-
झी मराठी वाहिनीवर ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही नवीन मालिका २२ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
-
या मालिकेतून अभिनेत्री शिवानी नाईक छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे.
-
शिवानी ‘अपर्णा सुरेश माने’ची भूमिका साकारत आहे.
-
शिवानीने आजवर अनेक एकांकिका आणि व्यावसायिक नाटकातून आपली अभिनयाची छाप पाडली आहे.
-
अभिनयासह शिवानी ही उत्कृष्ट ढोलवादन करते.
-
‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका प्रेक्षकांसाठी एक वेगळा विषय घेऊन आली आहे.
-
अपर्णा सुरेश माने म्हणजे अप्पी, ही ती मुलगी आहे जी खेडे गावात रहाते, जिथे शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाहीत, तिला कुठले मार्गदर्शन नाही.
-
‘अप्पी’चे ध्येय खुप मोठ्ठ आहे. तिला येणाऱ्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक अडचणींवर मात करुन ती कलेक्टर होते. अशी ही संघर्ष कथा आहे.
-
‘अपर्णा’चं एक स्वप्न आहे कलेक्टर व्हायचं आहे आणि ते ती कस साध्य करते हा तिचा प्रवास दाखवणार आहे.
-
‘अप्पी’ सामाजिक आणि कौटुंबिक अडचणींचा सामना करून काही तरी करू पाहते आहे.
-
या मालिकेत शिवानीसह अभिनेता रोहित परशुराम प्रमुख भूमिकेत असणार आहे.
-
ही भूमिका शिवानीसाठी खूप प्रेरणादायी असल्याचे तिने सांगितले आहे.
-
‘मी अप्पीच्या भूमिकेसाठी खूप मेहेनत घेते आहे’ असं शिवानी म्हणाली.
-
या प्रेरणात्मक मालिकेचे लेखन अभयसिंग जाधव यांचे असून दिग्दर्शन आशुतोष बाविस्कर यांनी केले आहे.
-
या मालिकेची निर्मिती अभिनेत्री श्वेता शिंदे करत आहे.
-
अभिनेत्री, निर्माती श्वेता शिंदेने अहमदनगर महाकरंडक एकांकिका स्पर्धात शिवानीचं काम पाहिले होते आणि तेव्हा तिला मालिकेत मुख्य भूमिकेत काम देईन असं आश्वासन दिले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी नाईक / इन्स्टाग्राम)

Sonam Raghuvanshi Case: ‘सोनम रघुवंशी पतीची हत्या होताना पाहत होती’, अखेर आरोपींनी गुन्हा मान्य केला; पोलीस म्हणाले, ‘पहिला वार…’