Mumbai Maharashtra Breaking News Today: महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार स्थापन झाल्यापासून छगन भुजबळांना न मिळालेल्या मंत्रिपदाची जोरदार चर्चा पाहायला मिळाली होती. अखेर या चर्चेवर आता पडदा पडला असून त्यांचा मंत्रिमंडळातील समावेश निश्चित झाला आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात ठिकठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गासमोर पेच निर्माण झाला असून ऐन उन्हाळ्यात पावसाळा वाट्याला आल्यामुळे शहरी भागात नागरिकांची तारांबळ उडताना दिसत आहे.
Mumbai Maharashtra News Live Today 20 May 2025 : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा
सैन्यदलाच्या गौरवार्थ साताऱ्यात तिरंगा फेरी
सातारा : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलाने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरअंतर्गत दिलेले शौर्यपूर्ण योगदान समस्त देशवासीयांसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. भारतीय सैन्यदलाचे आभार व्यक्त करण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहरात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले.
या तिरंगा रॅलीमध्ये जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, माजी सैनिक नागरिक यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. पोलीस बँन्ड पथकाने राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत वाजवून व भारत माता की जय अशा घोषणा देत गांधी मैदान येथून तिरंगा रॅलीला सुरुवात झाली. तिरंगा रॅली ही छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पोवई नाका आल्यानंतर या रॅलीचा समारोप करण्यात आला.
कळमनुरी मार्गावर मोटार पेटली; चौघी बचावल्या
हिंगोली : शहरापासून ९ किलोमीटर अंतरावर हिंगोली ते कळमनुरी मार्गावर एका मोटारने मंगळवारी दुपारी अचानक पेट घेतला. या घटनेत कारमधून प्रवास करणाऱ्या तीन महिला आणि एक मुलगी थोडक्यात बचावली. चौघीही खानापूरचित्ता येथे पाणी पिण्यासाठी उतरताच काही क्षणात मोटारने पेट घेतला, त्यात चालक विनायक सोळंके भाजले. त्यांना तातडीने हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार औंढा नागनाथ तालुक्यातील येहळेगाव सोळंके येथील विनायक सोळंके हे हिंगोली येथून मोटारने भाडे घेऊन लग्नसोहळ्यासाठी जात होते. मोटारच्या वायरिंगमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मोटारने पेट घेतला. प्रसंगावधान राखून विनायक खाली उतरले. मात्र तो पर्यंत त्यांचा हात व पाय भाजल्या गेल्या. हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक शामराव डोंगरे, आकाश पंडितकर यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलास माहिती दिली.
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी; विजांच्या कडकडाटासह वादळी वारा पावसाने जिल्ह्याला झोडपले
‘माझे घर, माझा अधिकार’चा नारा देत राज्याचं नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर! मंत्रिमंडळ बैठकीत आठ मोठे निर्णय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नवनिर्वाचित मंत्री भुजबळांसह सर्व मंत्री उपस्थित होते. या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी प्रामुख्याने राज्याचं नवं गृहनिर्माण धोरण जाहीर करण्यात आलं.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. आज छगन भुजबळ यांनी राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, या पार्श्वभूमीवर बोलताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. ते म्हणाले की, “काही लोक जरा उतावीळपणा दाखवतात. थो़डी वाट पाहिली पाहिजे. अजित पवारांना सर्व कार्यकर्त्यांची जाणीव आहे. वेळ आल्यावर ते सर्वांना न्याय देत असतात. त्यामुळे वेळ यावी लागते, त्यासाठी काही वाट पाहावी लागते. मात्र, तसं न करता लगेच नकारात्मक बोलणं हे काय राजकीय गणिताला धरून नाही. जहा नहीं चैना, वहा नहीं रहना हे त्यांचं भाष्य उताविळपणाचं भाष्य होतं”, असं कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे.
“मनोज जरांगेने संपूर्ण मराठा समाजाचं प्रचंड नुकसान केलं आणि..”; छगन भुजबळ यांचं वक्तव्य
अजित पवार हे आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी निर्णय घेतला म्हणूनच मी मंत्रिमंडळात आलो. अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल पटेल आणि संपूर्ण राष्ट्रवादी पक्षाचा मी आभारी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाही आभारी आहे असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
कळवा, मुंब्रा, दिवा परिसरात गुरुवारी पाणी नाही, दुरुस्तीच्या कामासाठी एमआयडीसीचा पाणी पुरवठा राहणार बंद
नवी मुंबईतील आलिशान इमारतीच्या उभारणीत १७५ कोटींची फसवणूक
Shivsena UBT stand on delegations : ऑपरेशन सिंदूरबाबत विदेशात जाणाऱ्या शिष्टमंडळांबाबत ठाकरे गटाची भूमिका
पहलगाम हल्ला आणि त्यानंतरच्या स्थितीबाबत, इंटेलिजन्स व पहलगाममधील सुरक्षेच्या बाबतीत आपलं अपयश यासंदर्भात आमची स्वतंत्र मतं नक्की आहेत. आम्ही आपल्या देशात त्याबाबत नक्कीच प्रश्न विचारत राहू. पण आपण जगभरात पाकिस्तानकडून आश्रय दिल्या जाणाऱ्या दहशतवादाचा मुद्दा ठामपणे मांडायला हवा.
Shivsena UBT stand on delegations : ऑपरेशन सिंदूरबाबत विदेशात जाणाऱ्या शिष्टमंडळांबाबत ठाकरे गटाची भूमिका
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजु यांनी पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरेंशी फोनवर चर्चा केली. ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती देण्यासाठी इतर देशामध्ये जाणाऱ्या शिष्टमंडळांसंदर्भात त्यांच्यात संवाद झाला. हे शिष्टमंडळ राजकारणासाठी नसून दहशतवादाविरोधातील लढ्यासाठी आहेत. त्यामुळे आम्ही सरकारला खात्री दिली आहे की देशहितासाठी जे काही आवश्यक असेल, ते आम्ही करू. शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी या शिष्टमंडळाच्या सदस्या म्हणून इतर देशांमध्ये जातील आणि भारताची भूमिका मांडतील.
घराशेजारीच गांजाची लागवड आणि विक्री, सात जणांवर गुन्हा
पालिकेतील प्रशासकीय आधिकाऱ्यांच्या बदल्या
Eknath Shinde on Chhagan Bhujbal: भुजबळांच्या अनुभवाचा सरकारला फायदा – एकनाथ शिंदे
छगन भुजबळ हे आधीही मंत्रीपदी राहिले आहेत. अनेक विभाग त्यांनी सांभाळले आहेत. ते एक अनुभवी मंत्री आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे ते शिवसैनिकही आहेत. मी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांच्या अनुभवाचा सरकारला नक्कीच फायदा होईल – एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री
Chhagan Bhujbal Oath Ceremony : मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; खात्याविषयी म्हणाले, “जो विभाग…”
Chhagan Bhujbal Portfolio: कोणतं खातं मिळणार? भुजबळ म्हणाले..
मला कोणतं खातं दिलं जावं ते तर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री ठरवतील. मी काही विभाग वगैरे सांगितलेलं नाही. जे खातं देतील त्याचं काम मी करेन. १९९१ सालापासून मी मंत्री बनत आलोय. गृह मंत्रालयापासून सगळी खाती मी सांभाळली आहेत – छगन भुजबळ
छगन भुजबळ अनुभवी मंत्री – एकनाथ शिंदे
त्यांनी अनेक विभागात काम केलं असून ते अनुभवी मंत्री आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे ते शिवसैनिकही आहेत. त्यांची सुरुवात शिवसेनेपासून झाली. नगरसेवकापासून त्यांनी त्यांची राजकीय कारकिर्द सुरू केली. आमदार, मंत्री बनले. अनेक पदं त्यांनी सांभाळली आहे. अनुभवी नेता म्हणून त्यांना ओळखलं जातं – एकनाथ शिंदे</p>
Chhagan Bhujbal Oath at Rajbhavan: छगन भुजबळांचा शपथविधी लाईव्ह
छगन भुजबळ यांचा शपथविधी राजभवनात संपन्न
? राजभवन, मुंबई#थेटप्रसारण
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 20, 2025
शपथविधी समारंभास मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांची उपस्थिती.#LIVE#मंत्रिमंडळविस्तार#शपथविधीसोहळा#SwearingInCeremony#OathCeremony
https://t.co/KwkEmjBokB
Manoj Jarange Patil on Chhagan Bhujbal: मनोज जरांगेंचं अजित पवारांबाबत विधान
त्यांनी शपथ घेतली किंवा नाही हा त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. ते आधीही मंत्री होतेच आणि आताही आहेत. आम्हाला त्यानं काही फरक पडत नाही. असे जातीयवादी लोक पोसायचे आणि राज्यात जातीय तणाव निर्माण करायचा हे अजित पवारांना का कळत नाही. अजित पवार दरवेळी मोठी चूक करतात. मला १०० टक्के खात्री आहे की छगन भुजबळांना तात्पुरतं जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आणलं असणार – मनोज जरांगे पाटील
Chhagan Bhujbal Oath: भुजबळांसाठी आदिती तटकरे रायगडच्या पालकमंत्रीपदावरचा दावा सोडणार?
एकीकडे भुजबळांच्या मंत्रिपदाचा तिढा सुटला असला, तरी नाशिक व रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा मात्र अद्याप कायम आहे. शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे आमदार भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रह धरला आहे. पण आता भुजबळांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळे रायगडचं पालकमंत्रीपद गोगावलेंना देऊन नाशिकचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेस भुजबळांसाठी स्वत:कडे घेण्याची शक्यता आहे. मात्र, असं झाल्यास आदिती तटकरेंना रायगडच्या पालकमंत्रीपदावरील दावा सोडावा लागेल.
“वाह फडणवीस वाह, असा काय नाईलाज आहे की…”, छगन भुजबळांच्या शपथविधीवर अंजली दमानियांचा सवाल!
Chhagan Bhujbal Oath: भुजबळ म्हणतात, “ज्याचा शेवट चांगला, ते सगळं चांगलं”
ज्याचा शेवट चांगला, ते सगळं चांगलं. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल तटकरे यांचे आभार मानतो. हे सगळं ८ दिवसांपूर्वीच ठरलं. आमची ८ दिवसांपूर्वी बैठक झाली. त्यात सगळं ठरलं. सोमवारी शपथविधी करायचा होता. पण सगळे मंत्री मंगळवारी असतात म्हणून मंगळवारी शपथविधी घेण्याचं ठरलं – छगन भुजबळ
Chhagan Bhujbal: नाशिकच्या पालकमंत्रीपदाचं काय?
मला त्याबद्दल आत्ता जास्त काही सांगता येणार नाही. यासंदर्भात सर्वाधिका मुख्यमंत्र्यांचे आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासंदर्भात योग्य वेळी घोषणा करतील – छगन भुजबळ
Anjali Damania on Chhagan Bhujbal Oath: छगन भुजबळांच्या शपथविधीवर अंजली दमानियांची पोस्ट
छगन भुजबळ मंगळवारी सकाळी 10 वाजता राजभवनात मंत्रीपदाची शपथ घेणार ? वाह फडणवीस वाह ! म्हणजे एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री येणार? जनता अशीच भरडली जमणा? की हा माझ्यासारख्या भ्रष्टाचार विरोधी लढणाऱ्यांना संदेश आहे, की तुम्ही आमच काहीच वाकड करू शकत नाही ? असा काय नाईलाज आहे ? की सभ्य माणसं मिळत नाहीत राजकारणात ? आणि हो, हेच भुजबळ जेव्हा जेल मधे होते, तेव्हा एक अगदी बिचाऱ्या सारखा फोटो माध्यमांमध्ये दाखवला जायचा. तेव्हा छातीत कळ यायची. मग आता ठणठणीत ? किळस वाटतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची खालच्या घोषणा आठवतात ? “भ्रष्टाचारीयो पर कारवाई के लिए, अब की बार ४०० पार” “भ्रष्टाचार के खिलाफ मोदी सरकार के बडे कदम” हा आहे का तो बडा कदम ? ही ती कारवाई ? – अंजली दमानिया
छगन भुजबळ मंगळवारी सकाळी 10 वाजता राजभवनात मंत्रीपदाची शपथ घेणार ?
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) May 20, 2025
वाह फडणवीस वाह !
म्हणजे एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री येणार? जनता अशीच भरडली जमणा? की हा माझ्यासारख्या भ्रष्टाचार विरोधी लढणाऱ्यांना संदेश आहे, की तुम्ही आमच काहीच वाकड करू शकत नाही ?
असा… pic.twitter.com/dLj7MN79JE
Chhagan Bhujbal Oath: छगन भुजबळांचा शपथविधी…
छगन भुजबळांच्या शपथविधीबाबत त्यांच्या समर्थकांमध्ये जल्लोषाचं वातावरण असून त्यांचा मतदारसंघ असणाऱ्या येवल्यामध्ये समर्थक कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे.
Chhagan Bhujbal Oath: छगन भुजबळांना कोणतं खातं मिळणार?
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे आता धनंजय मुंडेंकडे जे खातं होतं तेच खातं अर्थात अन्न व नागरी पुरवठा खातं छगन भुजबळ यांच्याकडे दिलं जाण्याची शक्यता आहे.
Chhagan Bhujbal Oath: स्वत: भुजबळांनीच दिली शपथविधीची माहिती
मंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्याबाबत छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली असून मला राज्य मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याची माहिती मिळाली आहे. मंगळवारी सकाळी १० वाजता शपथविधी होईल, असं त्यांनी म्हटलं असल्याचं पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
Chhagan Bhujbal Oath: छगन भुजबळांचा शपथविधी…
महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर महायुतीच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांना आधी स्थान देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे छगन भुजबळ यांनी आपली जाहीर नाराजी बोलून दाखवली होती. एवढंच नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनील तटकरे, खासदार प्रफुल पटेल यांच्यावर त्यांनी टीका केली होती. मात्र, अखेर छगन भुजबळ यांचं राष्ट्रवादी काँग्रेसकडून आता राजकीय पुनर्वसन करण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे.
Chhagan Bhujbal Swaring in: छगन भुजबळांचा शपथविधी…
छगन भुजबळ यांच्या मंत्रिपदाचा शपथविधी सोहळा राजभवनात होणार असून या सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीचे अनेक नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. छगन भुजबळ यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
Senior NCP leader Chhagan Bhujbal says he will be inducted into Maharashtra cabinet on Tuesday.
— Press Trust of India (@PTI_News) May 19, 2025
PTI ND
Chhagan Bhujbal Oath Ceremony : छगन भुजबळ घेणार मंत्रिपदाची शपथ, सकाळी राजभवनात होणार शपथविधी; कोणतं खातं मिळणार?
(संग्रहित छायाचित्र)
Mumbai Maharashtra News Live Today 20 May 2025 : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा