Maharashtra Mumbai News Today : मीरा रोड येथे झालेल्या हत्यांकाडामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. आरोपी असलेल्या मनोज साने याला न्यायालयाने १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणात पोलीस तपास धक्कादायक माहिती समोर येत आहे. तसेच, कोल्हापूर शहरात माध्यमांवरील आक्षेपार्ह मजकुरानंतर दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पण, आता परिस्थिती नियंत्रणात आली असून, शहर पूर्वपदावर येत आहे. तर, मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीस पोषक स्थिती निर्माण झाल्यामुळे ४८ तासांत कर्नाटक आणि मंगळवारी ( १३ जून ) कोकणात पाऊस दाखल होण्याचा अंदाज आहे. यासह राजकीय, क्रीडा आणि मनोरंजनच्या बातम्या पाहणार आहोत….

Live Updates

Mumbai Maharashtra News Today : महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड वाचा एका क्लिकवर…

19:28 (IST) 9 Jun 2023
सिंहगड रस्त्यावरील सोसायटीत वाहनांची जाळपोळ

पुणे: सिंहगड रस्त्यावरील वडगाव खुर्द भागात एका सोसायटीत वाहने पेटवून दिल्याची घटना उघडकीस आली. याबाबत महेंद्र प्रदीप भिरुड (वय ४०, रा. सिंहगड रस्ता) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सविस्तर वाचा….

18:47 (IST) 9 Jun 2023
पुणे: विभागीय आयुक्त अनिल रामोड यांच्या निवास आणि कार्यालयात करोडो रुपये; पोलिसांनी मागवली पैसे मोजण्याची मशिन

पुणे: पुण्याचे अतिरिक्त विभागीय आयुक्त अनिल रामोड यांना आठ लाख रुपयांची लाच स्वीकारताना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने पकडले.

सविस्तर वाचा…

18:02 (IST) 9 Jun 2023
कल्याणमध्ये पारनाका येथे जलकुंभाच्या जागेत अध्यात्मिक केंद्र

धुळे – शहरातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न चांगलाच गाजत असून काही दिवसांपासून दुषित पाणी पुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी ठाकरे गटातर्फे महापालिकेसमोर आंदोलन करण्यात आले.

सविस्तर वाचा

18:01 (IST) 9 Jun 2023
कल्याणमध्ये पारनाका येथे जलकुंभाच्या जागेत अध्यात्मिक केंद्र

कल्याण– येथील पारनाका भागातील सरकार वाड्या जवळ जलकुंभाच्या जागेत एका संस्थेने अध्यात्मिक केंद्र सुरू केल्याने नागरिकांच्या भुवया उंचावल्या आहेत. जलकुंभ परिसर हा प्रतिबंधित क्षेत्र असतो. याठिकाणाहून शहराच्या काही भागाला पाणी पुरवठा केला जातो.

सविस्तर वाचा

18:00 (IST) 9 Jun 2023
बुलढाणा : खासदारांच्या ‘प्रतापगड’मध्ये भाजप नेत्यांची मांदियाळी!; शिंदे गटाच्या भूमीत भाजपाचे शक्तिप्रदर्शन

बुलढाणा : युतीत 'छुपे वादंग' निर्माण करणाऱ्या ना भुपेंद्र यादव यांच्या जिल्ह्यात आज शुक्रवारी आगमन झाले. यानिमित्त खासदार प्रतापराव जाधव यांचा गड समजल्या जाणाऱ्या मेहकरमध्ये भाजपा नेत्यांची मांदियाळी जमल्याचे चित्र दिसून आले.

सविस्तर वाचा

18:00 (IST) 9 Jun 2023
माधवी साळवे यांचा मार्गच वेगळा; राज्य परिवहन नाशिक विभागातील पहिल्या महिला बस चालक होण्याचा मान

नाशिक – वाहन चालविण्याची आवड या एकमेव निकषाचा आधार घेत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एक मुलगी वाहन चालक होऊन प्रवासी वाहतूक करण्याचा निर्णय घेते. तिच्या जिद्दीला कुटूंबियांची साथ मिळाल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागातील पहिली महिला बस चालक होण्याचा मान माधवी साळवे यांना मिळाला आहे.

सविस्तर वाचा

17:59 (IST) 9 Jun 2023
ठाणे: व्यावसायिक आस्थापनांमध्ये महिला तक्रार निवारण समिती बंधनकारक

महिलांचा कामाच्या ठिकाणी होणारा छळ, गैरवर्तवणूक यासर्व गोष्टींना आळा बसावा यासाठी व्यावसायीक आस्थापनांमध्ये आणि संबंधित कार्यालयांममध्ये महिला तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधनकारक होते. मात्र जिल्ह्यांतील बहुतांश आस्थापनांमध्ये संबंधित कार्यालयांकडून समितीची स्थापना करण्यात आली नसल्याचे निदर्शनास आले आहे.

सविस्तर वाचा

17:58 (IST) 9 Jun 2023
ठाणे,कल्याण लोकसभा शिवसेना च लढविणार;शिंदेच्या शिवसेनेचे राज्य समन्वयक नरेश म्हस्के यांचे विधान

ठाणे : ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदार संघाची जागा शिवसेनेचाच लढविणार तर, भिवंडीची जागा भाजपाच लढविणार आहे, असे विधान शिंदेच्या शिवसेनेचे राज्य समन्वयक नरेश म्हस्के यांनी शुक्रवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे.

सविस्तर वाचा

17:57 (IST) 9 Jun 2023
‘एनआयआरएफ’च्या धर्तीवर राज्यस्तरीय संस्थात्मक क्रमवारी जाहीर करणार; उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

मुंबई : केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने नुकतीच राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी २०२३ (एनआयआरएफ) जाहीर केली असून, यामध्ये महाराष्ट्राची मोठी घसरण झाल्याचे निदर्शनास आले आहे. देशातील सर्वोत्तम दहा विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये महाष्ट्रातील एकाही विद्यापीठाचा वा महाविद्यालयाचा समावेश नाही.

सविस्तर वाचा

17:50 (IST) 9 Jun 2023
अमरावती : शरद पवारांना धमकी देणाऱ्या सौरभ पिंपळकरला तात्‍काळ अटक करा, राष्‍ट्रवादी काँग्रेस आक्रमक, पोलीस आयुक्‍तांना निवेदन

अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आल्‍यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून, या प्रकरणाचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत. शरद पवार यांना धमकीचे ट्विट करणारा अमरावतीतील भाजपाचा कार्यकर्ता सौरभ पिंपळकर याला तात्‍काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्‍या कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांची शुक्रवारी भेट घेऊन निवेदन सादर केले.

सविस्तर वाचा…

17:44 (IST) 9 Jun 2023
भिवंडीत १२ कोटींचा रासायनिक साठा जप्त

ठाणे: भिवंडी येथील पूर्णा भागात ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने १२ कोटी रुपयांचा रासायनिक ज्वलनशील साठा जप्त केला आहे. हा साठा बेकायदेशीर साठवणूक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सविस्तर वाचा…

17:37 (IST) 9 Jun 2023
संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी; दोन जणांना अटक

शिवसेना ( ठाकरे गट ) संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत यांना धमकी प्रकरणी दोन जणांचा अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

17:26 (IST) 9 Jun 2023
रेल्वे स्थानकावरच पाडला मुडदा, नागपुरात मध्यरात्रीचा थरार

नागपूर : देशाच्या मध्यभागी असलेल्या नागपूर रेल्वे स्थानकावरील सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. येथे गुरुवारी रात्री एका प्रवाशाचा खून झाला. यापूर्वी एका प्रवाशाच्या नातेवाईकाने बॅटरी कार चालकाला तलवार दाखवून धमकावले होते.

सविस्तर वाचा…

17:05 (IST) 9 Jun 2023
शरद पवारांना ठार मारण्‍याची धमकी देणारा भाजपा कार्यकर्ता; बावनकुळे, दानवेंसोबतची छायाचित्रे समोर

अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ठार मारण्याची धमकी मिळाल्‍यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच त्यांना धमकी देणारा हा अमरावतीतील भाजपाचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली आहे. सौरभ पिंपळकर नावाच्या तरुणाने ट्विटरवरून पवारांना धमकी दिली. तेव्हापासून सौरभ पिंपळकरचा पोलीस शोध घेत आहेत.

सविस्तर वाचा…

17:02 (IST) 9 Jun 2023
शरद पवारांना ठार मारण्‍याची धमकी देणारा भाजपा कार्यकर्ता; बावनकुळे, दानवेंसोबतची छायाचित्रे समोर

अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ठार मारण्याची धमकी मिळाल्‍यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच त्यांना धमकी देणारा हा अमरावतीतील भाजपाचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली आहे. सौरभ पिंपळकर नावाच्या तरुणाने ट्विटरवरून पवारांना धमकी दिली. तेव्हापासून सौरभ पिंपळकरचा पोलीस शोध घेत आहेत.

सविस्तर वाचा…

16:49 (IST) 9 Jun 2023
जुनी डोंबिवलीत तरुणाला बेदम मारहाण

डोंबिवली: येथील पश्चिमेतील जुनी डोंबिवली भागात पूर्ववैमनस्यातून दोन तरुणांनी याच भागातील एका तरुणाला बेदम मारहाण केली. नेमाडे गल्ली येथे बुधवारी रात्री साडे सात वाजता हा मारहाणीचा प्रकार घडला.

सविस्तर वाचा…

16:42 (IST) 9 Jun 2023
“महाराष्ट्रात शिंदे-फडणवीसांचा जंगलराज, झेपत नसेल तर सत्ता सोडा”, कायदा सुव्यवस्थेच्या कारणावरून नाना पटोले कडाडले

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या वेगवेगळ्या भागात दररोज हत्या, बलात्कार, दंगली घडत आहेत. विरोधकांना धमक्या, विरोधी पक्षाच्या नेत्यांवर हल्ले होत आहेत. राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिली नसून शिंदे-फडणवीसांचे जंगलराज सुरू आहे, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. ते आज नागपुरात माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

सविस्तर वाचा…

16:30 (IST) 9 Jun 2023
Mira Road Murder : सरस्वती आणि मनोज साने यांनी मंदिरात केले होते लग्न, सरस्वतीच्या ३ बहिणींची डीएनए चाचणी

Mira Road Murder Case Mumbai : सरस्वती वैद्य आणि मनोज साने यांनी मंदिरात लग्न केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. मात्र मनोज साने याचे वय जास्त असल्याने ही बाब बाहेर लपवून ठेवली होती. ती ज्या अनाथ आश्रमात वाढली तिथे सर्वांना मनोज मामा असल्याचे सांगत होती. सारस्वती वैद्यला एकूण ४ बहिणी आहेत. सर्व बहिणी अनाथ आश्रममध्ये राहात होत्या.

सविस्तर वाचा…

16:04 (IST) 9 Jun 2023
नागपूर : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीला ‘बुस्ट’! नवीन कंपनीची स्थापना कशाला?

नागपूर : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टप्पा- २ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘एम. एस. ई. बी.’ सोलर अ‍ॅग्रो पॉवर मर्यादित कंपनी’ची स्थापना करण्यात आली आहे. या कंपनीच्या पहिल्या संचालक मंडळाची बैठकही नुकतीच मुंबईत झाली.

सविस्तर वाचा…

16:02 (IST) 9 Jun 2023
उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील विद्यापीठाच्या रँकिंगबद्दल काय म्हणाले? केल्या ‘या’ सूचना

नागपूर : भारतातील उच्च शिक्षण संस्थांच्या मानांकन यादीत महाराष्ट्राचा क्रमांक वरचा असला पाहिजे. सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या रँकिंग यादीत येण्यासाठी सर्व विद्यापीठांनी आवश्यक गुणात्मक सुधारणा करावी, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

सविस्तर वाचा…

15:58 (IST) 9 Jun 2023
डोंबिवलीत सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अत्याधुनिक तंत्रज्ञानातून रस्ता बांधणी

डोंबिवली: डोंबिवली पूर्व भागातील के. व्ही. पेंढरकर महाविद्यालय रस्त्यावरील घरडा सर्कल ते आर. आर. रुग्णालयापर्यंतचा ३०० मीटरचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन बांधणीचे काम सुरू केले आहे.

सविस्तर वाचा…

15:54 (IST) 9 Jun 2023
संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी; नितेश राणे म्हणाले, “मच्छर मारण्यासाठी…”

शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यावर भाजपा आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मच्छर मारण्यासाठी कुणाच्या धमकीची गरज नाही. धमकी नेमकं कोणाकडून आली, हे सुनील राऊत यांना विचारा,” असं नितेश राणे म्हणाले आहेत.

15:22 (IST) 9 Jun 2023
डोंबिवली एमआयडीसीत काँक्रीटच्या नव्या रस्त्यावर खोदकाम, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी

डोंबिवली: डोंबिवली एमआयडीसीतील डाॅ. नानासाहेब धर्माधिकारी रस्त्यावरील शिवशाही मित्र मंडळ कार्यालयासमोरील सिमेंट काँक्रीटचा नवाकोरा रस्ता शुक्रवारी सकाळी जेसीबीच्या साहाय्याने तोडण्यात आल्याने नागरिक, वाहन चालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

सविस्तर वाचा…

15:22 (IST) 9 Jun 2023
पुणे : अपघाती मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांचा दावा नाकारणाऱ्या विमा कंपनीला दणका

अपघातात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचा दावा नाकारणाऱ्या विमा कंपनीला ग्राहक तक्रार निवारण आयोगाने तडाखा दिला आहे. विमा कंपनीने शेतकऱ्याच्या कुटुंबीयास नुकसानभरपाईपोटी दोन लाख रुपये दावा दाखल झाल्यापासून वार्षिक सात टक्के व्याजाने द्यावे, असा आदेश आयोगाचे अध्यक्ष जे. व्ही. देशमुख, सदस्य शुभांगी दुनाखे, अनिल जवळेकर यांनी दिले.

सविस्तर वाचा

15:20 (IST) 9 Jun 2023
बीजेपी क्या हुआ तेरा वादा, पाणीप्रश्नी धुळेकरांचा फलकाव्दारे प्रश्न

दिवसाआड पिण्याचे पाणी देण्याचे आश्वासन दिलेले असताना पाण्यासाठी धुळेकरांचे होणारे हाल पाहून येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी बीजेपी क्या हुआ तेरा वादा ?, सत्ता तुमची, हाल जनतेचे, पाणी द्या नाहीतर राजीनामा द्या, अशा आशयाचे फलक महानगर पालिकेसमोर लावले.

सविस्तर वाचा

15:12 (IST) 9 Jun 2023
“हे महाविकास आघाडीचे सरकार नाही, पवारांची काळजी घेऊ”, काय म्हणाले नितेश राणे?

नागपूर : शरद पवार यांच्याशी आमचा वैचारिक विरोध असला तरी त्यांना राज्यात काहीही त्रास होणार नाही. एवढी काळजी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील. हे उद्धव ठाकरेंचे सरकार किंवा महाविकास आघाडीचे सरकार नाही, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे आमदार निलेश राणे यांनी येथे केली.

सविस्तर वाचा..

15:06 (IST) 9 Jun 2023
बीजेपी क्या हुआ तेरा वादा, पाणीप्रश्नी धुळेकरांचा फलकाव्दारे प्रश्न

दिवसाआड पिण्याचे पाणी देण्याचे आश्वासन दिलेले असताना पाण्यासाठी धुळेकरांचे होणारे हाल पाहून येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी बीजेपी क्या हुआ तेरा वादा ?, सत्ता तुमची, हाल जनतेचे, पाणी द्या नाहीतर राजीनामा द्या, अशा आशयाचे फलक महानगर पालिकेसमोर लावले. २० जूनपर्यंत दिवसाआड पाणी न दिल्यास महापालिकेला हंड्यांचे तोरण बांधण्याचा इशारा दिला.

सविस्तर वाचा

14:41 (IST) 9 Jun 2023
‘एल निनो’ यंदाही वातावरणाचे गणित बिघडवणार? वाचा काय म्हणते अमेरिकेची संस्था….

नागपूर : ‘नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन’ या अमेरिकेतील हवामान अभ्यासक संस्थेने ‘एल निनो’च्या आगमनाची वर्दी दिली आहे. दर महिन्याच्या नऊ तारखेला या संस्थेकडून ‘एल निनो’ बाबत माहिती दिली जाते. आगमनाची माहिती देतानाच हिवाळ्यात ‘एल निनो’ आणखी मजबूत होण्याची शक्यताही या संस्थेने वर्तवली आहे.

सविस्तर वाचा..

14:29 (IST) 9 Jun 2023
विदर्भातील ओबीसी मतांवर सर्वपक्षीयांचा डोळा

नागपूर : कधीकाळी संघटितपणे काँग्रेसच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिलेला विदर्भातील बहुजन समाज कालांतराने शेटजी-भटजींचा पक्ष अशी ओळख असलेल्या भाजपकडे वळला. त्यामुळे काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातच (विदर्भ) भाजपने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. वर्षभराने होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेता काँग्रेसने आपल्या दुरावलेल्या पारंपरिक मतपेढीला पुन्हा पक्षाकडे वळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

सविस्तर वाचा..

14:08 (IST) 9 Jun 2023
‘बिपरजॉय’ आणखी तीव्र; भारताच्या किनारपट्टीवर मोठा परिणाम

नागपूर : केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर देशात इतर ठिकाणीही मान्सूनच्या हालचालींना वेग आला आहे. तर त्याचवेळी ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा धोका देशाच्या किनारपट्टीवर येऊन ठेपला आहे. येत्या ४८ तासात हे चक्रीवादळ आणखी तीव्र होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

सविस्तर वाचा…

लोकसभेच्या ४५, तर विधानसभेच्या २०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा निर्धार केलेल्या भाजपने राज्यातील सर्व लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूकप्रमुखांची नियुक्ती केली आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाच्या ताब्यात असलेल्या मतदारसंघांमध्येही भाजपने निवडणूक प्रमुख नेमले असले तरी ते शिवसेनेसाठीही काम करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी स्पष्ट केले.