपाठ नवरात्रोत्सवातही कृत्रिम तलाव संकल्पनेस ठाणेकरांनी प्रतिसाद दिल्याचे चित्र दिसून आले आहे. ठाण्यातील कृत्रिम तलवात १,६९१ देवी मूर्तीचे तर, १०,५६२…

How much are house sales Navratri 2025 What is the Knight Frank report Mumbai print news
Mumbai Houses Sale In Navratri: नवरात्रीत सव्वासहा हजार घरांची विक्री! नाईट फ्रॅंकचा अहवाल जाहीर

सप्टेंबरअखेरपर्यंत नोंदवल्या गेलेल्या १२ हजार घरांपैकी अर्धी घरे म्हणजे सहा हजार २३८ घरे नवरात्रींच्या कालावधीत (२२ सप्टेंबर ते १ ॲाक्टोबर)…

Kajol
तिचा हाथ पकडला अन्…, काजोलबरोबर दुर्गा पूजेदरम्यान झालं असं काही की…; ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल

Kajol Durga Puja Video Viral : काजोलबरोबर दुर्गा पूजेदरम्यान घडलं असं काही की…; व्हिडीओ होतोय व्हायरल

Pune politics Medha Kulkarni Latest News MP Dr. Medha Kulkarni Pune Politics BJP Party With difference Kothrud Pune city Pune garba
Dr. Medha Kulkarni: पुण्याच्या राजकारणातील मेधाताई विथ ‘डिफरन्स’

Medha Kulkarni Pune: वेगवेगळ्या मुद्द्यांना हात घालण्याचे धाडस, प्रसंगी स्वपक्षीयांविरोधातील, पण नागरिकांना आपल्याशा वाटतील, अशा घेतलेल्या भूमिका खासदार डॉ. मेधा…

Tuljapur celebrates traditional Simollanghan ceremony of Goddess Tuljabhavani with thousands of devotees
शारदीय नवरात्र महोत्सव २०२५ : तुळजापुरात सीमोल्लंघन सोहळा उत्साहात

साडेतीन शक्तिपीठांपैकी पूर्णपीठ असलेल्या तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त गुरुवारी पहाटे पारंपरिक सीमोल्लंघन सोहळा अत्यंत भक्तिभावाने व उत्साहात…

संबंधित बातम्या