scorecardresearch

उद्धव ठाकरे

उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे ते अध्यक्ष होते. मात्र २०२२ साली पक्षात फूट पडल्यानंतर त्यांना पक्ष आणि पक्षाचे चिन्ह गमवावे लागले. उद्धव ठाकरे यांचा जन्म २७ जुलै १९६० रोजी मुंबईत झाला आणि दादरमधील बालमोहन विद्यामंदिरमधून त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. जेजे स्कूल ऑफ आर्टचे पदवीधर उद्धव ठाकरे यांनी रश्मी पाटणकर यांच्याशी लग्न केले आणि त्यांना दोन मुले आहेत. त्यांचे मोठे चिरंजीव आदित्य ठाकरे हेदेखील शिवसेनेचे नेते आहेत. २०१९ मध्ये महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद भूषविले होते. उद्धव ठाकरे हे छायाचित्रकारही आहेत. त्यांची ‘महाराष्ट्र देशा’ आणि ‘पहावा विठ्ठल’ ही दोन पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत.


२००२ मध्ये मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे (Shivsena) प्रचार प्रभारी बनल्यानंतर ठाकरे यांनी राजकारणात पदार्पण केले. २००३ मध्ये त्यांची शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आणि २००६ मध्ये ते पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकाचे मुख्य संपादक झाले. २०१२ मध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली आणि २०१३ मध्ये ते अध्यक्षपदी विराजमान झाले. कोणत्याही सरकारमध्ये स्थान मिळवणारे ठाकरे कुटुंबातील ते पहिले सदस्य ठरले. २८ नोव्हेंबर २०१९ रोजी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.


२०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड पुकारून स्वतःबरोबर पक्षाचे ४० हून अधिक आमदार आणि १३ खासदारांसह शिवसेना पक्ष ताब्यात घेतला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी रस्त्यावर आणि न्यायालयात संघर्ष करत कडवी झुंज दिली. पक्षाचे नाव आणि चिन्ह गेल्यानंतरही २०२४ च्या निवडणुकीत शिवसेना उबाठा गटाने नऊ जागांवर विजय मिळविला. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सात जागा मिळाल्या.


Read More
Devendra Fadnavis slam Uddhav Thackeray over sitting in last row during INDIA meet Rahul Gandhi marahi news
Devendra Fadnavis : फडणवीसांचा काँग्रेसच्या बैठकीत मागच्या रांगेत बसलेल्या उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाले, “आमच्याकडे आमच्यापेक्षाही पहिले…”

देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीत मागच्या रांगेत बसलेल्या उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

Eknath Shinde On Uddhav Thackeray
Eknath Shinde : “काँग्रेसने त्यांना त्यांची जागा दाखवली”, काँग्रेसच्या बैठकीतील फोटोवरून एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसच्या बैठकीतील फोटोवरून उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे.

shinde bjp target thackeray over india meet seating
“काय ही तुमची किंमत? काँग्रेसच्या बैठकीत शेवटच्या रांगेत”, फोटो शेअर करत शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंना टोला

Shivsena Shinde vs Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे राहुल गांधी यांनी आयोजित केलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी झाले होते.

Uddhav Thackerays criticism of Deputy Chief Minister Eknath Shinde
Uddhav Thackeray: “ते एवढे महान नाहीत”; एकनाथ शिंदेंवर उद्धव ठाकरेंची टीका

Uddhav Thackeray: उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील…

What Uddhav Thackeray Said?
Uddhav Thackeray : ‘राज ठाकरेही राहुल गांधींच्या निवासस्थानी स्नेहभोजनासाठी येणार का?’ उद्धव ठाकरे म्हणाले, “आम्ही दोघं…”

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु झाल्या आहेत. त्याविषयीच्या एका प्रश्नाबाबत काय म्हणाले…

Uddhav and Raj Thackeray factions may unite in BEST co op election Shiv Sena MNS alliance in Mumbai
उद्धव आणि राज ठाकरे निवडणूकीसाठी एकत्र? बेस्ट उपक्रमात निवडणूकीचे वारे…

बेस्ट उपक्रमाच्या कामगार पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधुंच्या कामगार संघटना एकत्र येणार अशी चर्चा आहे.

What Uddhav Thackeray Said?
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला; “डोनाल्ड ट्रम्प रोज खिल्ली उडवत आहेत आणि तुम्ही…”

राहुल गांधींच्या निवासस्थानी भोजनाचं निमंत्रण आहे तिथे मी जाणार आहे असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.

Maharashtra News Live Updates in Marathi
Maharashtra Breaking News Highlights: कोल्हापूरात हिंदुस्तानी भाऊ विरोधात संताप, नागरिकांनी पोस्टरला मारले जोडे

Today’s News Update: माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी मंत्रीपद काढून घेतल्यानंतर कृषी खाते दत्ता भरणे यांच्याकडे देण्यात आले होते. त्यानंतर आज…

Shiv Sena uddhav Thackeray MNS alliance
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत शिवसेना – मनसेची युती, पहिली निवडणूक एकत्र लढणार

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही ही युती कायम राहण्याची शक्यता वर्तविली जाते.

संबंधित बातम्या