scorecardresearch

पाऊस

‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये तुम्हाला पावसासंबंधित सर्व माहिती मिळेल. पाऊस (Rain)ही हवामानाशी संबंधित घटना आहे. वातावरणात असलेल्या ढगांमधील वाफेचे जेव्हा द्रवरूपात रूपांतर होते तेव्हा पृथ्वीवर पाण्याचे थेंब पडू लागलाल. हवा थंड झाल्याने किंवा आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने पाऊस पडतो. सोप्या भाषेत सांगायचे, तर जेव्हा ढगांमधून पाण्याचे थेंब कोसळतात त्याला पाऊस म्हणतात. पाऊस ही मानवी जीवनासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. कारण- जेव्हा पाऊस पडतो तेव्हा जलप्राप्ती होते.


पावसाच्या पाण्यामुळे नदी, नाले आणि ओढे ओसंडून वाहू लागतात. सर्व पृथ्वी हिरवीगार होते. भारत हा प्रामुख्याने कृषिप्रधान देश आहे. भारतीय अर्थव्यवस्था शेतीशी संबंधित असल्याने पिकांच्या उत्पादनासाठी भारतात पावसाचे विशेष महत्त्व आहे. देशात काही ठिकाणी एकदाच पावसाळा असतो; तर काही ठिकाणी वर्षातून दोनदा पाऊस पडतो. दक्षिणेतील समुद्रात तयार होणाऱ्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे भारतात नैर्ऋत्य मोसमी वारे वाहू लागतात. दक्षिणेकडून हे वारे हळूहळू संपूर्ण भारतात पसरतात. परिणामस्वरूप भारतात पाऊस पडतो; ज्याला मान्सून, असे म्हटले जाते. त्यामुळे भारताचा विचार करता, अन्य राज्यांच्या तुलनेत दक्षिण भारतात अधिक पाऊस पडतो. पावसासंबंधीचा अंदाज हवामान खाते वर्तवीत असते.


पाऊस कधी येऊ शकतो, किती प्रमाणात पाऊस होईल यासंबंधीची सर्व माहिती हवामान खाते वेळोवेळी सांगत असते. या माहितीवर आधारित सविस्तर बातम्या तुम्ही येथे वाचू शकता. तसेच पावसाळ्यात देशभरातील विविध राज्यांची आणि शहरांमध्ये काय स्थिती आहे हेदेखील तुम्ही येथे जाणून घेऊ शकता. पावसाळा आला की, आरोग्यासंबंधीची काय काळजी घ्यावी, घराबाहेर पडताना काय काळजी घ्यावी, वाहनांची काळजी कशी घ्यावी अशी अनेक विषयांवरील माहिती तुम्ही येथे जाणून घेऊ शकता. तसेच पावसाळ्यात भेट देण्यासारखी स्थळे कोणती आतहे, पावसाळ्यात पर्यटन करताना काय काळजी घ्यावी अशी माहितीदेखील तुम्ही येथे जाणून घेऊ शकता.


Read More
Raigad District Heavy Rain Unseasonal Yellow Alert Weather Konkan Disrupts Water Transport Tourists Farmers Worried
रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी…

Raigad Rain : अवकाळी पावसाच्या धसक्याने शेतकऱ्यांनी भातकापणीची कामे थांबवली आहेत, तर खराब हवामानामुळे गेटवे-मांडवा जलवाहतूक सेवा बंद झाली आहे.

Maharashtra Post Monsoon Rain Damage Karad Satara
कराड शहर परिसरात चौथ्या दिवशीही पाऊस…

Karad Rain : ऐन दिवाळीत कोसळलेल्या पावसाने दीपोत्सवावर विरजण पडले, तसेच बाजारपेठांवर परिणाम होऊन शेतकरी, व्यापारी व व्यावसायिकांचे नुकसान झाले.

The most damage was done to the paddy fields spread over 29 thousand hectares in Igatpuri taluka
या पावसाला काय म्हणावे ?… इगतपुरीत चार तासातच इतका झाला पाऊस…भातशेतीला फटका

इगतपुरी तालुक्यातील २९ हजार हेक्टरवर असलेल्या भातशेतीचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे चार तासात ९६ मिलिमीटर पाऊस झाला असून…

Hundreds of fishing boats have been forced back by a sudden storm
अचानक आलेल्या वादळीवाऱ्यामुळे शेकडो मासेमारी बोटी पुन्हा परतल्या; मुंबई नजीक एक बोट बुडाली, खलाशी मात्र बचावले

पावसाळ्यात ६० दिवस मासेमारी बंद होती. १ ऑगस्टपासून पुन्हा हंगाम सुरू झाला. मात्र खराब हवामान, विविध वादळांमुळे हवामान विभागाने आठवेळा…

Unexpected rains improve air quality in Navi Mumbai
अनपेक्षित पावसामुळे नवी मुंबईत हवेची गुणवत्ता सुधारली; पुढील काही दिवस ढगाळ वातावरण आणि हलक्या सरींची शक्यता

गेल्या दोन आठवड्यांत शहरातील हवा गुणवत्ता पातळी (AQI) सरासरी १००-१९० इतकी नोंदली गेली होती. १९ ते २१ ऑक्टोबरदरम्यान वाशी, तळोजा,…

Damage to harvested paddy crop in Gondia district
Video: अवकाळीने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी ! कापणी केलेल्या धानपिकाचे नुकसान ; शेतकऱ्यांवरील संकट कायम…

गोंदिया जिल्ह्यात शुक्रवारी आणि शनिवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे खरिपातील धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले गेले…

जळगाव जिल्ह्यात पुन्हा नुकसान… पावसामुळे वेचणीवर आलेला कापूस भिजला !

जळगाव जिल्ह्यातील बऱ्याच भागात शनिवारी रात्री तसेच रविवारी सकाळी झालेल्या पावसाने शेतात वेचणीवर आलेला कापूस मोठ्या प्रमाणात भिजला आहे. आधीच…

Sindhudurg Heavy Rain Crop Damage Farmer Distressed Elephant Umbratha Rule Demand Compensation
सिंधुदुर्गात परतीच्या पावसाचा हाहाकार; भात आणि नाचणी पिकांचे मोठे नुकसान, शेतकरी मेटाकुटीला!

सततच्या पावसामुळे भात आणि नाचणीचे मोठे आर्थिक नुकसान झाले असतानाच, मडुरा परिसरात हत्तीच्या वावरामुळे बागायती पिकांचेही नुकसान वाढले आहे.

akola heavy rainfall
अकोला : दिवसभर ऊन-पावसाचा खेळ, सायंकाळी मुसळधार पावसाने झोडपले; दिवाळी होताच सर्वत्र जलयम….

मोसमी पाऊस परतल्याने वातावरणात कोरडेपणा आला होता. दिवसा ऊन आणि रात्री गारवा जाणवत होता.

Gondia farmers affected by Unseasonal rains on the verge of harvest
गोंदिया जिल्ह्यात परतीच्या पावसाचे थैमान, उभे आणि कापणी केलेले धानाचे पीक भिजले

काही ठिकाणी चुरणीचे कामही सुरू आहे. अनेक ठिकाणी कापणीनंतर भात शेतात सुकविण्यासाठी ठेवण्यात आला आहे. तर मोठे शेतकरी कापणी यंत्राद्वारे…

संबंधित बातम्या