06 August 2020

News Flash

बबन मिंडे

मनरेगातील ५६ कंत्राटी कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत एकाच गावात कागदोपत्री कोटय़वधी खर्च झाल्याच्या तक्रारी वाढल्या.

आंदोलनाचे हत्यार उपसणाऱ्या अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश

शिक्षक, तसेच अन्य कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसणाऱ्या विस्तार अधिकारी परमेश्वर गोणारे व नांदेड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी के. पी. सोने यांच्या गरकारभाराची चौकशी करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी बजावले आहेत.

अनधिकृत मंदिरांसाठी महसूलचा ‘जागरण गोंधळ’!

राज्यातील अनधिकृत मंदिरांची आकडेवारी मिळविण्यासाठी मंत्रालयातून आलेल्या एका निरोपामुळे महसूल यंत्रणेला पहाटेपर्यंत जागे राहावे लागले.

आयुक्तांवरील अविश्वासानिमित्त मनपात राजकीय घडामोडींना वेग

औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त प्रकाश महाजन यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यासाठी सर्व पक्षांनी आपापली ताकद पणाला लावली आहे.

तूरडाळीच्या भावात पुन्हा दोन हजारांची घसरण

मागील आठवडय़ात सलग चार दिवस डाळींच्या भावाने उच्चांकी पातळी गाठली.

‘लातुरात रस्ते विकासासाठी अडीच हजार कोटींची तरतूद’

जिल्हय़ाच्या रस्ते विकासासाठी भाजप सरकारने वर्षभरात अडीच हजार कोटींची, तसेच पिण्याच्या पाण्यासह आरोग्य, सिंचन, कृषी या साठी मोठी तरतूद केली.

मराठवाडय़ात भूजल पातळी खालावली, परभणी धोक्याच्या पातळीवर

मराठवाडय़ातील २५ तालुक्यांमधील भूजल पातळी तीन मीटरपेक्षा अधिक खोल गेली आहे. यात धोक्याच्या पातळीवर असणारा जिल्हा म्हणून परभणीचे नाव पुढे आले आहे.

‘सरकारच्या धोरणावर असमाधानी, सरकार प्रतिमा जपण्यातच मश्गूल’ -राजू शेट्टी

वर्षभरापूर्वी सत्तेत आलेले सरकार आपली प्रतिमा जपण्यातच मश्गूल असून राज्यात काय चालले आहे, त्यांनाही कळायला मार्ग नाही.

सुटीचा फायदा घेत उमेदवारांची प्रचार फेरी

रविवारच्या सुटीच्या दिवसाची संधी साधत महापालिका निवडणुकीच्या आखाडय़ात उतरलेल्या उमेदवारांनी प्रचाराची राळ उठवली.

उदे..ग अंबे उदे.. च्या गजरात भक्तीमय उत्साह

भक्तीमय वातावरण, अलोट जनसागराच्या साक्षीने आणि उदे..ग अंबे उदे.. च्या गजरात महालक्ष्मी, तुळजाभवानी आणि त्र्यंबोली देवीच्या भेटीचा रम्य सोहळा रविवारी अतिव उत्साहात संपन्न झाला.

साठ कुटुंबातील वारसांना १८ लाखांची मदत

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्राथमिक शिक्षकांकडून झालेली मदत म्हणजे शिक्षकांच्या संवेदना जागरुक असल्याचेच प्रतीक आहे

उसाला प्रतिटन साडेतीन हजार देण्याची मागणी

या वर्षीच्या उस गाळप हंगामात उसाला अंतिम दर प्रतिटन साडेतीन हजार रुपये मिळावा, अशी मागणी करत या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास ऐन दिवाळीत हातात दांडके घेऊन आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत

गुन्हेगारी वृत्तीच्या उमेदवारांना संधी- नीलम गोऱ्हे

कोल्हापूर शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढते आहे. मात्र महापालिका निवडणुकीत ताराराणी आघाडीमधून गुन्हेगारी वृत्ती असलेल्या काही जणांना उमेदवारी देण्यात आली आहे.

राजकीय घोषणांमुळे अर्थव्यवस्था खिळखिळी होते- अरुण जेटली

कर्जमाफी आणि रास्त दरात वीज यांसारख्या निवडणूकजिंकण्यासाठी केल्या जाणाऱ्या राजकीय घोषणांमुळे राज्याबरोबरच देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी होते, असे मत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शनिवारी व्यक्त केले.

भामा आसखेड योजनेसाठी सर्व संबंधितांची बैठक बोलवा

भामा आसखेड धरणातून पुणे शहराला पाणी आणण्याची योजना मार्गी लावण्याच्या दृष्टीने सर्व संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवावी

कात्रज बोगद्यात टेम्पोला आग लागल्याने वाहतूक विस्कळीत

पुणे-सातारा रस्त्यावर नवीन कात्रज बोगद्यामध्ये रसायन घेऊन निघालेल्या टेम्पोला आग लागल्याने या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली.

कारागृहातील कैद्यांची परीक्षा घेणार

आगामी काळामध्ये कारागृहातील कैद्यांची विविध विषयांवर परीक्षा घेण्यात येणार असून, या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्यांची शिक्षा काही दिवस कमी करण्याबाबतही विचार केला जाईल

मराठवाडय़ातील साडेआठ हजार गावांत दुष्काळ

मराठवाडय़ात ८ हजार ५२२ गावांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. या निर्णयामुळे शेतसारा माफ होण्याचा मार्ग मोकळा झाला

केंद्राने योजना गुंडाळल्याने निधी बंद, कामेही थांबली!

संपुआ सरकारने औरंगाबादच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी मेगा सíकटच्या माध्यमातून २३ कोटी ४२ लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता.

वादाचे ढग निवळले! – रामदास कदम

काही काळ ढगाळ वातावरण होते, ते आता निवळले आहे, असे सांगत शिवसेना-भाजपमधील ताणतणाव तूर्तास दूर झाल्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

‘वरची धरणे ‘कॅप्सूल बॉम्ब’ने उडवा’!

ऊध्र्व गोदेवरील अतिरिक्त ठरणारी ४८ टीएमसीची धरणे कॅप्सूल बॉम्ब लावून उडवून द्यावीत

अशोक चव्हाणांकडून समर्थन आणि टोलाही!

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी शरद पवार यांना टोला लगावला.

शंकररावांवर मरण ओढविणारे धरण..!

पैठणजवळील जायकवाडी धरणाचे जनक, माजी मुख्यमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण धरणाच्या परिसरात संत ज्ञानेश्वर उद्यानात उद्या (शुक्रवारी) होत आहे.

‘कोयता बंद’मुळे मजुरांचीच कोंडी!

गोपीनाथ मुंडे ऊसतोडणी मजूर मुकादम संघटनेने पुकारलेला कोयता बंद संप चिघळत चालला.

Just Now!
X