-
काही दिवसांपूर्वी चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक यांनाही करोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांची मुलगी वंशिकाची करोना चाचणी करण्यात आली असून तिला ही रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. सतीश यांच्या तब्येतीत सुधारणा दिसल्याने त्यांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. मात्र, त्यांची मुलगी अजूनही रुग्णालयात आहे. सतीश यांना त्यांच्या मुलीची आठवण येत असल्याने त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
-
सतीश यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्यांचा आणि वंशिकाचा रुग्णालयातील एक फोटो शेअर केला आहे. "वडिल आणि मुलगी कोविड-नसलेल्या जगाची वाट पाहत आहोत", अशा आशयाचे कॅप्शन त्यांनी तो फोटो शेअर करत दिले आहे. त्यांनी त्यांच्या या पोस्टमध्ये डॉक्टरांचे देखील आभार मानले आहे.
-
सतीश सोशल मीडियावर त्यांच्या मुलीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतात.
-
त्या दोघांमध्ये किती चांगली बॉंडिंग आहे हे त्यांच्या फोटो आणि व्हिडीओतून स्पष्ट दिसते.
-
खरतरं सतीश ५६ वर्षांचे असताना सरोगसीच्या मदतीने वंशिकाचे वडिल झाले आहेत.
-
२०१२ मध्ये वंशिकाचा जन्म झाला. वंशिका आधी सतीश यांना एक मुलगा देखील होता. मात्र दोन वर्षांचा असताना त्याचे निधन झाले.
-
त्याच्या नंतर सरोगसीच्या मदतीने सतीश आणि त्यांची पत्नी शशि कौशिक यांना पुन्हा एकदा पालकत्वाचे सुख मिळाले.
-
ज्या प्रमाणे प्रोफेश्नल लाइफमध्ये सतीश त्यांच्या कामाला महत्त्व देतात, त्याचप्रमाणे त्यांच्या मोकळ्या वेळात ते संपूर्ण वेळ कुटूंबासोबत व्यतीत करतात.
-
काही दिवसांपूर्वी 'कागज' हा त्यांचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात ते पंकज त्रिपाठी यांच्या सोबत दिसले होते. हा चित्रपट जानेवारी महिन्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता.
-
सतीश यांनी अनेक चित्रपटांचे निर्माते आणि दिग्दर्शक होते. 'रुप की रानी चोरों का राजा', 'बधाई हो बधाई', 'तेरे नाम', 'तेरे संग', 'प्रेम', 'मिस्टर बेचारा' सारख्या अनेक चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. (All photo credit : satish kaushik instagram)

दिवाळीआधीच ‘या’ ३ राशी होतील कोट्यधीश! शुक्राच्या गोचरामुळे तिजोरीत पैशांची वाढ तर करिअर धरणार सुस्साट वेग