-
बॉलीवूड अभिनेत्री हुमा कुरेशीने नुकतेच तिच्या फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोशूटसाठी अभिनेत्रीने पारंपरिक शरारा परिधान केला आहे. हुमाच्या या लूकचे चाहत्यांनी कौतुक केले.
-
अभिनेत्रीने केसांमध्ये गुलाबी रंगाचा गुलाबदेखील घातला आहे. हे फूल हुमाच्या शराराच्या रंगाशी जुळते असून, तिला एक वेगळा लूक देत आहे.
-
या डिझायनर कुर्ता आणि शरारा सेटमध्ये हुमा अगदी सुंदर दिसत आहे.
-
अभिनेत्रीने मिनिमल मेकअप, गुलाबी लिपस्टिक, डायमंड रिंग व सिम्पल कानातले घालून तिचा लूक पूर्ण केला.
-
चाहत्यांने हुमाच्या या पारंपरिक लूकचे कौतुक करीत तिच्या फोटोंवर कमेंट्सही केल्या.
-
अभिनेत्रीच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे झाले, तर हुमा लवकरच ‘जॉली एलएलबी ३’, ‘पूजा मेरी जान’ व ‘गुलाबजाम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. हे चित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
-
(सर्व फोटो : हुमा कुरेशी/इन्स्टाग्राम )

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल