scorecardresearch

सुनील तटकरे

सुनील तटकरे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. सुनील तटकरे यांचा जन्म १० जुलै १९५५ रोजी रायगडमधील कोलाड येथे झाला. त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयामधून शिक्षण घेतलेलं आहे. राजकारणात येण्याआधी सुनील तटकरे हे कंत्राटदार म्हणून काम पाहायचे. सुनील तटकरे यांना घरातूनच राजकारणाचा वारसा मिळाला. सुनील तटकरे यांचे वडील काँग्रेसमध्ये होते. त्यांनी जिल्हा परिषदेत विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी सांभाळली होती. १९८४ साली सुनील तटकरे काँग्रेसमध्ये सक्रिय झाले. त्यानंतर काँग्रेसच्या तालुका सरचिटणीस आणि रायगड जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्षपदावर त्यांनी काम केलं. १९९५ साली सुनील तटकरे विधानसभेवर निवडून गेले. १९९९ साली सुनील तटकरे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेले. २००४ मध्ये सुनील तटकरे अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री झाले. २००८ साली ते राज्याचे उर्जामंत्री झाले. २०१४ मध्ये त्यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. पण त्यांचा पराभव झाला. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत सुनील तटकरे रायगडमधून खासदार झाले. त्यानंतर २०२४ च्या निवडणुकीतही ते खासदार झाले. सुनील तटकरे यांची कन्या अदिती तटकरे या आमदार आहेत. तसेच पुत्र अनिकेत तटकरेही देखील विधानपरिषदेवर आमदार होते. सुनील तटकरे हे सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत.


Read More
bharat gogawale
“तटकरेंचा हिशोब चुकतोय, त्यांनी जुन्या पद्धतीने अभ्यास करावा”, भरत गोगावले म्हणाले…

खासदार सुनील तटकरे यांनी महाड येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस मेळाव्यात लोकसभा निवडणुकीत त्यांना आणि विधानसभा निवडणूकीत गोगावले यांना पडलेल्या मतांचा…

ratnagiri sunil tatkare warning bharat gogawale
सुनील तटकरेंनी यांनी भरत गोगावले यांच्यासमोर हिशोबच मांडला… माझ्या संयमाला माझी कमजोरी समजू नका दिला थेट इशारा.

पालकमंत्रीपदावरून शिवसैनिकांकडून टीका झाल्यानंतर तीन महिने मी सहन केलं, असं सांगत त्यांनी गोगावले आणि त्यांच्या समर्थकांना थेट इशारा दिला.

Maharashtra News Updates in Marathi
Maharashtra News Updates : “हा आपल्या जवानांवर अविश्वास दाखवण्याचा प्रकार”, राहुल गांधींच्या ‘त्या’ प्रश्नावर एकनाथ शिंदेंची टीका

Marathi News Updates : राज्यासह देशभरातील राजकीय व इतर महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर.

What did Sunil Tatkare say about Bharat Gogavale
Sunil Tatkare: भर सभेत सुनील तटकरेंनी केली भरत गोगावलेंची मिमिक्री; म्हणाले…

Sunil Tatkare: महाड येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात खासदार सुनील तटकरे यांनी भरत गोगावले यांची नक्कल केली आहे.

Sunil Tatkare on Jayant Patil: जयंत पाटलांच्या मनातलं...; सुनील तटकरेंचं सूचक विधान
Sunil Tatkare on Jayant Patil: जयंत पाटलांच्या मनातलं…; सुनील तटकरेंचं सूचक विधान

राष्ट्रवादी काँग्रसे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अजित पवार गटात जाणार अशी चर्चा आहे. त्याबाबत खासदार सुनील तटकरे…

NCP will not unification State President Sunil Tatkares clarification
राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा विषयच नाही; प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे स्पष्टीकरण

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात. याबाबत पांडुरंगाकडे मागणे मागण्याचा विषय येत नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार…

Ambadas Danve On Raigad Guardian Minister Politics
Ambadas Danve : “गोगावलेंना रायगडचं पालकमंत्रिपद मिळणार नाही, कारण…”, ‘या’ नेत्याचा दावा; म्हणाले, “एकनाथ शिंदेंना…”

“भरत गोगावले यांना रायगडचं पालकमंत्रिपद मिळणार नाही”, असा दावा अंबादास दानवे यांनी केला आहे.

Sunil Tatkare On Raigad Guardian Minister
Sunil Tatkare : रायगड, नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटला का? अमित शाह यांच्या भेटीत काय ठरलं? तटकरे म्हणाले, “राजकीय चर्चा…”

अमित शाह हे सुनील तटकरे यांच्या घरी भोजनासाठी गेले होते. त्यामुळे सुनील तटकरेंच्या घरी पालकमंत्री पदाच्या तिढ्याबाबत चर्चा होण्याची शक्यता…

Mahendra Dalvi On Raigad Guardian Minister
Mahendra Dalvi : पालकमंत्रिपदावरून वादाची ठिणगी? ‘…तर मोठा उठाव होईल’, शिंदेंच्या आमदाराचा तटकरेंना इशारा

शिवसेना (शिंदे) पक्षाचे आमदार महेंद्र दळवी यांनी मोठा इशारा दिला आहे.

amit shah sunil tatkare
अमित शहा तटकरेंच्या निवासस्थानी भेट देणार, शिंदे गटात अस्वस्थता, गोगावलेंच्या पालकमंत्रीपदावर प्रश्नचिन्ह

रायगड किल्ल्यावरील कार्यक्रम संपल्यावर शहा हे खासदार तटकरे यांच्या रोहा तालुक्यातील सुतारवाडी निवासस्थानी भेट देणार आहेत.

NCP preparation against Shiv Sena MLAs in Raigad for upcoming election
रायगडमध्ये शिवसेना आमदारांच्या विरोधात राष्ट्रवादी मोर्चेबांधणी?

रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील वाद विकोपाला गेले आहे. पालकमंत्री पदाचा मुद्दा हा यात कळीचा ठरला आहे.

संबंधित बातम्या