विनायक परब

गेली ३३वर्षे विनायक परब पूर्णवेळ पत्रकारितेत असून सुरुवातीस मुंबई तरुण भारत (१९९०-९१) नंतर सांज लोकसत्ता (१९९२-९७), लोकसत्ता (१९९७- २०१२), लोकप्रभा (२०१२-२०२२) मध्ये कारकीर्द करून सध्या ते लोकसत्ता डॉटकॉमचे कार्यकारी संपादक आहेत. यापूर्वी २०००- २००६ या कालखंडात त्यांनी लोकसत्ता मुंबई डेस्क प्रमुख म्हणून तर २००६- १२ या कालखंडात त्यांनी मुंबई ‘लोकसत्ता’चे महानगर संपादक म्हणूनही काम पाहिले.
संरक्षण, विज्ञान तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, पर्यावरण आदी विषयांवर त्यांचे विपुल लेखन असून या सर्व विषयांमध्ये तज्ज्ञ म्हणून त्यांचा वेगळा परिचय आहे. ते पुरातत्वज्ञ असून पुरातत्व आणि बौद्ध अभ्यास या दोन्ही विषयांमध्ये पदव्युत्तर पदवीमध्ये त्यांना मुंबई विद्यापीठाचे सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. २०१४ साली एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईने त्यांना बुद्धीस्ट स्टडीज या विषयात फेलोशिप देऊन सन्मानित केले. बौद्ध ज्ञानशास्त्राचा आधार भारतीय संरक्षण दलांच्या धोरणात्मक निर्णयासाठी कसा घेतला जाऊ शकतो, यावर संशोधनप्रबंध सादर केला आहे. जम्मू आणि काश्मीर त्याचप्रमाणे तेथील दहशतवाद या विषयाचा त्यांचा गेल्या २० वर्षांहून अधिक अभ्यास असून काश्मीरमधील अनेक दहशतवादीविरोध कारवायांचे त्यांनी प्रत्यक्ष वार्तांकन केले आहे. त्यासाठी त्यांना मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे २००६ साली रायकर- बोस शोधपत्रकारीता पुरस्काराने गौरविण्यातही आले आहे. २००६ सालीच त्यांना पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याबद्दल द. म. सुतार पुरस्कारही प्राप्त झाला. तर मुंबईच्या इतिहासाचा शोध घेणाऱ्या सिटीवॉक मुंबई या तब्बल १२ वर्षे चाललेल्या लोकसत्तामधील स्तंभलेखनासाठी मानाचे समजले जाणारे भ्रमंतीकार प्रमोद नवलकर मानचिन्ह देऊन त्यांना २००९ साली गौरविण्यात आले. विनायक परब यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.

Konkan Flood
महापूर आणि दरडी कोसळण्याच्या घटना, १४ वर्षांचे दुर्लक्षच भोवले!

गेले आठवडाभर कोकण आणि दक्षिण महाराष्ट्र खासकरून सातारा, सांगली, कोल्हापूर या परिसरात अनेक गावे पुराखाली गेली.

pegasus
‘क्रोनॉलॉजी’चे काय?

भारतातील तब्बल एक हजार व्यक्तींच्या फोनमध्ये पेगॅससच्या माध्यमातून घुसखोरी करण्यात आली, त्याची यादी प्रसृत झाली आहे.

interior
श्वास घेणारं घर!

वैशिष्टय़पूर्ण जागा भरल्या होत्या तब्बल ११० कुंडय़ांनी! ही हिरवाई हे त्याच्या आनंदाचे निधान होते, त्याची साथसंगत, आयुष्याची रंगतही!

CJI N V Ramana
कानटोचणी!

एन. व्ही. रमणा भारताचे सरन्यायाधीश झाले आणि बऱ्याच गोष्टी बदलल्या याची दखल आपण यापूर्वीच्या ‘मथितार्थ’मध्ये घेतलीच आहे.

देर आये..

मोदी सरकारने त्यांच्या आजवरच्या धक्कादायक पद्धतीनेच हाही निर्णय जाहीर केला.

court
लांडग्यांना चाप!

नेतृत्व करणाऱ्यावर अनेकदा बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. नव्या सरन्यायाधीशांनी पदभार स्वीकारल्यानंतर तसाच काहीसा बदल भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये दिसू लागला आहे.

jobs and career
गोष्टी युक्तीच्या चार!

हल्ली सर्वच अभ्यासक्रमांचे आणि त्यातही खासकरून व्यावसायिक अभ्यासक्रमांचे पेव फुटले आहे. त्यासाठी मार्गदर्शन करणारे क्लासेस आहेत;  त्यासाठी शिबिरे- कार्यशाळादेखील घेतल्या…

water is life
तीर्थ?

भारतीय संस्कृतीतील धर्मामध्ये तीर्थ नावाची संकल्पना असून ती नैसर्गिक जलस्रोतांशी आणि पर्यायाने त्यांच्या पावित्र्याशी जोडलेली आहे. भारतात सापडलेले सर्वात प्राचीन…

WhatsApp_privacy policy
अर्धसत्य

फेब्रुवारी महिन्यात केंद्र सरकारने नवमाध्यमांसाठी नीतिनियम संहिता जारी केली. त्यासाठी दिलेल्या मुदतीच्या अखेरच्या दिवशी फेसबुकच्याच छत्रछायेखाली असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपने या संहितेस…

चौकट आणि बैठक

आधी आपला लढा हा केवळ कोविड-१९ सोबत आहे, असा आपला समज होता. मात्र आता वर्षभरानंतर आपल्याला असे लक्षात आले आहे…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या