-
अभिनेत्री सायली संजीव हे मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय नाव आहे.
-
‘काहे दिया परदेस’ मालिकेतून मनोरंजन विश्वात पदार्पण केलेल्या सायलीने आजवर अनेक चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे.
-
सायलीचे महाराष्ट्रात लाखो चाहते असून सोशल मीडियावर तिची मोठी फॅन फॉलोविंग आहे.
-
सायली सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर करत असते. नुकतंच तिने पिवळ्या रंगाच्या नऊवारी साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
या साडीवर सोनेरी नक्षीकाम केलेलं असून सायलीने त्यावर हिरव्या मण्यांचा चोकर नेकलेस घातला आहे.
-
यावेळी सायलीने वेगवेगळ्या पोजमध्ये फोटोशूट केलं आहे. या फोटोंवर चाहत्यांपासून अनेक मराठी कलाकारांनी कमेंट्स केल्या आहेत.
-
सायलीचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत असून तिच्या सौंदर्याचं अनेकजण कौतुक करत आहेत.
-
दरम्यान एका चाहत्याच्या कमेंटने सर्वांचच लक्ष वेधलं आहे. “कृष्णाला प्रेमात पडणारी राधा तू, चंद्रही प्रेमात पडावा असं नक्षत्र तू” अशी कमेंट या चाहत्याने केली आहे.
-
मेकअप : साक्षी सरदल (Sakshi Sardal) वेशभूषा : ATARA फोटो : आरती लोखंडे Shoot managed by @n.i.d.s_ @wechitramedia
-
सायली संजीवच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून साभार

‘रानू बंबई की रानू’… गाण्यावर चिमुकल्यांचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक