07 March 2021

News Flash

बबन मिंडे

‘पृथ्वीराज चव्हाणांचे आरोप अर्धवट माहितीच्या आधारे’!

मुख्यमंत्रिपद सांभाळलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी अर्धवट माहितीच्या आधारे आरोप करणे शोभणारे नाही, असा टोला लगावतानाच माझ्यावरील कुठल्याही आरोपात तथ्य आढळेल तेव्हा कोणावर राजीनामा मागण्याची वेळ येणार नाही, अशी स्पष्टोक्ती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.

केंद्रेकरांच्या समर्थनाचा झेंडा उंचावलाच नाही!

महापालिका आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सुनील केंद्रेकर यांच्याकडून काढून घेतल्यानंतर औरंगाबादकरांनी सामाजिक संकेतस्थळावरून प्रकट केलेला रोष तसा मोठय़ा आंदोलनात रूपांतरित होऊ शकला नाही.

९१ बुद्धविहार अनधिकृत ठरविले; निषेधार्थ सर्वपक्षीय समितीचा मोर्चा

शहरातील ९१ बुद्धविहार अनधिकृत ठरवून हटविण्याच्या यादीत टाकल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय अत्याचारविरोधी समितीने सोमवारी विभागीय आयुक्तालयावर शांती मोर्चा काढला.

साडेतीन मजल्यांची परवानगी, बांधकाम केले सात मजल्यांचे!

शहरातील एन सहामध्ये भगवान शिक्षण प्रसारक मंडळाने बांधलेल्या इमारतीस भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले नाही. त्यांना साडेतीन मजले बांधण्याची परवानगी होती, मात्र त्यांनी सात मजले बांधकाम केले.

परभणीच्या बाजारात कापसाला भाव, पण शेतकऱ्यांकडे अभाव!

या हंगामात सुरू असलेली कापसाची आबाळ थांबण्याची चिन्हे असून सोमवारी परभणीच्या बाजारात कापसाने चक्क साडेचार हजार रुपयांचा टप्पा ओलांडला. परभणी बाजार समितीअंतर्गत झालेल्या कापूस खरेदीने ४ हजार ५३० ते ४ हजार ६४० रुपये भाव गाठला.

नवजात तिसऱ्या मुलीस मारून टाकण्याच्या दबावामुळे विवाहितेचाच आत्महत्येचा प्रयत्न!

तिसरीही मुलगीच झाल्याने २५वर्षीय विवाहितेस सासरच्या लोकांनी मुलीला मारून टाकण्यासाठी दबाव वाढवला. परंतु पोटच्या मुलीस मारण्यापेक्षा स्वत:च विष घेऊन महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला.

औंढय़ाच्या तहसील कार्यालयात शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

औंढा नागनाथ तालुक्यातील नागेशवाडी येथील शेतकरी सत्यनारायण नाईक (वय ३०) यांना नुकसानभरपाईचे अनुदान मिळाले नाही. वारंवार फेऱ्या घालून निराश झालेल्या या शेतकऱ्याने अखेर औंढा तहसील कार्यालयात नायब तहसीलदारांसमोर विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

रा.स्व संघाला भूमिका जाहीर करण्याच्या चर्चेसाठी आव्हान

जाती अंत करण्यासाठी, जातीय व्यवस्थेला मूठमाती देऊन एकसंघ समाज निर्माण करण्यासाठी, केंद्र व राज्य सरकारची मार्गदर्शक संघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रथम भूमिका जाहीर करावी

डॉक्टर दांपत्याचा निर्घृण खून

इस्लामपूरमध्ये गेली चार दशके वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टर दांपत्याचा निर्घृण खून झाल्याचा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला.

राष्ट्रवादीचा डान्सबारला विरोध; आंदोलनाचा इशारा

दुबई येथील नृत्याच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री पसे पाठवतात मात्र पीडित महिलांना मदत करण्यासाठी असलेल्या मनोधर्य योजनेसाठी शासनाकडे पसे नाहीत.

चाळीस मतदारांच्या निर्णयाकडे लक्ष

विधान परिषदेच्या निवडणुकीची चुरस वाढल्यामुळे रविवारी मतदारांना सहलीवर पाठविण्याच्या प्रक्रियेला वेग आला होता. तर, शिवसेनेच्या ४० मतदारांचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार असल्याने त्याकडे लक्ष लागले आहे.

सोलापूर जिल्हा बँकेच्या सहा जागांचा आज फैसला

संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आíथक नाडी आणि जिल्ह्याचे महत्त्वाचे सत्ताकेंद्र समजल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची सहा जागांसाठी उद्या सोमवारी निवडणूक होत आहे.

वास्तुशांतीच्या जेवणातून ७२ जणांना विषबाधा

मिरज तालुक्यातील भोसे गावामध्ये वास्तुशांतीच्या जेवणातून ७२ जणांना विषबाधा झाली. यापैकी ५८ रुग्णांवर अद्याप वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. शुक्रवारी रात्री ही घटना घडली.

प्रा.ढोबळे यांना भाजप प्रवेशाला बलात्कार खटला अडसर

गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतून बाहेर फेकले गेलेले माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे हे स्वतच्या राजकीय अस्तित्वासाठी आता फुले-शाहू-आंबेडकर नामजप बाजूला ठेवून भाजपमध्ये प्रवेश घ्यायला गेल्या वर्षभरापासून उत्सुक आहेत.

‘ऑनर किलिंग’ घटनेवर प्रतिक्रिया उमटू लागल्या

इंद्रजित-मेघा कुलकर्णी दाम्पत्याच्या ऑनर किलिंग घटनेवर शहरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

वैजापूरमध्ये आठ वर्षांच्या मुलाचा साधूकडून खून

वैजापूर तालुक्यातील दहेगाव येथे एका साधूने आठ वर्षांच्या मुलाचा कुऱ्हाडीने खून केला. त्यामुळे चिडलेल्या जमावाने साधूवर हल्ला केल्याने त्याचाही मृत्यू झाला. ही घटना दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली.

काँग्रेस कार्यकर्त्यांचा परभणीत रास्तारोको

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात दिल्लीतील पटियाला न्यायालयात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना हजर व्हावे लागल्याच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमिटीने शनिवारी परभणीत रास्ता रोको केला.

नागपूरमध्ये पाणीप्रश्नी मोर्चा ; लातूरमध्ये आरोप – प्रत्यारोप

लातूर शहराच्या पाणी प्रश्नी राष्ट्रवादीने विरोधी भूमिका घेतल्याने प्रश्न जटील बनल्याचा आरोप काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते नरेंद्र अग्रवाल यांनी केला.

शनी मंदिराचे सहा विश्वस्त बडतर्फ

बीड शहरातील पेठबीड भागातील शनी मंदिर भाविकांचे श्रध्दास्थान आहे. दर शनिवारी हजारो भाविक दर्शनासाठी येतात. मात्र, या मंदिराची स्थावर मालमत्ता, देणगी हडप केल्याची तक्रार करण्यात आली होती.

ऊस उत्पादकांच्या आंदोलनाचे लोण पसरले

‘ एफआरपी’ ८० टक्के प्रमाणे ऊस बील मिळण्याच्या आंदोलनाचे लोण गुरुवारी जिल्’ााच्या पश्चिमेकडील भागाकडे सरकले.

आंतरजातीय विवाहातून कोल्हापुरात दोघांची हत्या

विरोध असतानाही बहिणीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून दोन भाऊ व त्यांच्या मित्राने सख्खी बहीण व तिच्या पतीचा चाकूने भोसकून निर्घृन खून केल्याची खळबळजनक घटना घडल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास करून अवघ्या पाच तासांत तिघाही आरोपींना अटक केली.

८५ टक्के अधिकारी धुतल्या तांदळासारखे!

वेगवेगळ्या विभागांतील ७२ संघटनांची शिखर संघटना असलेल्या राजपत्रित अधिकारी महासंघाचे राज्यभरात सव्वालाख सदस्य असून, यातील ८५ टक्के चांगले अर्थात धुतल्या तांदळासारखे असल्याचा दावा करीत उर्वरित १५ टक्क्य़ांपैकी १० टक्के जे काठावर आहेत

एस. टी. कामगारांच्या संपाचा मराठवाडय़ात प्रवाशांना फटका

पगारवाढीच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे एस. टी. बस जागेवर, तर संपामुळे खासगी प्रवासी वाहतूक जोरात असे चित्र औरंगाबादसह मराठवाडय़ातील सर्वच जिल्ह्य़ांत गुरुवारी पाहावयास मिळाले.

कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव उद्यापासून

कलामहर्षी बाबुराव पेंटर फिल्म सोसायटी आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आयोजित चौथा कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव शुक्रवार, १८ डिसेंबरपासून येथे सुरू होत आहे.

Just Now!
X