-
Jio MAMI मुंबई फिल्म फेस्टिव्हल तीन वर्षांनंतर २०२३ मध्ये आयोजित करण्यात आला आहे. २५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान ७० देशांतील २५० हून अधिक चित्रपट या फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित केले जाणार आहेत. याच महोत्सवातील सर्वात चर्चेत असलेल्या चित्रपटांबद्दल आपण जाणून घेऊयात.
-
पुश्तैनी : या चित्रपटाची कथा एका स्ट्रगलिंग अभिनेत्याच्या अवतीभवती फिरते ज्याच्या आयुष्यात बऱ्याच चित्र-विचित्र घटना घडलेल्या आहेत. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावचाही कॅमिओ पाहायला मिळणार आहे.
-
द बकिंघम मर्डर्स : या चित्रपटात करीना कपूर खान मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाची कथा एका ब्रिटिश-भारतीय गुप्तहेराभोवती फिरते जीने नुकतेच आपले मूल गमावले. या चित्रपटाचे दिग्दर्शन हंसल मेहता यांनी केले आहे.
-
द रेपिस्ट : या चित्रपटात कोंकणा सेन शर्मा मुख्य भूमिकेत आहे आणि एका मध्यमवर्गीय विद्यार्थिनीची ही गोष्ट आहे जी तिच्यावर बलात्कार करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी संघर्ष करत आहे.
-
सुल्तानाज ड्रीम : इसाबेल हरगुआराचा हा पहिलाच चित्रपट आहे जो भारतात प्रदर्शित होणार आहे. हा एक अॅनिमेटेड चित्रपट आहे जो इनेस या स्पॅनिश कलाकाराच्या कथेवर बेतलेला आहे. हा एक साय-फाय चित्रपट आहे. यात महिला सत्ताधारी आणि पुरुष घरातील कामे करताना दाखवले आहेत.
-
स्टोलेन : रेल्वे स्टेशन आणि एका प्लॅटफॉर्मवरील वेगवेगळ्या घटनांवर हा चित्रपट बेतलेला आहे. अभिषेक बॅनर्जी यात मुख्य भूमिकेत आहे. लंडनमधील महोत्सवातही हा चित्रपट सामील केला गेला होता.
-
दिल्ली डार्क : हा १०० मिनिटांचा डार्क कॉमेडी चित्रपट आहे जो हिंदी, इंग्रजी, योरूबा आणि पिडगिन भाषांमध्ये दाखवला गेला आहे. दिल्लीत राहणाऱ्या एका नायजेरियन मुलाभोवती ही कथा फिरते, ज्याला एमबीए करून भारतात आपली ओळख निर्माण करायची आहे.
-
अगेंस्ट द टाइड : मुंबईतील २ मच्छिमार मित्र आणि त्यांच्या अवतीभोवती फिरणारा हा ९७ मिनिटांचा चित्रपट आहे. या दोघांच्या मैत्रीवर आणि व्यवसायामुळे निर्माण होणाऱ्या नात्यातील दुराव्यावर हा चित्रपट बेतलेला आहे.
-
थडावु : जिओ मामी फेस्टिव्हलमध्ये दाखवला जाणारा हा एकमेव मल्याळम चित्रपट आहे. एकटी राहणारी आजारी व बरोजगार असलेल्या गीता या पात्राच्या संघर्षावर हा चित्रपट बेतलेला आहे. गुन्हा करून जेलमध्ये जाण्यामागे नेमका गीताचा काय उद्देश आहे हे या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. (सर्व फोटो सौजन्य : सोशल मीडिया आणि आयएमडीबी)

‘रानू बंबई की रानू’… गाण्यावर चिमुकल्यांचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक