21 February 2020

News Flash

बबन मिंडे

कोल्हापुरात पोलीस मित्रांना प्रशिक्षण

कोल्हापूर शहरातील वाढत्या वाहतुकीचा ताण दूर करण्यासाठी आणि वाहतुकीला शिस्त लागावी, याकरिता पोलीस विभागाने सुमारे ५० पोलीस मित्रांना वाहतूक नियंत्रणाचे शनिवारी प्रशिक्षण दिले.

कोल्हापुरात ‘रॅगींग’मधून ६ विद्यार्थ्यांना मारहाण

येथील राजर्षी छ. शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शेंडापार्कातील कॅन्टीनमध्ये रॅिगगच्या कारणावरून शनिवारी जोरदार हाणामारी होऊन वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सहा विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करण्यात आली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे १३ रोजी चक्का जाम आंदोलन

शासनाने कारखान्यांना कोणतीही मदत द्यावी पण शेतकऱ्यांना एफआरपी एक रकमी द्यावी. अन्यथा शासनाला या प्रश्नाची जाणीव करून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून १३ डिसेंबरला चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे.

गोपीनाथगडाच्या उद्घाटनासाठी अमित शहा येणार

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मरणार्थ उभारण्यात येत असलेल्या गोपीनाथगडाचे उद्घाटन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंडे यांच्या दुसऱ्या जयंतीदिनी १२ डिसेंबरला होणार आहे.

तुर्किस्तानमधील विद्यापीठाकडून आठ जणांना विद्यावेतन

तुर्किस्तान मधील इदगीर विद्यापीठ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्यात ‘मेवलाना एक्सचेंज प्रोग्राम’ ला मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पांतर्गत दोन्ही विद्यापीठातील आठ संशोधकांना विद्यावेतन मिळणार आहे.

निवडणुकीच्या उमेदवारीचे केंद्र नागपूरच्या दिशेने सरकले

विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारीचे केंद्र रविवारी उपराजधानी नागपूरच्या दिशेने सरकले. सोमवारपासून राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होणार असल्याने राज्यातील प्रमुख नेत्यांसह जिल्हय़ातील इच्छुक उमेदवारांचा मुक्काम नागपूरमध्ये पडला आहे.

कायद्याचे उल्लंघन करण्यास प्रशासनाची हरकत

ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यात्रेला जिल्हा प्रशासनाची कोठेही आडकाठी नाही. यात्रेत होणाऱ्या विविध धार्मिक विधी परंपरेला एक इंचही धक्का लावला गेला नाही.

‘आघाडीने गमावले, भाजपने कमावले’!

महाराष्ट्राचे एकेकाळी वैभव असणारे सहकार क्षेत्र काँग्रेसने गिळंकृत केले आहे. मागील १५ वर्षांत आघाडी सरकारने गमावले, ते भाजप सरकारने वर्षभरातच कमावले.

महामानवास उत्साहात अभिवादन

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ५९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायांनी रविवारी अभिवादन केले.

पक्षप्रमुख ठाकरेंनी घातली समजूत; हर्षवर्धन जाधवांकडून राजीनामा मागे

शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राज्य सरकारच्या कामकाजावर चिडून विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे दिलेला राजीनामा परत घेत असल्याचे पत्र शनिवारी दिले.

बांधकाम विभागात देयकासाठी आजही ३५ टक्के

‘साहेब, अधिकारी बिलाच्या ३५ टक्कयांपर्यंत पैसे मागतात’, टक्केवारीची ही चर्चा रंगली औरंगाबादच्या विभागीय आयुक्तालयातील एका बैठकीत!

‘डान्सबार बंदीसाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू’

डांस बार बंदीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात मत मांडण्यास सरकार कमी पडले तर या विरोधात वेळप्रसंगी रस्त्यावर उतरू, असा इशारा माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांनी दिला.

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरुच

दुष्काळ जाहीर करूनही सरकारकडून आíथक मदत मिळत नसल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला असून तो आत्महत्या करीत आहे.

वीज क्षेत्रातील कंपन्यांची जानेवारीत पुनर्बाधणी

पावणेदोन कोटी वीज कर्मचारी असणाऱ्या क्षेत्रासाठी केवळ एक व्यवस्थापकीय संचालक असल्याने प्रशासनावर हवे तसे नियंत्रण ठेवता येत नाही. त्यामुळे वीज क्षेत्रातील कंपन्यांची पुनर्बाधणी जानेवारीत हाती घेतली जाणार आहे.

‘अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार; विभागवार नावे अजून अनिश्चितच’!

हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. मात्र, त्यात कोणाचा सहभाग असेल व कोणत्या विभागातून कोण व्यक्ती अशी चर्चा अजून झाली नसल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली.

गुरूगोविंदसिंघांच्या नावाने नांदेडात स्वतंत्र अध्यासन

शीख समाजाचे दहावे गुरू श्री गुरुगोविंदसिंघजी यांच्या नावाने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात स्वतंत्र अध्यासन स्थापन करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा फसवी ठरली आहे.

पाच हजार एकरांवर उसाऐवजी कांद्याची लागवड!

शेतीत पारंपरिक पिके घेऊन त्यातून पुरेसे उत्पन्न मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशेचे प्रमाण वाढले आहे.

भाईचंद रायसोनी मल्टीस्टेट बँकेच्या अध्यक्षांसह १३ संचालकांना कोठडी

राज्यात २८० शाखांचा विस्तार असलेल्या जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट बँकेच्या माजलगाव शाखेत ठेवीदारांच्या रक्कमेत अपहार झाल्याप्रकरणी १० महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यात बँकेचे अध्यक्ष प्रमोद रायसोनी यांच्यासह १२ संचालकांना गुन्हा शाखेने अटक केली.

स्वच्छता अभियानाचे उद्दिष्ट बदलण्याची राज्यावर नामुष्की!

एका बाजूला स्वच्छतेसाठी नवा कर लावण्याची प्रक्रिया सुरू असतानाच केंद्र सरकारने वित्तीय आकृतिबंध बदलल्याने केंद्राकडून स्वच्छतागृह बांधकामासाठी मिळणारी रक्कम घटणार आहे.

शेतकऱ्याचा बँकेत पेट्रोल ओतून घेत भरदुपारी आत्महत्येचा प्रयत्न

पीककर्जाची मागणी करूनही बँकेचे कर्मचारी टोलवाटोलवी करीत असल्याच्या निषेधार्थ बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने बँकेतच अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला.

जायकवाडीचा साठा जैसे थे!

नगर व नाशिक जिल्ह्यांतील धरणांमधून जायकवाडीला पाणी सोडण्याची प्रक्रिया गेल्या चार दिवसांपासून केवळ कागदावरच सुरू आहे. प्रत्यक्षात पाणीसाठय़ात अजिबात वाढ होत नसल्याचे दिसून येत आहे.

रिलायन्सच्या २६ मनोऱ्यांना नियमबाह्य़ परवानगी दिल्याने महापालिकेस फटका

शहरातील अनधिकृत मोबाईल मनोऱ्यांबाबत (टॉवर) काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नेते खासदार अशोक चव्हाण यांनी यापूर्वी कडक व कठोर भूमिका घेतली असताना, त्यांच्या पक्षाच्या ताब्यातील नांदेड-वाघाळा मनपात विद्यमान आयुक्तांनी रिलायन्स कंपनीच्या २६ मनोऱ्यांना परवानगी देत खासदार चव्हाण यांना आव्हान दिले आहे.

स्मार्ट सिटीतील महत्त्वाकांक्षी ग्रीनफिल्ड प्रकल्पासाठी जागा निश्चिती दोन दिवसांत

स्मार्ट सिटीमधील महत्त्वाकांक्षी ग्रीनफिल्ड प्रकल्प नक्की कोणत्या ठिकाणी घ्यायचा, याचा निर्णय येत्या २ दिवसांत होणार असून ५ डिसेंबपर्यंत या बाबत नगरविकास विभागाकडे अहवाल सादर केला जाणार आहे.

‘महिलांची बचत कुटुंबाचा आधार’

महिलांना स्वत:पेक्षाही परिवार महत्त्वाचा असतो. ती आपल्यापेक्षा इतरांचा विचार अधिक करीत असल्याने कठीण स्थितीतही संघर्ष करून जगते.

X