-
बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोणचा आज ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे.
-
बॉलिवूडची सर्वात लोकप्रिय जोडी म्हणून दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहला ओळखले जाते.
-
ते दोघेही सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असतात. या दोघांची लव्हस्टोरीही एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणेच असल्याचे नेहमी बोललं जाते.
-
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘गोलियों की रासलीला राम-लीला’ या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान ते दोघेही एकमेकांच्या प्रचंड प्रेमात पडले होते. रणवीरला दीपिका प्रचंड आवडायची. मात्र दीपिकाने या नात्यासाठी फार वेळ घेतला.
-
दीपिका आणि रणवीर या दोघांनी २०१८ मध्ये लगीनगाठ बांधली. त्याआधी जवळपास ६ वर्षे ते दोघेही रिलेशनशिपमध्ये होते.
-
लग्नाच्या चार वर्षांपूर्वी त्या दोघांनी एकमेकांसोबत गुपचूप साखरपुडाही केला होता. एका मुलाखतीदरम्यान तिने याबाबतचा गौप्यस्फोट केला.
-
या मुलाखतीदरम्यान दीपिका म्हणाली की, “मी आणि रणवीरने गुपचूप साखरपुडा केला आहे, याची बातमी फक्त आमच्या घरातील सदस्यांना माहिती होती. कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त दीपिका आणि रणवीर या दोघांनीही त्यांच्या या साखरपुड्याबद्दल कोणालाही सांगितले नव्हते.”
-
२०१८ मध्ये फिल्म फेअर सोहळ्यादरम्यान एका मुलाखतीत दीपिकाने रणवीरसोबतच्या नात्याबद्दल अनेक खुलासे केले होते.
-
“मी जेव्हा मागे वळून पाहते तेव्हा सुरुवातीचे ५-६ महिने आमच्यात फार भावनिक नाते होते. त्यानंतर अनेकजण लग्न कधी करणार? असा प्रश्न विचारायचे. पण रणवीरबद्दल मला कधीच शंका नव्हती,” असेही दीपिका म्हणाली.
-
यापुढे दीपिकाने म्हटले की, “गेल्या ६ वर्षात आमचे नाते खूप चांगल्या आणि वाईट काळातून गेले आहे. पण आम्ही कधीही ब्रेकअपबद्दल चर्चा केली नाही. आमच्यात कधीच मोठे भांडण झाले नाही.”
-
“आम्ही काही दिवस एकमेकांपासून वेगळे झालो आणि नंतर पुन्हा एकत्र आलो. आमच्यात भांडणे झाली, चांगली आणि वाईट अशी दोन्हीही वेळ आली, पण आम्ही आमच्या रिलेशनशिपवर विश्वास ठेवला,” असेही ती म्हणाली.
-
“विशेष म्हणजे रिलेशनशिपनंतर अवघ्या दोन वर्षात आम्ही साखरपुडा केला होता. याची कोणालाही माहिती नव्हती,” असेही दीपिका म्हणाली.
-
“या गुपचूप केलेल्या साखरपुड्याबद्दल केवळ रणवीरच्या आई-वडिलांना आणि माझ्या आई-वडिलांना माहिती होते. त्यासोबत आमच्या बहिणींना याची कल्पना होती,” असेही तिने सांगितले.
-
दीपिकाने २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.
-
सध्या दीपिका ‘पठाण’ आणि ‘फाइटर’, ‘द इंटर्न’ या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. तर दुसरीकडे, रणवीर सिंह ‘सर्कस’, ‘तख्त’, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ सारख्या चित्रपटांचे शूटींग करताना दिसत आहे.

Tv Actress Son : मुंबईत टीव्ही अभिनेत्रीच्या १४ मुलाने आयुष्य संपवलं, ट्युशनला जायला सांगितल्याने इमारतीवरुन मारली उडी