-
आमिर खानचा ‘जो जिता वही सिकंदर’ हा चित्रपट सगळ्यांनाच आठवत असेल. कथा, अभिनय, संगीत सगळंच अव्वल असलेला हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.
-
या चित्रपटात आमिर खान, पूजा बेदी, आयेशा झुलका व दीपिक तिजोरीसह आणखी एक कलाकार प्रमुख भूमिकेत होता तो म्हणजे मामिक सिंह.
-
‘जो जिता वही सिकंदर’मध्ये मामिक यांनी आमिर खानच्या भावाची म्हणजे रतन लालची भूमिका निभावली होती, जी प्रेक्षकांना फार आवडली. ९० च्या दशकात मामिक चांगलेच प्रसिद्ध होते. बऱ्याच चित्रपटात ते महत्त्वाच्या भूमिकेत दिसत होते.
-
परंतु अचानक त्यांच्या या करिकीर्दीला उतरती कळा लागली. त्यानंतर ते जणू चित्रपटसृष्टीतून गायबच झाले. आज मामिक नेमके कुठे आहेत व काय करतात? याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत.
-
मामिक सिंह यांचे खरे नाव हरमीत सिंह मामिक आहे. चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी टीव्ही मालिकांमध्येही काम केले. ‘विकराल और गब्राल’, ‘चॅम्पियन’ आणि ‘श्श्श कोई है’ यांसारख्या मालिकांव्यतिरिक्त ‘जो जीता वही सिकंदर’ आणि ‘क्या कहना’ यांसारख्या चित्रपटांमुळे मामिक सिंहची आजही लोकांच्या स्मरणात आहेत.
-
शिक्षण पूर्ण केल्यानंतर, मामिक यांनी एका जाहिरात एजन्सीमध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि नंतर मॉडेलिंगला सुरुवात केली. इथूनच त्यांचा फिल्मी दुनियेतील प्रवास सुरू झाला.
-
मामिक यांचा पहिलाच चित्रपट आमिर खानबरोबरचा ‘जो जिता वही सिकंदर’ होता. ज्याला प्रेक्षक व समीक्षक दोघांनी उचलून धरला.
-
यानंतर मामिककडे बड्याबड्या फिल्ममेकर्सची लाईन लागली, त्यांच्याकडे बऱ्याच चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या.
-
२००७ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मामिक यांनी त्यांच्या वाईट संगतीबद्दल भाष्य केलं. या मुलाखतीमध्ये मामिक यांनी कबूल केलं की केवळ ड्रग्जच्या आहारी गेल्यामुळे मामिक यांचं फिल्म करिअर व कुटुंब उद्ध्वस्त झालं.
-
आपल्या मित्रांनी सहकार्य केलं त्यामुळे ते या ड्रग्जच्या जाळ्यातून सुखरूप बाहेर येऊ शकल्याचंही मामिक यांनी स्पष्ट केलं.
-
या कारणामुळेच ‘क्या केहना’सारखा सुपरहीट चित्रपट दिल्यावर मामिक तब्बल १० वर्षं इंडस्ट्रीपासून लांब गेले. २०१० मध्ये मामिक यांनी ‘मल्लिका’ या चित्रपटातून कमबॅक करायचा प्रयत्न केला, पण तो चित्रपट सपशेल आपटला. इंडस्ट्रीत टिकून राहण्यासाठी नंतर त्यांनी टीव्ही मालिकांमध्ये छोट्या छोट्या भूमिका साकारल्या.
-
सध्या मामिक पुन्हा चित्रपटसृष्टीत आपलं नशीब आजमावून बघत आहेत. नुकतंच मामिक २०२० च्या हंसल मेहता दिग्दर्शित ‘स्कॅम १९९२ हर्षद मेहता स्टोरी’ या वेबसीरिजमध्ये झळकले, याबरोबरच २०२१ च्या अक्षय कुमारच्या ‘बेल बॉटम’ चित्रपटातही मामिक यांनी छोटी भूमिका साकारली होती. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Operation Sindoor: भारतीय हवाई दलाचा पाकिस्तानला जबरदस्त दणका; ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान पाडली पाकिस्तानी लष्कराची ६ विमाने