-
'नेटफ्लिक्स'वर 'सेक्रेड गेम्स २' ही वेब सीरिज येत्या १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी या सीरिजमधील सर्व कलाकारांचा मेकओव्हर करण्यात आला असून एका नव्या अंदाजात त्यांचा फोटोशूट करण्यात आला आहे. या फोटोशूटमध्ये गणेश गायतोंडे, सरजात सिंगसह सर्व कलाकार रेट्रो लूकमध्ये पाहायला मिळत आहेत.
-
'सेक्रेड गेम्स २'मधील कलाकारांचा हा स्टायलिश अंदाज नेटकऱ्यांना चांगलाच आवडला आहे.
या दुसऱ्या सिझनची कथा नेमकी काय असणार आहे आणि पहिल्या सिझनमध्ये पडलेल्या प्रश्नांची उत्तरं या सिझनमध्ये मिळणार का याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. -
ल्यूक केनी माल्कोमची भूमिका साकारत आहे. 'सेक्रेड गेम्स २'मध्ये गुरुजींना काही कामं करायीच असतील तर ते माल्कोमला इशारा देतात आणि माल्कोम सर्वकाही करतो. या सिझनमध्ये माल्कोम काही अतरंगी गोष्टीसुद्धा करतो.
-
दुसऱ्या सिझनमध्ये बंटीच्या व्यवसायात फार मोठा बदल होणार आहे. तो बदल काय असणार यासाठी तुम्हाला १५ ऑगस्टपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
'सेक्रेड गेम्स २'मध्ये रणवीर शौरीची वाईल्ड कार्ड एण्ट्री झाली आहे. रणवीरसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. सुरवीन चावला या सिझनमध्ये जोजोच्या भूमिकेची काही पैलू उलगडणार आहे. या सिझनमध्ये तिची भूमिका मोठी आहे. ही जोजो गायतोंडेच्या आयुष्यात काय बदल घडवून आणणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. पंकज त्रिपाठी साकारत असलेली गुरूजींची भूमिका या सिझनमध्ये सर्वांत महत्त्वाची आहे. 'गुरूजीचा खेळ समजण्यासाठी तुम्हाला दुसरा सिझन दोनदा पाहावा लागणार,' असं पंकज त्याच्या भूमिकेविषयी सांगतो. सरताज सिंग या सिझनमध्ये पहिल्यापेक्षा जास्त फिट असणार आहे. त्याच्या खांद्यांवर यावेळी मोठी जबाबदारी असणार आहे. कल्की कोचलीन या सिझनमध्ये 'बाट्या' ही भूमिका साकारणार आहे. या भूमिकेविषयी ती सांगते, 'बाट्या भरकटलेली आहे. सतत इथेतिथे भटकत असते. तिचं आणि गुरुजींचं काय नातं असतं हे तुम्हाला या सिझनमध्ये पाहायला मिळेल.'

नितीन गडकरींनी सरन्यायाधीश गवईंना दिला ‘आदेश’, त्यांच्याकडून लगेच मान्यही….