scorecardresearch

वाशिम

वाशिम (Washim) जिल्हा महाराष्ट्र राज्यातील विदर्भ भागात पश्चिमेला स्थित आहे. त्याच्या उत्तरेस अकोला, ईशान्येला अमरावती, दक्षिणेस हिंगोली, पश्चिमेस बुलढाणा, पूर्वेस यवतमाळ अशी राज्ये आहेत. पैनगंगा ही या जिह्यातील प्रमुख नदी आहे. ही नदी वाशिमच्या रिसोड तालुक्यातून वाहते. पुढे ती वाशिम आणि हिंगोली जिल्ह्यांच्या हद्दीतून वाहते. पैनगंगा नदीव्यतिरिक्त या जिह्यामध्ये कास नगी, अरुणावती नदी, काटेपूर्णा नदी अशा नद्या आहेत. हा जिल्हा वाशिम, मंगरुळपीर आणि कारंजा या तीन उपविभागांमध्ये विभागला गेला आहे. त्याची पुढे सहा तालुक्यांमध्ये विभागणी करण्यात आली. मालेगाव, मंगरुळपीर, कारंजा, मानोरा, वाशिम आणि रिसोड हे वाशिम जिह्यातील तालुके आहेत. वाशिम हे जिह्यातील सर्वात मोठे शहर आहे. तेथे जिल्ह्यातील सर्वात मोठे रेल्वे जंक्शनही आहे. या जंक्शनमुळे हा जिल्हा अन्य जिल्ह्यांशी जोडला गेला आहे.


वाशिमला मोठा इतिहास लाभला आहे. एकेकाळी ही जागा वाकाटक राजवटीच्या वत्सगुल्मा वंशातील लोकांची राजधानी होती. तेव्हा वाशिम हे वत्सगुल्मा म्हणून ओळखले जात असे. वाकाटक राजवटीच्या प्रवरसेन प्रथम याच्या मृत्यूनंतर त्यांचा द्वितीय पुत्र सर्वसेन यांनी वत्सगुल्मा वंशाची स्थापना केली. सह्याद्री पर्वतरांगांपासून ते गोदावरी नदी दरम्यानचा भाग त्यांच्या अधिपत्याखाली होता. त्यांनी अजिंठा येथील काही बौद्ध लेण्यांचे संरक्षण केले असे म्हटले जाते. पुढे मुघल काळात अकोला जिल्ह्याचा मोठा भाग अकबराच्या सोरकर किंवा नरनाळा या महसूल जिल्ह्यात समाविष्ट होता. १९०५ मध्ये ब्रिटीश राजवटीत वाशिमचे विभाजन करून अकोला जिल्हा आणि यवतमाळ जिल्हा असे दोन स्वतंत्र जिल्हे करण्यात आले. तेव्हा वाशिम शहर हे अकोला जिल्ह्यामध्ये होते आणि राज्यकारभारासाठी संपूर्ण अकोला जिह्यावर अवलंबून होता. पुढे वाशिम जिल्ह्याची स्थापना १ जुलै १९९८ रोजी झाली.


Read More
washim heavy rainfall damage, washim crop loss 2025, washim flood relief updates,
वाशीम जिल्ह्यात हळदीचे पीक पाण्यात, पावसाने ७८ हजारांवर शेतकऱ्यांच्या…

वाशीम जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. या पावसाने ७८ हजारांवर शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरश: पाणी आणले.

washim rain alert villages cut off farmer drowns rescue news
वाशीम जिल्ह्याला पावसाने झोडपले; शेतकरी पुरात वाहून गेला, रिसोडमध्ये ढगफुटी…

वाशीम जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रिसोड तालुक्यात पुराची स्थिती निर्माण झाली आहे.

video HP gas truck swept away in flooded Utavali river driver dies in Washim  tragedy Maharashtra flood news
Video : वाशीम जिल्ह्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ; पुराच्या पाण्यात अख्खा ट्रकच वाहून गेला…

एचपी कंपनीचे सिलिंडर वाहून नेणारा ट्रक उतावळी नदीला आलेल्या पुरामुळे वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार वाशीम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील पिंप्री सरहद…

Accident Samruddhi Highway Wanoja and Karanja Washim district Four members of the same family died
‘समृद्धी’ ठरतोय मृत्यूचा महामार्ग, भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार ठार, एक गंभीर; भरधाव मोटार…

भरधाव मोटारीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती दुभाजकावर जाऊन आदळली. या भीषण अपघातात दोघांचा घटनास्थळीच, तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Crop damage due to heavy rain in Akola and Washim districts
अतिवृष्टीने शेतजमीन खरडली, घरांची पडझड; अकोला, वाशिम जिल्ह्याला पावसाचा…

अकोला जिल्ह्यात पातूर तालुक्याच्या ३२ गावातील ८८७ हेक्टर तर वाशीम जिल्ह्यात १५ हजार ३०३ हेक्टर शेत जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले.

Washim heavy rain incident news in marathi
विजेचे तांडव… वाशीम जिल्ह्यात तरुणीचा मृत्यू, महिला जखमी; वादळी वाऱ्यामुळे…

शेती शिवारात असलेल्या विहिरीवर पाणी भरण्यास गेलेल्या तनुजा अनिल खरात (वय १९ वर्ष) या तरुणीच्या अंगावर वीज पडली. त्यामध्ये तरुणीचा…

Double sowing crisis looms over Parbhani district
सुपीक जमिनीवर पाणी अन् मोबदल्यासाठी ‘पाटबंधारे’च्या दारी! प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना…

त्वरित मोबदला न दिल्यास आत्मदहन करण्याचा इशारा बाधित शेतकऱ्यांनी दिला. मोबदला देण्याच्या शासन निर्देशांकडे देखील दुर्लक्ष केल्याचा आरोप प्रकल्पबाधितांनी केला.

Dattatray Bharane said fund delayed due to Ladki Bahin Yojana
विकास कामे केवळ कागदावर नको, क्रीडामंत्री भरणेंकडून अधिकाऱ्यांची कानउघाडणी

विकास कामे केवळ कागदावर राहता कामा नये, तर ती जमिनीवर प्रत्यक्षात उतरली पाहिजेत, अशा शब्दात क्रीडामंत्री तथा वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री…

farmers, Union Agriculture Minister, suffering ,
केंद्रीय कृषिमंत्र्यांनी जाणून घेतले नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे दुःख, म्हणाले, केंद्र व राज्य सरकार…

वाशीम जिल्ह्याला मोसमी पूर्व मुसळधार पावसाने गुरुवारी सायंकाळी झोडपून काढले. काबाडकष्ट करून पिकवलेला शेतमाल शेतकऱ्यांनी विक्रीसाठी मानोरा कृषी उत्पन्न बाजार…

संबंधित बातम्या