-
झी मराठी वाहिनीवर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरताना पाहायला मिळत आहे.
-
या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे, संकर्षण कऱ्हाडे, प्रदीप वेलणकर या कलाकारांमुळे तिला विशेष पसंती मिळत आहे.
-
या कलाकारांमुळे मालिकेला चार चांद लागले आहेत.
-
या मालिकेत अभिनेत्री प्रार्थना बेहरे ही नेहा कामत ही भूमिका साकारत आहे. नुकतंच या मालिकेत नेहा आणि यशचे लग्न पार पडले आहे. त्यामुळे मालिकेत आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
-
मात्र आता लवकरच त्यांच्या आनंदात विरजण पडणार आहे. नेहा आणि यशचा संसार खुलत असतानाचा आता मालिकेत तिच्या पहिल्या नवऱ्याची एंट्री होणार आहे.
-
या मालिकेत नेहाच्या पहिल्या नवऱ्याची भूमिका कोण साकारणार याची माहिती उघड झाली आहे.
-
या मालिकेत नेहाच्या पहिल्या नवऱ्याची भूमिका अभिनेता निखिल राजेशिर्के साकारणार आहे.
-
निखिल राजेशिर्केने आतापर्यंत अनेक मालिका आणि नाटकात काम केले आहे. अनेक चित्रपटातही तो झळकला आहे.
-
‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत तो खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
-
अभिनेता डॉ. निखिल राजेशिर्के हा या मालिकेत नेहाचा पहिला नवरा म्हणजे अविनाशच्या भूमिकेत दिसणार आहे.
-
निखिल हा झी मराठीवरील प्रेक्षकांसाठी ओळखीचा चेहरा आहे.
-
निखिलने या आधी झी मराठीवर, ‘आभाळमाया’, ‘अरुंधती’ सारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे.
-
त्यासोबतच तो ‘अजूनही बरसात आहे’, ‘एक मोहोर अबोल’, ‘दिल्या घरी तू सुखी रहा’, ‘लगोरी’, ‘प्रीती परी तुजवरी’, ‘लक्ष’ सारख्या मालिकेतही काम केले आहे.
-
तसेच निखिलनं ‘बायकर्स अड्डा’, ‘असेही एकदा व्हावे’, ‘7 दोन 75’, ‘फक्त इच्छाशक्ती हवी’ या चित्रपटातही काम केलं आहे.
-
निखिलच्या एंट्रीनंतर आता या मालिकेत कोणते नवीन वळण येणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल