अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आल्‍यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून, या प्रकरणाचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत. शरद पवार यांना धमकीचे ट्विट करणारा अमरावतीतील भाजपाचा कार्यकर्ता सौरभ पिंपळकर याला तात्‍काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्‍या कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांची शुक्रवारी भेट घेऊन निवेदन सादर केले.

धमकी देणारा सौरभ पिंपळकर हा अमरावतीचा असून भाजपा युवा मोर्चाचा कार्यकर्ता आहे. शहरातील बहुचर्चित कॉपी प्रकरणातही तो गुंतलेला आहे. मात्र त्याच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई झाली नाही. भाजपाचे नेते सौरभ पिंपळकरला अभय देत असल्याने त्याने शरद पवार यांच्‍याविरुद्ध जाणीवपूर्वक ट्विट केले आहे. त्यामुळे त्याच्‍यावर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांना करण्यात आली. कारवाई न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस कठोर भूमिका घेईल, कार्यकर्ते सौरभ पिंपळकरचा समाचार घेतील, असा इशारा राष्‍ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत डवरे यांनी दिला.

dhairyasheel mohite patil marathi news
मोहिते-पाटील यांच्या बंडामुळे माढ्यातील राजकीय समीकरणे बदलली
sangli Mahavikas Aghadi
मविआची उमेदवारी चंद्रहार पाटील यांना जाहीर होताच कॉंग्रेस संतप्त, बैठकीत पुढील निर्णय – आमदार सावंत
Archana Patil joins NCP
अर्चना पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश; धाराशिवमधून उमेदवारी जाहीर, ओमराजे निंबाळकरांशी लढत
Sharad Pawar Wardha tour
वर्धा : शरद पवार यांच्याकडे काँग्रेस नेत्यांच्या तक्रारी, पवार म्हणाले…

हेही वाचा – रेल्वे स्थानकावरच पाडला मुडदा, नागपुरात मध्यरात्रीचा थरार

यावेळी माजी महापौर किशोर शेळके, अविनाश मार्डीकर, प्रमोद महल्ले, निलेश शर्मा, प्रशांत महल्ले, ॲड. सुनील बोळे, ऋतुराज राऊत, किशोर भुयार, वाहिद खान, आनंद मिश्रा, प्रा. अजय बोन्डे, बंडू निंभोरकर, दिलीप कडू, अमोल देशमुख, प्रशांत पेठे आदी उपस्थित होते.