-
‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ मालिकेतील अभिनेत्री शरयू सोनावणे वैयक्तिक आयुष्यामुळे सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.
-
काल (३ मे) शरयूने लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने लग्न झाल्याचा खुलासा केला. यामुळे सध्या अभिनेत्री चर्चेचा विषय झाली आहे.
-
शरयूने काल लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने लग्नातील खास क्षणांचे फोटो शेअर केले; जे सध्या तुफान व्हायरल होतं आहेत.
-
गेल्या वर्षी शरयूने ‘पिंकीचा विजय असो’ मालिका सोडल्यानंतर साखरपुडा झाल्याची माहिती चाहत्यांबरोबर शेअर केली होती.
-
१९ सप्टेंबर २०२३ला अभिनेत्रीने साखरपुड्याचे फोटो शेअर करत लिहिलं होतं, “आयुष्यभरासाठी एका व्यक्तीला त्रास देण्याचं मी ठरवलं आहे. हॅपी अॅण्ड एंगेज…गणपती बाप्पा मोरया.” त्यामुळे शरयूचा फक्त साखरपुडा झाल्याचं सगळ्यांना माहित होतं. पण काल तिने लग्न झाल्याचा देखील खुलासा केला.
-
शरयू प्रसिद्ध फिल्ममेकर, निर्माता जयंत लाडेबरोबर ३ एप्रिल २०२३रोजी मोठ्या थाटामाटात लग्न झालं होतं.
-
पुण्यातील केरबाची वाडी येथील शरयू व जयंत लग्नसोहळा झाला होता. दोघांनी लग्नासाठी खास दोन लूक केले होते.
-
लग्नाच्या विधीसाठी अभिनेत्रीने लाल रंगाची नऊवारी नेसली होती. ज्यावर तिने गुलाबी रंगाचं ब्लाउज घातलं होतं आणि हिरव्या रंगाची शाल घेतली होती.
-
तर शरयूच्या नवऱ्याने पांढऱ्या रंगाचा सदरा ज्यावर अभिनेत्रीला मॅचिंग असं लाल रंगाचं धोतर नेसलं होतं. शिवाय लाल रंगाची शाल देखील घेतली होती. दोघं मराठमोळ्या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होते.
-
विधीनंतर रिसेप्शनसाठी शरयू व जयंत शाही लूकमध्ये पाहायला मिळाले. शरयूने पांढऱ्या रंगाची डिझायनर साडी नेसली होती. तर तिचा नवरा जयंतने पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती.
-
शरयूच्या मंगळसूत्राने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. दोन वाट्यांचं मंगळसूत्र शरयूला खूप सुंदर दिसत होते.
-
अभिनेत्रीने लग्नाचा खुलासा केल्यामुळे सध्या इतर कलाकारांसह चाहते तिला शुभेच्छा देत आहेत.
-
शरयूचा नवऱ्याचं नाव जयंत लाडे असं आहे. जयंत मराठी सिनेसृष्टीत काम करत असून तो एक फिल्ममेकर, निर्माता आहे.
-
अभिनेता उमेश कामत, पुष्कर श्रोत्री आणि स्पृहा जोशी अभिनीत ‘अ पेईंग घोस्ट’ चित्रपटाच्या निर्मातीची धुरा जयंतने सांभाळली होती.
-
याशिवाय उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, संजय जाधव, भरत गणेशपुरे अभिनीत ‘सूर सपाटा’ या चित्रपटाची निर्मिती देखील शरयूच्या नवऱ्याने केली होती. या चित्रपटात शरयू सुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती. (सर्व फोटो सौजन्य – शरयू सोनावणे इन्स्टाग्राम)

‘बायकोला नाचताना पाहून पती लाजला…’, हळदीच्या कार्यक्रमातील VIDEO होतोय तुफान व्हायरल