scorecardresearch

सर्वोच्च न्यायालय

‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये तुम्हाला भारतीय सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित सर्व बातम्या वाचता येतील. भारताचे सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) ही भारताची सर्वोच्च आणि स्वायत्त न्यायिक संस्था आहे. भारतीय राज्यघटनेने एकत्रित न्यायप्रणालीचा स्वीकार केला आहे. प्रामुख्याने विविध राज्यांतील उच्च न्यायालये आणि इतर न्यायालये, तसेच न्यायाधिकरणांच्या निकालांविरुद्ध भारतातील सर्वोच्च घटनात्मक न्यायालयात अपील करता येते. नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करणे हे भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे काम आहे. तसेच विविध सरकारी प्राधिकरणे, केंद्र सरकार विरुद्ध विविध राज्यांची सरकारे किंवा एका राज्याच्या सरकार विरुद्ध देशातील अन्य राज्यांची सरकारे यांच्यातील वाद मिटवणे हेदेखील भारतीय सर्वोच्च न्यायालयाचेच काम आहे.


भारताच्या राष्ट्रपतींद्वारे राज्यघटनेच्या अंतर्गत विशेषतः संदर्भित केलेल्या प्रकरणांची सुनावणी एक सल्लागार म्हणून हे न्यायालय पार पाडते. सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेला कायदा भारतातील सर्व न्यायालयांसाठी आणि केंद्र व राज्य सरकारांना पालन करणे बंधनकारक असते. घटनेच्या कलम १४२ नुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी करणे हे भारताच्या राष्ट्रपतींचे कर्तव्य आहे आणि न्यायाच्या हितासाठी आवश्यक वाटणारे कोणतेही आदेश पारित करण्याचे मूळ अधिकार या न्यायालयाला दिलेले आहेत. २८ जानेवारी १९५० पासून आधीच्या प्रिव्ही कौन्सिलच्या न्यायिक समितीची जागा सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. भारतीय संविधानातील अनुच्छेद १२४ हे सर्वोच्च न्यायालयाची रचना व स्थापनेशी संबंधित आहे. अनुच्छेद १२४ नुसार मुख्य न्यायमूर्ती आणि अन्य न्यायाधीश मिळून भारताचे एक सर्वोच्च न्यायालय आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपतींच्या सहीनिशी आणि मुद्रांकित अधिपत्राद्वारे करण्यात येते. त्यासाठी आवश्यकता वाटल्यास राष्ट्रपतींना ज्यांच्यासोबत विचारविनिमय करणे आवश्यक वाटेल, अशा न्यायाधीशांशी ते विचारविनिमय करू शकतात. सद्य:स्थितीत सर्वोच्च न्यायालयात एक मुख्य न्यायाधीश व ३३ इतर न्यायाधीश अशी एकूण ३४ सदस्यसंख्या आहे. २०१९ मध्ये केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या वाढवीत ३१ वरून ३४ केली.


महत्त्वाचे म्हणजे अगदी सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायधीशांची संख्या केवळ आठ एवढी निश्चित करण्यात आली होती. मात्र, गरजेनुसार संसदेद्वारे ही संख्या वाढवण्यात आली. भारतीय न्यायालयांतील महत्त्वाची प्रकरणे, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय यांबाबत सर्व अपडेट्स तुम्हाला येथे वाचायला मिळतील.


Read More
Satkosia Tiger Reserve news in marathi
सातकोसिया व्याघ्र प्रकल्पात बांधकामास परवानगी; विरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने (एनटीसीए) एप्रिल २०१८मध्ये सर्व राज्यांना व्याघ्र प्रकल्पांभोवती पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रांचे सीमांकन करणे अनिवार्य केले असल्याकडे याचिकेत…

Yashwant Varma House Case
Yashwant Varma Case : न्यायमूर्ती वर्मांच्या याचिकेवरील सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, विशेष खंडपीठ स्थापन करण्यात येणार

न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील आरोपाच्या प्रकरणासंदर्भात आणखी एक मोठ माहिती समोर आली आहे.

Alimony Case in Supreme Court CJI Bhushan Gavai
Alimony Case: पोटगीसाठी १२ कोटी रुपये, मुंबईत फ्लॅट, BMW कार मागणाऱ्या पत्नीला सरन्यायाधीश भूषण गवईंनी सुनावलं; म्हणाले, “स्वतः कमवून…” फ्रीमियम स्टोरी

Alimony Case in Supreme Court: लग्नाला केवळ १८ महिने झाले असतानाही महिलेने पोटगीच्या स्वरुपात १२ कोटी रुपये, मुंबईत घर आणि…

Supreme Court Divorce Ruling
खोटी तक्रार करत IPS महिलेनं पती-सासऱ्याला तुरुंगात पाठवलं; सरन्यायाधीशांनी फटकारलं, जाहीर माफी मागण्याचे दिले आदेश

Supreme Court Divorce Ruling: आयपीएस असलेल्या पत्नीनं पती आणि सासऱ्या विरोधात खोटी तक्रार दाखल करून त्यांना १०० हून अधिक दिवस…

high court acquitted 12 accused in 2006 mumbai blasts now Supreme Court hearing set in this case on July 24 2025
७/११ बॉम्बस्फोट : सर्वोच्च न्यायालयात अनुमती याचिका दाखल, २४ जुलै रोजी सुनावणी

मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकलमध्ये ११ जुलै २००६ रोजी झालेल्या साखळी स्फोटांप्रकरणी सर्व १२ आरोपींची उच्च न्यायालयाने निर्दोष सुटका केली.याप्रकरणी…

Recounting of votes in Hadapsar and Khadakwasla assembly constituencies to be held
हडपसर, खडकवासला मतदारसंघांची मतपडताळणी; शुक्रवारपासून प्रक्रियेला प्रारंभ

मतांची ‘व्हीव्हीपॅट स्लीप’ची तपासणी होणार नसल्याचे जिल्हा निवडणूक शाखेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. भोसरी येथील वखार महामंडळाच्या गोदामात ही प्रक्रिया…

Alimony Case in Supreme Court What CJI Gavai Says
Alimony Case: लग्नाला फक्त १८ महिने, पोटगीसाठी पत्नीनं मागितले १२ कोटी, मुंबईत फ्लॅट, BMW कार; सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले…

Alimony Case in Supreme Court: लग्नाला केवळ १८ महिने झाले असतानाही महिलेने पोटगीच्या स्वरुपात १२ कोटी रुपये, मुंबईत घर आणि…

Shreyas Talpade SC
मराठी-हिंदी चित्रपट गाजवणाऱ्या अभिनेत्याला अटकेपासून संरक्षण; फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल, सुप्रीम कोर्टाचा दिलासा

Shreyas Talpade Stay On Arrest: याचिकेनुसार, श्रेयस तळपदेला २०१८, २०१९ आणि २०२२ मध्ये सागा ग्रुपने आयोजित केलेल्या कार्यक्रमांना पाहुणे सेलिब्रिटी…

Supreme Court CBI
“न्यायालयात येण्याचीही हिंमत नाही का?”, CBI ला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; म्हणाले, “त्यांना आणखी…”

Supreme Court CBI: इंडियाबुल्सचे वकील मुकुल रोहतगी यांनी दाव्यांना विरोध केला की, कंपनी वर्षानुवर्षे अस्तित्वात आहे आणि तिच्याविरुद्ध एकही तक्रार…

Tirupati Balaji Temple Desi Milk
Tirupati Balaji: ‘गाय ही गाय असते’, तिरुपती मंदिरात देशी गायीच्या दुधाच्या वापराची मागणी; सर्वोच्च न्यायालय म्हणाले, “यापेक्षाही बरेच महत्त्वाचे…”

Tirupati Balaji Temple: देवावरील खरे प्रेम हे या मुद्द्यांमध्ये अडकण्याऐवजी सहप्राण्यांची सेवा करण्यात आहे. समाजात यापेक्षाही बरेच महत्त्वाचे मुद्दे आहेत.”…

Supreme Court reject Byju s and BCCI pleas
बैजूजवरील दिवाळखोरी सर्वोच्च न्यायालयाकडून कायम; ‘बीसीसीआय’शी सामंजस्याने तोडगाही नामंजूर

बीसीसीआय आणि रवींद्रन यांनी यापूर्वी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या बेंगळुरू खंडपीठाच्या आदेशाला आव्हान दिले होते.

संबंधित बातम्या