13 August 2020

News Flash

बबन मिंडे

नोव्हेंबरातच ११७ गावांत पाणीटंचाई

जिल्हय़ातील ९३० पकी ११७ गावांमध्ये पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून १०७ ठिकाणी िवधनविहिरींचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा केला जात आहे, तर ४५ गावांत ४६ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

मराठवाडय़ातील खर्च केवळ २८ टक्के

मराठवाडय़ातील आठही जिल्ह्य़ांत जिल्हा योजनांचा खर्च पुढे सरकता सरकत नसल्याचे दिसून येत आहे. विकासकामे प्रस्तावित करूनही काहीच उपयोग होत नाही.

शेतकऱ्यांच्या संतापानंतर केंद्रीय पथक परतले

दोन दिवसांपासून केंद्र शासनाची दोन पथकं जिल्हय़ाच्या वेगवेगळ्या भागांत धावत्या भेटी घेऊन जाताना त्यांनी सेलू तालुक्यात शनिवारी रात्री वाहनाच्या उजेडात पिकांची पाहणी केली.

दुष्काळग्रस्तांना जानेवारीत मदत मिळण्याची शक्यता

मदतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या राज्यातील १५ हजार ७४७ गावांमधील शेतकऱ्यांना पुढच्या वर्षी म्हणजे जानेवारीमध्येच मदत मिळू शकेल, असे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी रविवारी सांगितले.

मंत्रिमंडळ विस्तार; भाजप कोअर कमिटीची उद्या बैठक

मंत्रिमंडळाच्या बैठकीची लगबग सुरू झाली असून भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत सोमवारी कोअर कमिटीची बैठक होणार आहे.

इसिसच्या हल्ल्याच्या निषेधार्थ लातुरात मूक निदर्शने

इसिसने फ्रान्समधील पॅरिस शहरावर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ लातुरात मुस्लीम समाजाच्या वतीने गांधी चौकात मूक निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले.

मराठवाडय़ातील धरणांसाठी निकष बदलावेत – लोणीकर

मराठवाडय़ातील सिंचन प्रकल्पांना मान्यता देण्यासाठी ७५ टक्के जल विश्वासार्हतेची अट योग्य नसून त्याऐवजी ५० टक्के जलविश्वासार्हतेचा निकष ठेवला पाहिजे.

केंद्राच्या दुष्काळ पथकाची हमरस्त्यावरून पाहणी

सोनपेठ तालुक्यातील दुष्काळ पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पाहणी पथकाने हमरस्त्यावर पीक परिस्थितीची पाहणी करून आपला पाहणीचा फार्स पूर्ण केल्याने शेतकऱ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

पोलीस बंदोबस्तात केंद्रीय पथकाची पीकपाहणी

उस्मानाबाद तालुक्यातील आळणीत पथक दाखल होताच शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. तेच अधिकारी, पुन्हा त्याच जागेवर पाहणीसाठी आले, मात्र पदरात मदत नाही.

शेतकऱ्यांनी मांडल्या केंद्रीय पथकासमोर व्यथा

दुष्काळाच्या छायेत वाढ खुंटलेल्या कापसावर पडलेला लाल्या रोग, मोसंबीच्या सुकलेल्या बागा, खोल गेलेले विहिरीतील पाणी असे भीषण चित्र केंद्रीय दुष्काळी पथकास शुक्रवारी औरंगाबादसह मराठवाडय़ात पहावयास मिळाले.

जालना जिल्ह्य़ात केंद्रीय पथकाचा धावता दौरा!

दुष्काळसदृश्य परिस्थिीच्या पाश्र्वभूमीवर शुक्र वारी द्विसदस्यीय केंद्रीय पथकाने जालना जिल्ह्य़ातील तीन गावांत पाहणी केली.

लातूर स्वच्छता अभियानाचा लोगोही ‘लई भारी’!

लातूर जिल्हा परिषदेच्या स्वच्छता अभियानाच्या लोगोत ‘लई भारी’ हा शब्द घालण्यासाठी बराच खटाटोप करण्यात आला.

नगरसेवकांच्या तक्रारींचे ‘स्कॅनिंग’ होणार!

शहरातील समस्यांबाबत नगरसेवकांनी दिलेल्या सर्व तक्रारी व अर्जाचे आता स्कॅनिंग होणार असून ती प्रत नवनियुक्त आयुक्त सुनील केंद्रेकर स्वत:कडे ठेवणार आहेत.

औंढय़ात गुरुत्वाकर्षण वेधशाळेसंदर्भात नासाच्या पथकाकडून तिसऱ्यांदा पाहणी

जगभरातील गुरुत्वाकर्षण किरणांचा अभ्यास करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या जागेची पाहणी करण्यासाठी नासाचे पथक एक वर्षांपूर्वी औंढा परिसरात जमिनीची पाहणी करून गेले होते.

डाळींच्या साठेबाजांवर कारवाईत कोटय़वधींचा घोटाळा – सावंत

जनतेची दिशाभूल करण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी असलेल्या फडणवीस सरकारने डाळीच्या साठेबाजांवर केलेल्या कारवाईत कोटय़वधींचा घोटाळा केला आहे.

लालदिव्याच्या चर्चेमध्ये हाके, कराड अन् पटेल!

विधानसभा निवडणुकीच्या वेळी पाशा पटेल हे राज्याचे भावी कृषिमंत्री असल्याचे आश्वासन दिले गेले. भाजपकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पोटतिडकीने बोलणारा पाशा पटेल व्यतिरिक्त दुसरा हक्काचा माणूस नाही.

६४ मध्यम-लघु प्रकल्पांत जेमतेम १७ टक्के पाणीसाठा

जिल्ह्य़ातील ७ मध्यम व ५७ लघुसिंचन प्रकल्पांत सध्या जेमतेम १७ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत ‘त्यांचा-आमचा’ संपर्कच नाही! – राजू शेट्टी

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत कोणी आमच्याशी संपर्क साधला नाही व आम्हीही कोणाशी संपर्क साधला नाही, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी येथे बोलताना सांगितले.

‘कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी आंदोलनाची आता हीच वेळ’!

राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना मदतीची आवश्यकता असली, तरी त्यासाठी पैसा कसा उभारायचा, हा सरकारचा प्रश्न आहे.

केंद्रीय पथक उद्यापासून मराठवाडा दौऱ्यावर

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी ४ हजार कोटींची आíथक मदत मिळावी, या राज्य सरकारच्या निवेदनाची छाननी करण्यासाठी २० व २१ नोव्हेंबरला केंद्रीय पथक राज्याच्या दौऱ्यावर येणार आहे.

उमरी पालिकेतील गैरकारभाराच्या चौकशीचा अहवाल-फाईल गायब!

उमरी नगरपालिका प्रशासन आणि पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी केलेल्या गैरप्रकारांच्या चौकशीचा अहवाल, तसेच या संपूर्ण प्रकरणाची फाईल जिल्हाधिकारी कार्यालयातल्या संबंधित विभागातून गायब झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

अपंगदिनी आत्मदहनाचा अभियंत्याचा इशारा

कनिष्ठ अभियंता म्हणून निवड होऊन अडीच वर्षांचा कालावधी लोटला, तरी पदस्थापना देण्यास जि. प.कडून टाळाटाळ होत असल्याने अपंग अभियंत्याने ३ डिसेंबरला अपंगदिनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

तेरणातून बेसुमार पाणीउपसा

उस्मानाबाद तालुक्यातील तेर, ढोकीसह चार गावांना वरदान ठरलेल्या तेरणा धरणातून शेतीसाठी मोठय़ा प्रमाणात पाणीउपसा सुरू आहे.

धर्माबादेत जुगार अड्डय़ावर छापा

मनोरंजन परवान्याच्या नावाखाली अवैधरीत्या जुगार चालवणाऱ्या धर्माबाद तालुक्यातील नायगाव येथील परशुराम सोशल अँड स्पोर्ट्स क्लबवर छापा टाकून पोलिसांनी सुमारे एक कोटीपेक्षा जास्त ऐवज जप्त केला.

Just Now!
X