05 March 2021

News Flash

Ishita

पारगमन करासाठी २६ कोटींचा देकार

महानगरपालिकेच्या पारगमन कराच्या वसुलीसाठी अपेक्षेपेक्षा अधिक म्हणजे २६ कोटी १३ लाख ६० हजार रुपयांचा देकार आला आहे. दोन निविदांपैकी भिवंडी येथील जे. के. एन्टरप्रायजेसची ही निविदा सर्वाधिक रकमेची ठरली आहे.

कोठी रस्त्याची महापौरांकडून पाहणी

यश पॅलेस ते कोठी या रस्त्याच्या कामाची महापौर संग्राम जगताप यांनी शुक्रवारी पाहणी केली. बराच काळ रेंगाळळेल्या या कामाला चालना देण्यासाठी येथील अडथळे तातडीने दूर करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले.

समाधान योजनेचा लाभार्थीना मनस्तापच!

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत महसूल खात्याने राबविलेल्या समाधान योजनेचा पूर्ण बोजवारा उडाला. गोरगरिबांचे समाधान तर झालेच नाही, पण त्यांच्यावर पश्चाताप करण्याची वेळ आली.

कोल्हापुरात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

शहरात आयआरबी कंपनीने सुरू केलेली टोलवसुली बंद करण्यासाठी निदर्शने करणाऱ्या महापौरांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवारी पुकारलेल्या ‘कोल्हापूर बंद’ला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

खा. वाकचौरे यांना काँग्रेसचा विरोध

ऐनवेळी पक्षात येऊन नेतेगिरी करणा-यांना पक्षाची उमेदवारी देऊ नये. पक्षाच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांनाच शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी अशी मागणी करणा-या अकोले तालुका काँग्रेसने शिवसेनेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा संभाव्य काँग्रेस प्रवेश व उमेदवारीस एकप्रकारे विरोध केला आहे.

बेकायदा बांधकाम पाडण्यास स्थगिती दिल्याच्या विरोधात ‘आप’चे आंदोलन

सुशील रसिक सभागृहाचे तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके यांच्या पुत्राच्या ‘सोहम प्लाझा’चे बेकायदा बांधकाम पाडण्यास नगरविकास विभागाने स्थगिती दिल्याच्या विरोधात गुरुवारी सायंकाळी ‘आम आदमी पार्टी’च्या कार्यकर्त्यांनी महापालिकेत आंदोलन केले.

विनाप्रक्रिया औद्योगिक सांडपाणी सोडल्यामुळे आंदोलन

इचलकरंजीतील लालनगर येथील सामूहिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (सीईटीपी)मधून विनाप्रक्रिया सांडपाणी सोडले जात असल्याचे नागरिकांच्या सतर्कतेमुळे पहाटेच्या सुमारास उघडकीस आले.

सातबारावर थकीत वीजबिलाचा बोजा न चढवण्याची शेतकरी संघटनेची मागणी

शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर महसूल वसुली दाखला घेऊन थकीत वीज बिलाचा बोजा नोंद करू नये, या मागणीचे निवेदन शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेतर्फे वीज कंपनीला देण्यात आले.

‘घोडे पे सवारी’ आंदोलनामुळे तांबवे पुलावरून मिनीबस सुरू

कोयना नदीवरील पूल अवजड वाहतुकीसाठी धोकादायक बनल्याच्या निष्कर्षांला एक वष्रे पूर्ण लोटले, तरी कराड तालुक्यातील तांबवे येथील पुलाकडे शासनाचे दुर्लक्षच राहिले.

कराडजवळ कार अपघातात पुण्याचे पाच जण जखमी

पुण्याहून कोल्हापूरकडे जाताना स्विफ्ट कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने कार महामार्गावरून सेवा रस्ता व महामार्गादरम्यानच्या गटारात जाऊन पलटी झाली.

प्री-फॅब्रिकेटेड अंगणवाडय़ांना हिरवा कंदील

प्री-फॅब्रिकेटेड अंगणवाडी उभारणीच्या संपूर्ण स्ट्रक्चरमधील केवळ एका ‘स्क्रू’ची जाडी वाढवण्याची सूचना झाली आणि प्री-फॅब्रिकेटेड अंगणवाडीच्या दर्जाबद्दल सदस्यांच्या मनात निर्माण झालेला संशय दूर झाला, लगेच जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ठेकेदार कंपनीस या अंगणवाडय़ा उभारणीस हिरवा कंदील देऊन टाकला आहे.

संग्रहालय बांधकामाचा निधी हातात, मात्र वाळू पात्रात

सातारा येथील छत्रपती शिवाजीमहाराज वस्तुसंग्रहालयाच्या इमारत बांधणीस शासनाने आठ कोटी रुपयांवर निधीस मान्यता दिली आहे. मात्र वाळू उपलब्ध नसल्याने सध्या बांधकाम रखडले आहे. एकूण ६० हजार चौरस फुटांचे हे काम मार्चपर्यंत पूर्ण करणार असे बांधकाम ठेकेदार सांगत आहेत.

रिक्षा परवान्यांसाठी शिक्षणाची दहावी उत्तीर्णची अट शिथिल

गेल्या अनेक वर्षांपासून दिले न गेलेले रिक्षा परवाने अखेर शासनाने खुले केले असले तरी त्यात नवीन परवाना मिळविण्यासाठी किमान दहावी उत्तीर्ण असण्याची अट घालण्यात आल्यामुळे नवीन रिक्षा परवान्यांसाठीच्या अर्जाना अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे.

श्रीरामपूर येथील सायबर व्यावसायिकास अटक

व्यावसायिक प्रतिस्पर्ध्याचा टय़ूब या संकेतस्थळावरील व्हिडिओ अनधिकृतरीत्या बंद केल्याप्रकरणी मध्य प्रदेश पोलिसांनी येथील मुकेश क्षीरसागर यास अटक केली.

देहेरे टोलच्या विरोधात राष्ट्रवादीचे उपोषण

नगर ते कोल्हार या रस्त्याची अनेक कामे अपुर्ण असतानाही बेकायदा टोल वसुली केली जात असल्याने जनतेची लूट थांबवावी, अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आजपासून उपोषण सुरु केले.

महिला अत्याचारांमुळे जिल्हय़ाच्या पुरोगामित्वाला धक्का- न्यायाधीश घुगे

महिला अत्याचारांच्या बाबतीत नगर जिल्हय़ाचा राज्यात दुसरा क्रमांक असल्याचे सांगून ही गोष्ट जिल्हय़ाच्या पुरोगामित्वाला धक्का देणारी आहे, असे प्रतिपादन जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाचे सचिव पी. बी. घुगे यांनी केले.

सुशील रसिक सभागृहाच्या बेकायदा बांधकामाला मुख्यमंत्र्यांनी दिले ‘अभय’

केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे घनिष्ठ सहकारी विष्णुपंत कोठे यांच्या ताब्यातील सुशी रसिक सभागृहाचे बेकायदा बांधकाम पाडून टाकण्यासंबंधी महापालिका प्रशासनाने लेखी पत्रव्यवहार केल्याच्या पार्श्र्वभूमीवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या संभाव्य पाडकामाच्या कारवाईला स्थगिती दिली.

तुंबलेल्या गटार दुरुस्तीवरून पालिका मंडळ कार्यालयात ‘राडा’

तुंबलेल्या गटार दुरुस्तीच्या कामाला कमालीचा विलंब होत असल्याने संतापलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या दत्त चौकातील मंडळ कार्यालयात घुसून तोडफोड करीत ‘राडा’ केला.

कराड पालिकेच्या सभेत प्रारूप विकास आराखडय़ावर समन्वय

सभागृहाने व नागरिकांनी मांडलेल्या सूचनांचा विचार करून वाढीव भागाचा प्रारूप विकास आराखडा तयार करण्याचा ठराव कराड पालिकेत एकमताने पारित करण्यात आला.

मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी उरकली दहा मिनिटांत पाहणी

ते आले.. त्यांनी पाहिलं.. अन् ते गेले.. अशी स्थिती मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांच्या पाहणी दौ-याची बुधवारी मिरज, सांगलीत झाली.

लोकशाही आघाडीचा साता-यात मोर्चा

महाराष्ट्र लोकशाही आघाडीच्या वतीने सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर इशारा मोर्चा काढण्यात आला. यामध्ये राज्य संघटक प्रतिनिधी, जिल्हा संघटक व तालुका संघटक प्रतिनिधी तसेच अनेक कार्यकत्रे उपस्थित होते.

नवल यांनी जि.प.ची सूत्रे स्वीकारली

नगर जिल्हा भौगोलिकदृष्टय़ा मोठा आणि राज्यातील महत्त्वाचा जिल्हा आहे. जिल्हय़ाला विकासाची उज्ज्वल परंपरा असून ती पुढे नेण्याचा कसोशीने प्रयत्न करू, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवल यांनी बुधवारी दिली.

साता-यात भरदिवसा दूध व्यावसायिकाचा खून

सुरेश पांडुरंग अहिरे (वय ५०, रा. ३१, चिमणपुरा, मांढरे आळी, सातारा) यांचा दुधाचा व्यवसाय आहे. आíथक देवाणघेवाणीचा वाद होऊन ३.३५ मिनिटांनी ते हॉटेलमधून बाहेर पडले त्या वेळी त्यांच्यावर चाकूहल्ला झाला.

राज्य सरकारी कर्मचा-यांचा संप अटळ- खोंडे

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी मंगळवारी झालेली चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे येत्या दि. १३ पासून पुकारण्यात आलेला बेमुदत संप आता अटळ आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष योगिराज खोंडे यांनी दिली.

Just Now!
X