-
१९७५ चा ‘शोले’ हा सर्वात जास्त चालणारा चित्रपट म्हणून ओळखला जातो. रमेश सिप्पी यांच्या चित्रपटात अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमा मालिनी, जया बच्चन, संजीव कुमार, अमजद खान याच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटाची त्याकाळात १५ करोड तिकीटं विकली गेली होती.
-
बाहुबलीच्या दोन्ही भागांनी चित्रपटसृष्टिचा चेहेराच बदलून टाकला. ‘बाहुबली २’ ची जवळजवळ १२ करोड इतकी तिकीटं विकली गेली.
-
सुनील दत्त, राजेंद्र कुमार आणि नर्गिस यांच्या ‘मदर इंडिया’ची १० करोड तिकिटे विकली गेली होती. याच चित्रपटादरम्यान सुनील दत्त आणि नर्गिस यांचं प्रेमप्रकरण सुरू झालं होतं.
-
१९६० मध्ये बनलेल्या भव्य दिव्य ‘मुघल-ए-आजम’ची त्या काळात १० करोड इतकी तिकीट विकली गेली होती. त्यावेळेस हा एक खूप मोठा रेकॉर्ड होता.
-
कौटुंबिक मनोरंजनासाठी लोकप्रिय असणाऱ्या सलमान खान, माधुरी दीक्षितच्या ‘हम आपके है कौन’ने तेव्हा बॉक्स ऑफिसवर ७.५ करोड तिकीटांची विक्री केली होती.
-
१९८३ च्या ज्या चित्रपटाच्या दरम्यान अमिताभ बच्चन जखमी झाले त्या ‘कुली’ चित्रपटाची तब्बल ७ करोड तिकिटे विकली गेली होती.
-
मनमोहन देसाई यांच्या ‘अमर अकबर अॅंथनी’ या सुपर डुपर हीट चित्रपटाची ६ करोडहून अधिक तिकीटं विकली गेली होती.
-
राज कपूर दिग्दर्शित आणि ऋषि कपूर, डिंपल कपाडियाचा पहिला चित्रपट ‘बॉबी’ची ५ करोड तिकीटं विकली गेली.
-
साऱ्या भारतीयांनी डोक्यावर घेतलेल्या ‘केजीएफ चॅप्टर २’ ची बॉक्स ऑफिसवर तब्बल ५ करोड तिकीटं विकली गेली.
-
एस.एस.राजामौली यांच्या नुकत्याच आलेल्या ‘RRR’ने तिकिटबारीवर ४ करोड तिकीटांची विक्री केली होती. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस)

“मुघलांना विरोध करणारे मराठा साम्राज्य…”, मराठी भाषेच्या वादावर JNU च्या कुलगुरूंची प्रतिक्रिया; म्हणाल्या…